ते देखणे मंदिर होतं. सुशोभीत केलेलं… चकचकीत… बऱ्याच जणांची तिथे गर्दी झालेली… कुणाला कशासाठी न्याय हवा होता, कुणाला कशासाठी… कुणावर अत्याचार झाला होता, कुणी अन्यायाची शिकार झालेलं… प्रत्येकाची बाजू वेगवेगळी… न्याय मिळवून घेण्याची प्रत्येकाची घालमेलही वेगवेगळी… सगळेच फिरत होते… कोट घातलेल्या व्यक्तींच्या मागे… इकडून तिकडे… गरजवंताला आणि शोषीतांना काही कळत नाही… सांगतील तसे वाकतात ते… बिचारे. […]
महाराज कृष्णकुंभांनी राजकुमारी कृष्णाकडे नजर टाकली. आज काहीतरी बिनसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांना काय समस्या आहे हे त्यांनीच विचारावे हि महाराजांची अपेक्षा होती. म्हणून ते वाट पहात होते. कृष्णा उद्याच्या, या महाकाय सामराज्याच्या एकमेव उत्तराधिकारी होत्या. त्याना तीक्ष्ण बुद्धीचे वरदान मिळालेले होते. पण अजून पोर वयाचं. अनुभव नगण्यच होता. […]
कुठेतरी दूर रणरणत्या उन्हाची दुपार असते, ओठ शुष्क करणारे वारे वाहताहेत, मनाला भेदणारा एकाकीपणा आहे… कुठुनतरी सुर कानावर येताहेत… ‘मेरा जीवन कोरा कागज, कोरा ही रह गया…’ किशोरदाचा स्वर हृदयाला भिडणारा. मनातलं कागदावर आणणारे हे जादुई शब्द, पुन्हा मनात घर करून राहतात… राहिले आहेत. अनेक वर्षांपासुन… आदीम अवस्थेत असणाऱ्या माणसाला लिहिण्याची समज आली तशी तो पानांवर […]
हा कॉमन मॅनच आहे, ज्याच्या जिवावर उभे राहतात इमलेच्या इमले. ज्याच्या जिवावर चालतोय गाडा व्यवस्थेचा, लोकशाहीचा, विश्वासाचा, परंपरेचा अन संस्कृतीचा. तोच सगळं सांभाळतोय हे सारं. सगळे अन्याय अत्याचार सहन करूनही तो मात्र फार आशावादी. त्याला निश्चितपणे वाटतंय हे सारं बदलणार आहे. आज ना उद्या परिस्थिती बदलेल. सारं काही चांगल होईल असे चित्र तो मनाशी रंगवत असतो. […]
जुन्या काळातील चित्रपटात एक सीन हमखास रहायचा, तो म्हणजे नायिका बागेत चालत असते… चालता चालता तिच्या पायात अचानक काटा रुततो… शेजारी असलेला नायक अलगद तिच्या पायातला काटा काढतो… चित्रपट पुढे सरकत जातो. थोडक्यात काय तर चित्रपटात नायक-नायिकेचे प्रेम फुलवायला आणि चित्रपट पुढे सरकवायला काटा कारणीभूत ठरतो, असो… काटा पाहिला नाही, असा माणुस या पृथ्वीवर सापडणे अवघडच. […]
खळखळ वाहणारी नदी, तिच्या काठावर असलेला वटवृक्ष. त्याच्या विस्तीर्णपणे पसरलेल्या पारंब्या. पारंब्यातून पुन्हा नव्या वृक्षाची पालवी फुटतेय, असे स्वप्नवत चित्र. फार पुर्वी बघायला मिळत होते. आता तसे राहिले नाही. असेल कुठे एखाद्या गावकुसात. आपल्याला ते माहित नाही इतकेच. आपल्याला खरे तर बऱ्याच गोष्टी माहिती नसतात. आपल्याला हे ही माहिती नसतं आपल्याच आत दडलेला वटवृक्ष अन त्याच्या […]
मी एका बांधकाम कंपनीच्या भल्यामोठ्या कार्यक्षेत्रात नोकरी करणारा एक सामान्य इंजिनियर होतो , आमच्या कंपनीला या गावाच्या जवळून जाणाऱ्या महामार्गाचे काम मिळाले आणि , या कामाची बातमी स्टाफ मध्ये पसरली …मी पण साहेबांच्या मागे लागून .नव्हे अगदी हट्ट करून प्रोजेक्ट करणाऱ्या टीम मध्ये मी माझा समावेश करून घेतला महिन्यापूर्वी या साईटवर आलो. […]
आज साडेदहा पासूनच कोर्ट प्रेक्षकांनी भरले होते. कारण आज रुद्राचा बचावासाठी युक्तिवाद होणार होता. खुनाचा भक्कम पुरावा विरोधात असून हि, ‘मी खून केलाच नाही!’ या विधानावर रुद्रा ठाम होता! डॉ. रेड्डीच्या उलटतपासणी नंतर अडोव्हकेट दीक्षितही गांगरल्याचे जाणकारांच्या नजरेतून सुटले नव्हते. एकीकडे करोडोची संपत्ती आणि एकीकडे फाशीचा दोर! मोठी विचित्र केस होती आणि ती शेवटच्या टप्प्यावर होती. दैनिकाचे रिपोर्टर्स, चॅनलचे प्रतिनिधी यांचा प्रेक्षकात भरणा अधिक होता. […]
संपूर्ण पुरावे आणि प्रत्यक्ष खून करतानाच व्हिडीओ असून सुद्धा रुद्रा फाशीवर जाईल याची खात्री दीक्षितांना वाटेना! विशेषतः डॉ. रेड्डीच्या साक्षीने त्यांना काळजीत टाकले होते. तरी ते आज शेवटचा प्रयत्न करणार होते. […]
उंचेपुरे, कृश प्रकृतीचे प्राध्यापक डॉ. जोगदंडाच्या चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज विलसत होते. त्यांनी विरळ होत जाणारे डोक्यावरचे पांढरे केस मागे वाळवून व्यवस्थित विंचरले होते, ते त्यांच्या रुबाबदारपणात भरच घालत होते. सैलसर कोट-पॅन्ट आणि पांढराशुभ्र शर्ट त्यांच्या व्यक्तिमत्वाला शोभून दिसत होती. […]