नवीन लेखन...

स्टॅम्प आजोबा

साधारण दर १५-२० दिवसांनी पत्र यायचं .. मन्या तर स्टॅम्प आजोबांची वाटच बघत असायचा .. कधी जरा उशीर झाला की जाता येता विचारायचा .. “स्टॅम्प आजोबा ss .. आलं का पत्र ???” .. साता समुद्रापार असलेल्या मुलाच्या आई वडिलांपेक्षा हाच पत्राची आतुरतेने वाट बघायचा … कारण तेवढेच नवनवीन स्टॅम्प त्याच्या कलेक्शन मध्ये यायचे आणि इतर मित्रांसामोर थोडा भाव सुद्धा खायला मिळायचा […]

श्री शिल्लक

तिला कळत नव्हतं ,त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय . कालपासून त्यांचं वागणं काहीसं अनाकलनीय वाटत होतं . पंचेचाळीस वर्षांच्या सहजीवनाचा इतिहास ती कालपासून धुंडाळत होती . थोडंसं काही हाती लागत
होतं , काही हातातून निसटून जात होतं . पण कालपासूनच्या वागण्याचा बोध तिला होत नव्हता . […]

पुनर्जन्म (लघुकथा)

आर्थिक अडचणी वाढू लागल्या की नातेसंबंध बिघडू लागतात, ते सावरायचे कसे याचा विचार करताना स्वतःची प्रकृती ढासळू लागते.संकट येऊ लागली की एकाच वेळी अनेक बाजूनी येतात आणि अनेकांचे सल्ले मानून मी मारुतीला दर मंगळवारी लवंगांचा हार आणि शनिवारी शनिमंदिरात बाटलीभर तेल घालू लागतो. […]

योद्धा (कथा)

अजित हा एकदम हुशार मुलगा ! एकपाठी असला तरी फक्त  घोकमपट्टी न करणारा ! सतत नवे प्रश्न विचारून शिक्षकांना सतावणारा.शाळेच्या वेळेत अभ्यासपूर्ण करून इतर वेळात वर्तमानपत्रे, मिळतील ती पुस्तके वाचणारा. रोज न चुकता प्रादेशिक व राष्ट्रीय बातम्या रेडिओवर ऐकणारा.कसलीही सभा असली तरी तिथे जाऊन वक्त्यांची व्याख्यानं ऐकणारा. […]

दैवगती (कथा)

१९५५/५६ सालची गोष्ट. उन्हाळ्याचे दिवस. . तो शेतीच्या कामासाठी मुंबईहून दिवड्यासाठी निघाला.. दिवडा…. साठगांवच्या पुढचं त्याचं गाव. साठगांवहून बसने चार तास लागत. सकाळची एस्टी न मिळाल्याने त्याला रात्र साठगावात काढणं भाग होतं. ते फार मोठं गाव नव्हतं. प्रथमच संध्याकाळच्या एसटीने तो उतरला होता . रात्रीचे दहा वाजत होते. आता हॉटेल मध्ये राहणं भाग होतं. […]

‘शेजार’ ….. (कथा)

आयताकृती फडके वाडा … आयताच्या एका बाजूला झाकलेली विहीर , पंप रूम आणि चाफ्याचं मोठं झाड .. उरलेल्या तीनही बाजूंना एक मजली चाळीसदृश घरं … अगदी बाजूबाजूला लागून … दोन्ही कोपऱ्यात लाकडी जीना …. मध्यभागी सगळं अंगण … अंगणात काही उगाच वाढलेली तर काही मुद्दाम लावलेली झाडं …. […]

करोना (कथा)

उद्याच्या वृत्तपत्रात हेडलाईन आणि आता रात्रीच्या न्यूज चॅनेल वर ब्रेकिंग न्यूज असणार होती, पालकमंत्री इसाक साहेबांच्या पुढाकाराने आणि सर्व आमदार, खासदारांच्या सहकार्याने कोविड १९ ची हि लाट लौकरच आटोक्यात येणार. […]

ठिगळ (कथा)

आपल्या सभोवताली वेगवेगळ्या ठिकाणी , वेगवेगळ्या संदर्भातील आजुबाजूला घडणाऱ्या घटना किंवा आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यावर अशा अनेक अर्धवट,अपूर्ण राहिलेल्या गोष्टी असतात मग त्या “चांगल्या किंवा कधीकधी वाईट” ही असतात पण त्यांना पूर्णत्वास न्यायला लावावंच लागतं ……..असंच एखादं ….”ठिगळ” […]

कुदरत की गत न्यारी !

कुमारजींच्या गाण्यातला दर्द आत्ता त्याच्या ध्यानात आला. त्याच्या लक्षात आलं, सगळ्याला उशीर झालाय. सगळं संपत आलंय. कोरोना हे निमित्त झालंय, पण प्रत्यक्षात फक्त निर्गुणी भजन तेव्हढं चिरंजीव होऊन राहिलंय… […]

भूमिका (कथा)

आपण खूप मोठी शाब्दिक कोटी केल्याचा आनंद सिंगच्या डोळ्यातून वहात होता. अंजुला सगळं सगळं आठवलं. घर सोडल्यापासून इथं पर्यंत केलेला प्रवास, त्यात ते रुतलेले काटे, त्या वेदना, त्या खोट्या अपेक्षा आणि मग अपेक्षाभंग. एकावर एक पचवलेले दुःखाचे कढ…… आणि या सर्वात निस्सीम प्रेम करणारा संजू! […]

1 69 70 71 72 73 105
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..