गॅदरींग….
कॉलेजच्या नोटीस बोर्डावर गॅदरींगची नोटीस लागली होती.हे जस समजल तसं गण्यानं टुन्नकन उडीच मारली.गण्या कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमीच पुढं पुढं करायचा.गण्यालं नाटकात काम करायची लय हौस होती.तसं पाहिलं तर लहान पणापासुनच गण्याच्या अंगात अभिनयाची गोम वळवळ करायची.तर असा हा गणेश उर्फ गण्या रणवीर नाटकाचा प्रचंड शौकीन होता.गल्लीत गणपती बसले की गण्याच्या ग्रुपचा नाटकाचा एक कार्यक्रम हमखासच […]
