अहोवा
हा एक सुरक्षितता या विषयावरील लेख आहे ज्यात अपघात होता होता वाचणे या बद्दल चा विचार मांडला आहे. गुगलने स्त्री-दाक्षिण्य या शब्दाचे इंग्लीश मध्ये आणि Near miss accident याचे मराठी मध्ये पराकोटीचे हास्यास्पद भाषांतर केले आहे. इतके विक्षिप्त की त्याची अर्थ-कारणमीमांसा शोधणे मराठी (मराठीच काय कुणाच्याही) बुद्धीच्या पलीकडे आहे. अपघात होता-होता वाचला याला चपखल बसेल असा एकही शब्द न मिळाल्यामुळे आणि गुगल महाराजांनीही मार्गदर्शन न केल्यामुळे त्याचे संक्षिप्त स्वरूप म्हणून अहोवा या संक्षिप्त रूपाचाच (शॉर्ट-फॉर्म) या लेखात वापर करावयाचे ठरविले आहे.
[…]
