निसर्ग स्वभावाचे दर्शन

बहूमोल निसर्ग ठेव, निरनिराळे स्वभाव

उमटविती भाव    मनावर आमच्या     ||१||

चांदण्याची शितलता, मनाची प्रफूल्लता

देहाची आल्हादकता    लाभली चंद्राचे ठायी ||२||

नाजूक सहवास, मधूर मिळे वास,

कोमलतेचा भास    जाणविला फूलांनी    ||३||

रंगाची विविधता, छटाची आकर्षकता,

मनाची वेधता    इंद्रधनुष्य देई    || ४||

पळण्याची चपलता, फिरण्याची चंचलता,

वेगाची तीव्रता,    भासे हरिणाच्या पायी    ||५||

प्रवाहाची संथता, पाण्याची खळखळता,

स्वभावाची निर्मलता,    समजली नदीमुळे     ||६||

शक्तीचे दर्शन, क्रूरता भयान,

निर्दयतेची जाण,    दिसली हिंस्त्र पशूत    ||७||

जीवनाची प्रेमलता, हृदयातील अक्षरता,

भावनेची कोमलता    मातेच्या रुपाने मिळाली    ||८||

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1914 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..