हरवलेला सण
आज नागपंचमीचा सण. श्रावणातील या पहिल्या सणाचं सुनीताला लहाणपणापासूनच मोठं आकर्षण वाटे. […]
आज नागपंचमीचा सण. श्रावणातील या पहिल्या सणाचं सुनीताला लहाणपणापासूनच मोठं आकर्षण वाटे. […]
सलून मधला प्रसंग आहे …..मी सलून मध्ये बसलो असताना बहुधा तिथेच आजूबाजूला राहणारा एक ५-७ वर्षांचा लहान मुलगा आत शिरला … मागोमाग त्याची आई आली आणि सलून मध्ये काम करणाऱ्या माणसाला आणि आपल्या मुलाला आळीपाळीने सूचना देऊ लागली .. .. “अहो , याचे केस कापून झाले न की त्याला फक्त बाजूच्या बिल्डींग च्या गेट पर्यंत सोडा … […]
बंड्या! काहीसा अबोल, फारसा कोणात न मिसळणारा असा एक साधा भोळा, सामान्य मुलगा … तो तसा व्हायला कारणं देखील होती तशीच. दोन खोल्यांचं घर . कुटुंबं तसं खाऊन पिऊन सुखी असलं तरी परिस्थिती साधारण होती. बंड्याचा भाऊ त्याच्यापेक्षा जेमतेम अडीच वर्षांनी मोठा. त्यामुळे स्वाभाविकपणे लहानपणी बंड्याला दुपटी , टोपडी , खेळणी हे सगळं मोठ्या भावाचंच मिळालं. […]
कॅलेंडर बघता बघता मेधाच्या अचानक लक्षात आले, अरे! पुढच्या आठवड्यात तर आईचा वाढदिवस! किती वर्षाची झाली बरं आई? तिला जन्मवर्ष काही आठवेना. विचार करताना एकदम लक्षात आले, आई एकदा म्हणाली होती ‘ तू जन्माला आली तेव्हा मला नुकतंच विसावं वर्ष लागलं होतं.’ […]
गेल्या काही दिवसातल्या संधिप्रकाशातल्या सावल्यांचा गोष्टी अनेकांच्या कानावर गेल्या होत्या. त्यामुळं सगळे उत्सुकतेनं आले होते. उत्सुकता नावालाच, प्रत्येकजण भलंमोठं प्रश्नचिन्ह घेऊन आला होता. पण सुरुवात कुठून करायची हे कुणाच्या लक्षात येत नव्हतं. […]
भल्या सकाळी ती रोज यायची . न दमता , न कंटाळता जमिनीवर पडलेली बकुळीची फुलं वेचायची . तिच्याजवळच्या त्या मोठ्या परडीत फुलांचा हा मोठा ढीग व्हायचा . मग इथेच ती झाडाला टेकून फतकल मारून बसायची . आणि गाणं गुणगुणत गजरे गुंफत बसायची . […]
त्याचा दोनदा फोन येऊन गेला. मी जास्त एन्टरटेन त्याला केले नव्हते. पण तो डोक्यावरच बसला. ठरल्या वेळेला आलेला माणूस 65-68 वर्षाचा असेल. खूप थकलेला दिसत होता. मला म्हणाला सर माझी सही बघता का ? […]
अश्वत्थानं गोष्ट संपवली आणि सावलीत बसलेल्या त्या तरुणाकडे पाहिलं . त्याच्या डोळ्यातून पाणी वहात होतं . नेहमीप्रमाणं संधिप्रकाशातील सावल्या घनदाट होऊ लागल्या होत्या . सगळी झाडं , क्षितिजाकडे नजर रोखून सूर्य अस्ताला जाण्याची वाट पहात होती . […]
खरे तर मला तिचा लहानपणचा चेहरा नीट आठवत नाही… चाळीमधल्या त्या गमती आहेत… खेळाच्या …त्यावेळी एक खेळ सॉलिड पॉप्युलर होता… तो अर्थात आमच्यापेक्षा मोठ्या मुलींनी शोधून काढला होता… अर्थात त्याचे अनुकरण लहानही करत असत.. त्या खेळाचे नाव होते.. ‘ डॉक्टर …डॉक्टर …’ […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions