नवीन लेखन...

माझ्या भोवताली

माझ्या भोवताली, माणसांचे रान, चहूबाजूंना असूनही, वाटा सुनसान,–!!! टोचे सले असे एकटेपण,–!! माझ्या भोवताली, नातीगोती किती, प्रश्न एकच पडे, विचारती किती,– टोचे सले असे एकटेपण,–!! माझ्या भोवताली, मित्रपरिवार किती, असंख्य हात निव्वळ, फक्त वर ते उठती, टोचे सले असे एकटेपण–!! माझ्या भोवताली, पिके खूप मतांची, उपयोगाला येती, त्यातील का कधी,–!! टोचे सले असे एकटेपण–!! माझ्या भोवताली, […]

 ध्यान स्थिती

जेव्हां मजला कळत होते,  निद्रेत आहे मी जागृत स्थिती असूनी मनाची,  शरीर होते निकामीं  ।। निद्रेमधल्या स्थितीत जाता,  जाग न राही तेथे जागेपण आणि निद्रा दोन्हीं,  एकत्र न येते  ।। निद्रावस्था नि जागेपणा,  याहून दुजे कोणते ? ध्यान स्थिति ही आगळी असूनी,  मध्य बिंदू साधते  ।। देह मनाला विश्रांती देई,  ध्यान अवस्था ही ध्यानामधली ऊर्जा सारी, […]

जन्मच जर सोसण्यासाठी

जन्मच जर सोसण्यासाठी, तर दुःख कशाचे करावे,–? आयुष्याला तारण्यासाठी, का सुखाचे आधार घ्यावे,–? इथे कुणी ना आपल्यासाठी, कळवळून मग काय मिळवावे, फक्त मग जगण्यासाठी, शरीरही का झिजवावे,–? थोडा उजेड दिसण्यासाठी, कितीदा डोळे मिटून घ्यावे, पार अंधारा करण्यासाठी, सतत सारखे ठेचकळावे, जखमी मन लपवण्यासाठी, जिद्दीला किती उभारावे, घायाळ जिणे झाकण्यासाठी, डोळेझाक करत राहावे, येतो तो वार करण्यासाठी, […]

बहिणीची एक इच्छा

विसरू नकोस मजला    माझ्या भाऊराया नाते अतूट असते      घे, हे समजुनिया आठव सारे बालपण     कसे गेले खेळांत भांडत होतो, रुसत होतो    सारे केले प्रेमांत ओवाळणीची तुझी सुपारी     ठेवली मी जपुनी आठवण होता तुझी मजला    काढून बघते पेटीतुनी जाणीव  आहे मजला      संसार  जीवनाची कर्तव्ये पडली शिरावरी    तुझाच संसाराची खूप प्रेम दे वाहिनीला    संसार कर सुखाने काढून ठेव अल्पसे प्रेम   देण्या मज त्या साठ्यातुनी वर्षातून  एके दिवशी    बांध राखी प्रेमाची […]

तप- शक्ती

तप आणि सत्याची, महान असे शक्ती, वाढवूनी बघा तुम्ही, प्रभूस ती खेचती ।।१।।   तप वाढता तुमचे, झुकेल तो ईश्वर, हतबल होत असे, भक्त जणांसमोर ।।२।।   विश्वाचा तो मालक, दिसत नाही कुणा, प्रयत्न होवूनी व्यर्थ, निराशा येई मना ।।३।।   मिळविण्यास जा तुम्ही, मिळत नसे केव्हां तपशक्ती वाढविता, आपोआप येई तेव्हां ।।४।।   डॉ. भगवान […]

शब्द फुले

माळी असूनी मी, गुंफी फूलांचे हार, अर्पित जातो ते,  प्रभू चरणांवर….१, राम नाम जपत,  कुणी एक येतात घटकाभरासाठी,  विश्रांती ते घेतात….२, रोज देती मजला,  ओंजळभर फूले कोणत्या बागेतली,  कधी न सांगीतले….३, त्यांच्याच सांगण्याने,  हार मी गुंफीतो बघतात कौतुकें कसा मी अर्पितो….४, फूलांची ओंजळ ती,  नव्हे तो तर शब्दांचा ठेवा, कवितेच्या रचनी,  उपयोगी पडावा….५, शारदेचा आशिर्वाद, त्यांच्यातर्फे […]

उन्हाळे-पावसाळे हिवाळे

उन्हाळे-पावसाळे हिवाळे,सृष्टीचे चक्र अव्याहत, कोण चालवते त्याला असे, तोचि एक भगवंत,–!!! सावली उन्हामध्ये पडते, विधात्याची किमया सतत, ती देहापुढे – पुढे राहते, विज्ञानच लपले निसर्गात,–!!! सागरातून लाट उफाळते, लाटांचे अशा अधांतर, या नेत्रसुखद सौंदर्याचे, रचिता कोण सांगा तर,–!!! रहस्य जिवाच्या जन्माचे, मानव काहीसे उघडत, प्रकार किती ते मृत्यूचे, नाही कोडे उलगडत,–!!! डोंगर-दऱ्या विसंगत, असते त्यांची सदैव […]

 निसर्ग स्वभावाचे दर्शन

बहूमोल निसर्ग ठेव, निरनिराळे स्वभाव उमटविती भाव    मनावर आमच्या     ||१|| चांदण्याची शितलता, मनाची प्रफूल्लता देहाची आल्हादकता    लाभली चंद्राचे ठायी ||२|| नाजूक सहवास, मधूर मिळे वास, कोमलतेचा भास    जाणविला फूलांनी    ||३|| रंगाची विविधता, छटाची आकर्षकता, मनाची वेधता    इंद्रधनुष्य देई    || ४|| पळण्याची चपलता, फिरण्याची चंचलता, वेगाची तीव्रता,    भासे हरिणाच्या पायी    ||५|| प्रवाहाची संथता, पाण्याची खळखळता, स्वभावाची निर्मलता, […]

प्राण्याचे मोल समजा

खरेदी केला सुंदर पक्षी,   दाम देवूनी योग्य असे ते नक्षीदार  पिंजरा घेवूनी,   शोभिवान केले घरातें  ।।१ प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं पक्षानें मान टाकली,  पडला होता तळात मरूनी  ।।२ क्षणभर मनी खंत वाटली,   राग आला स्वकृत्याचा अकारण हौस म्हणूनी,   खरेदी केला पक्षी याचा  ।।३ किती बरे निच मन हे    निराशा तयाला धन हानीची पक्षानेतर […]

कुठे नाही स्वरूप देवा

कुठे नाही स्वरूप देवा, बघायला मिळत आम्हा, काळीज नमते तुज पाहता, चराचरातील या घटका, — निसर्ग मज वाटतो, तुझेच रुप देवा, तिथेच आम्ही तुला मानतो, स्वरूप कोणते का असे बा, ना तू कुठल्या देवळा, ना कुठल्या मंदिरी, प्रत्येकाच्या हृदयी बसशी,असशी तू हरी,—- प्रेम, माया, ममता, आपुलकी, जिव्हाळा, कुठे तू नसशी फक्त सांग मज गा ,—!!!! माणुसकी […]

1 140 141 142 143 144 435
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..