नवीन लेखन...

या कातरल्या क्षणांना

या कातरल्या क्षणांना, सय तुझी येते,– उन्हाची तप्त काहिली, चटकन् दूर होते, वारा धुंद वाही, ढग जाती प्रवासी, अधूनमधून बिजलीही, उगा आपुले दर्शन देई, अशा वेळी आठवे मज, सोनेरी प्रभेची सांज, याच समुद्रकिनारी, वाजली मिलनाची गाज, नभ सुंदर सोनबावरे, होते भेटीस साक्षी, कूजन करीत बागडती, पक्षी आनंदें वृक्षी, किनारा दूरवर तटस्थ, उभ्याने राखी सागराला, मिलनाची किती […]

 जीवन घटते सतत

क्षणा क्षणाला घटते जीवन,  जाण त्याची येईल कोठून  । मोठे प्रसंग जेंव्हा टिपतो,  तेच सारे लक्षांत ठेवतो  ।। जीवनाच्या पायऱ्या मोजता,  मना विचारा काय राहता  । ढोबळतेचा विचार येता,  सूक्ष्मपणाला विसरूनी जातो  ।। मृत्यू येई हर घडीला,  जाण नसते त्याची कुणाला  । गेला क्षण  परत न येई,  आयुष्य तेवढेच व्यर्थ होई  ।। समाधान जे मिळे तुम्हाला, […]

मित्रराज उगवताना

मित्रराज उगवताना, सृष्टीवर घडे करामत, आभाळ उतरे जळात, त्याचे रूप दिसे पाण्यात, आरस्पानी निळे सौंदर्य, नजरा खिळवून ठेवी, हलते डोलते आभाळ, पाण्यात प्रतिबिंबित होई, वृक्षांचे समूह किती, धरतीवर कोण पेरती, निळाईत उठून दिसती, पहा,हिरवाईने नटती ,–!! तमाची शामत नसे, हळूहळू तो नाहीसा होई, प्रकाशाचे किरण घेऊनी, दिनकराचा प्रवेश होई,-! अंधारी बुडालेली सृष्टी, रंग तिचा बदलून जाई, […]

एक शोषन

शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी डॉ. भगवान नागापूरकर    

रसिक श्रेष्ठ

कवि होणें सुलभ असावे    रसिक होण्यापरि जिवंत ठेविती कवितेला    हीच मंडळी खरी   भावनेचे उठतां वादळ    व्यक्त होई शब्दानीं भाव शब्दांचा हार दिसतो    काव्य ते बनूनी   भाव येणे सहज गुण तो     मानवी मनाचा परि बंदिस्त त्याला करणे    खेळ हा कवीचा   शब्द पिंजरा नि भाव पक्षी    ओळखी को रसिक कवि मनाशीं ‘स्व’ भावांचे   करी जुळवणूक   कविते […]

शब्द माझा मोगरा

शब्द माझा मोगरा, अन शब्द माझा पिसारा, शब्द माझा बोलका, नि तोच माझा किनारा, तोलतो मापतो,वाटतो, शब्दही सतत ‘झुंज’ देतो, राखतो पूर्ण ताकदही, सत्ताही पालटून देतो,—!!! खेळतो खेळी कल्पनांची, काव्यतुरेही तो खोवतो , राखतो बहुत अंतरे,— नाना जिवांना सांभाळतो,–!!! प्रकटे पण शब्दांतूनही,— कितीक आकसनेमका, तोच कधी जिंकून घेईल, अनेक हृदय संपदा, –!!! वाट दाखवी कधी, वचन […]

वलय

सतत फिरत राही, चक्र जीवनाचे विविधता पाही ,  रंग आयुष्याचे  ।।१ सुख दुःखाच्या भावना,  उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी  ।।२ लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार  ।।३ जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय  ।।४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

विनाश – ईश्वरी व मानवी

संतुलन  करूनी चालवी,  निसर्गाचा खेळ सतत  । जन्ममृत्यूची चाके फिरवी,  एकाच वेगाने अविरत  ।। जन्म घटना ही शांत होता,  मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी  । नष्ट होतो जेव्हां मानव,  विचार लाटा उठती मनी  ।। मरणामध्यें निसर्ग असतां,  हताश होऊनी दु:ख करी  । मानवनिर्मित नाश बघूनी,  घृणायुक्त  येई शिसारी  ।। पूर वादळे धरणी कंप,  पचवितो आम्ही ही […]

लोंबकळलेल्या खाली शेपट्या

लोंबकळलेल्या खाली शेपट्या, पिल्लू मौज करे कशी,–? शोधक बुद्धी, चौकस नजर, अफलातून फळते अशी,–!!! युक्ती,शक्ती, बुद्धी, जिवाला आहे देणगी,—- सदुपयोगाने करा किमया, जगण्यात गंमत मोठी,–!!! दिसे पिल्लू छोटेसे,— तरी मस्त आहे कल्पनाशक्ती, आरामात कसे झोके घेई, दुनियाच भासे त्यास छोटी,—!! डोळे मिचकावत पिल्लू बघते, आजूबाजूच्या साऱ्या सृष्टीकडे, भरभरून लुटेन आनंद मी, सोडवेन अनवट निसर्ग कोडे,-! ©️ […]

निसर्ग व्याप्ती

उंच चढूनी हिमालयी,      झेंडा तो रोविला गीरीराजाचे शिरावरी,      विजय संपादिला   उंचाऊनी  बघे मानव,      अथांग जगताला विज्ञानाच्या जोरावरती,   अंतराळात गेला   युगा युगाचा चंद्रमा,       केला अंकित त्याने त्याच्या देही ठेवी पाऊल,   मोठ्या अभिमानाने   अगणित दिसती गृहगोल,      त्याचा दृष्टीला सीमा न उरली आता मग,      चौकस बुद्धीला   चकित होतो प्रथम दर्शनी,      विज्ञाना बघता दिसून येती अनेक गुढे,    एक एक उकलता   किती घेशी झेप मानवा,       उंच उंच गगनी वाढत जातील क्षितिजे,     तितक्याच पटींनी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

1 139 140 141 142 143 436
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..