अंबेस दाखवी काव्य

पाटीवरती अंक लिहीले,  बागडूं लागला आनंदाने

पित्याचे लक्ष वेधण्या,  हनवटी खेची हातानें….१,

प्रथमापासूनी लक्ष पित्याचे,  होते अवखळपणाकडे

अजाणपणा दाखवोनी,  दुर्लक्ष करी मुलाकडे…२,

शब्दांची गुंफन करूनी,  कवितेचा संग्रह केला

तोच संग्रह घेवून चाललो,  दाखविण्या माहूरी रेणूकेला…३,

जगदंबा ही आदी शक्ती,  सारे तिजला ज्ञात असते

अजाण बालक हट्टी असूनी, तिच्याच घऱी दाखविण्या जाते…४,

पाटीवरले अंक बघूनी,  हृदय पित्याचे गहीवरले

रेणूका तर जननी विश्वाची, भाव मनीचे आधीच कळले…५

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 1700 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती

महाराष्ट्रात दगडी कोळशाव्यतिरिक्त मॅंगनीज आणि लोह खनिज बर्‍याच प्रमाणात आढळते ...

Loading…