नवीन लेखन...

रुद्रा – कादंबरी – भाग २५

 

आज साडेदहा पासूनच कोर्ट प्रेक्षकांनी भरले होते. कारण आज रुद्राचा बचावासाठी युक्तिवाद होणार होता. खुनाचा भक्कम पुरावा विरोधात असून हि, ‘मी खून केलाच नाही!’ या विधानावर रुद्रा ठाम होता! डॉ. रेड्डीच्या उलटतपासणी नंतर अडोव्हकेट दीक्षितही गांगरल्याचे जाणकारांच्या नजरेतून सुटले नव्हते. एकीकडे करोडोची संपत्ती आणि एकीकडे फाशीचा दोर! मोठी विचित्र केस होती आणि ती शेवटच्या टप्प्यावर होती. दैनिकाचे रिपोर्टर्स, चॅनलचे प्रतिनिधी यांचा प्रेक्षकात भरणा अधिक होता.
बरोब्बर अकराला कोर्टाचे कामकाज सुरु झाले.
“आरोपी रुद्रप्रसाद, आपल्या बचावाच्या युक्तिवादास सुरवात करावी.” कोर्टाने रुद्रास आदेश दिले.
कोर्टाच्या निर्देशानंतर रुद्रा सावकाश उठला. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दीक्षितांना जाणवत होता. रुद्राने न्यायासनास आणि प्रेक्षकांना नम्र अभिवादन केले.
“न्यायमूर्ती महोदय,मी एक सामान्य माणूस आहे. मी सुजाण नागरिकांप्रमाणे कायद्याचे पालन करतो. मला कायद्याचा आदर वाटतो आणि न्यायदान प्रणालीवर माझा पूर्ण विश्वास आहे. हा माझा विश्वास सार्थ होईल याची मला खात्री आहे. याच विश्वासावर मी निर्भयपणे माझी बाजू मांडणार आहे. मला माझे म्हणणे मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी न्यायासनाचा आभारी राहीन.
मी न्यायालयाचा फारसा वेळ घेणार नाही. तो व्हिडीओ माझ्या विरोधातला सर्वात भक्कम पुरावा आहे. त्यात मी प्रत्यक्ष खून करताना सर्वांना दिसतोय! मी हि ते या पूर्वीच मान्य केले आहे! पण ते केवळ अर्ध्य सत्य आहे!
डॉ. रेड्डीच्या साक्षीकडे मी आपले लक्ष्य वेधू इच्छितो. मी एलिन हॅन्ड या मानसिक व्याधीचा शिकार आहे. हि व्याधी खूप जुनी आणि बळावलेली आहे, हे माझ्या साक्षीदारांच्या साक्षीतून सिद्ध झालाय. लहानपणी पाचसहा वर्षाचा असताना सायकलवरून पडून डोक्याला जखम झाली होती. नंतर मग कधीतरी बारीक सारीक वस्तू उचलण्याची सवय लागली आणि वया बरोबर वाढतच गेली. माझा डावा हात काय करतोय मला कळेना. माझ्या डाव्या हाताला त्याचा स्वतंत्र मन आहे, तो त्याला हवे ते, मला न कळूदेता करत असतो! तो माझ्या मुळीच ऐकण्यात नाही, याची मला दिवसेंदिवस खात्री पटत गेली. डॉ. रेड्डी म्हणतात कि हा डावा हात माझ्याच शरीराचा अवयव आहे. पण ते तसे नाही! त्यांचे प्रयत्न चालू आहेत. मीही त्यांच्या सूचनांचे पालन करतोय. काही प्रमाणात त्यांच्या प्रयत्नांना यश येतंय. पूर्वी परिणाम समोर येईपर्यंत हाताने काय केलंय हे कळायचे नाही. पण आताशा समजू लागलंय.
त्या दिवशी पण, माझा हात त्या म्हाताऱ्याच्या तोंडावर आहे, तो म्हातारा जिवाच्या आकांताने तडफडतोय, हे मला काळात होते! मी नको म्हणत असतानाही तो ‘हात’ तोंडावरचा दाब वाढवतच गेला! माझ्या मनात त्या म्हाताऱ्याचा जीव जावा हा उद्देश कधीच नव्हता! एका अनोळखी वृद्धास काहीही कारण नसताना मी का मारेन?
महोदय,हे पूर्ण सत्य मी या आदरणीय न्यायासना समोर मांडलय. तो खून माझ्याच ‘हाताने’ केला असला तरी तो मी केलेला नाही! डॉ. रेड्डी सारख्या आंतरराष्टीय तज्ञाची साक्ष माझ्या विधानास पूरक आहे! मीही अडोव्हकेट दीक्षितांप्रमाणेच म्हणेन कि ‘गुन्हेगारास कठोर शासन झाले पाहिजे!’. माझ्या हाताने, जो माझ्या मेंदूच्या,मनाच्या नियंत्रणाबाहेर आहे, केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला कशी देता येईल? ‘शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निर्दोषाला शिक्षा होता कामा नये’ या न्यायप्रणालीच्या ब्रीदावर माझी श्रद्धा आहे.
माझी न्यायदेवतेच्या निवाड्यावर श्रद्धा आहे. मला केवळ आणि केवळ ‘न्याय’च मिळेल या बद्दल तिळमात्रही शंका नाही! आणि मी त्याची प्रतीक्षा करीन. धन्यवाद!”  जेव्हा रुद्रा आपले बचावाचे भाषण संपवून जागेवर बसला तेव्हा संपूर्ण कोर्टात स्मशान शांतता पसरली होती!
“या केसचा निकाल पुढील तारखेस जाहीर होईल. तोवर कोर्ट ऍडजर्न होतय!” या आवाजाने लोक भानावर आले.
०००
सहा महिन्यांनी रुद्रा डॉ. भोसलेंच्या हॉस्पिटल समोर उभा होता. या विश्वविख्यात डॉक्टरांची आज त्याच्याकडे अपॉइंटमेंट होती. मायोइलेक्ट्रिक कृत्रिम हस्तरोपणात त्यांची ख्याती होती. या तंत्रदानाने केलेल्या हाताचे कार्य संचलन मेंदूद्वारे होणार होते! ऍडव्हान्स रोबोटिक्स या विज्ञान शाखेचा तो चमत्कार होता. हा उपचार, त्या साठी लागणार  इलेक्रॉनिकस उपकरणांनी युक्त कृत्रिम हात, सारेच प्रचंड खर्चिक होते. पण ‘सहदेव ग्रुप्स’च्या मालकांसाठी त्याची काळजी करण्याचे कारण नव्हते! रुद्रा आता ‘सहदेव ग्रुप’चा कायदेशीर मालक होता!
त्या राजप्रासादतुल्य हॉस्पिटलच्या भव्य प्रवेशद्वारात पाऊल टाकण्या पूर्वी रुद्राने आपल्या डाव्या हातावर नजर टाकली. त्या जयपूर लाकडी हाताला उजव्या हाताने चापचून पहिले.
“सर्व साक्षी आणि दाखल केलेले पुरावे पहाता हे कोर्ट मयत सुखदेव यांचा खून आरोपी रुद्रप्रताप रानडेंच्या हातून झाल्याचे ग्राह्य धरते! आरोपी रुद्रप्रसाद रानडे हि व्यक्ती आणि त्यांचा ‘डावा हात ‘यांना भिन्न अस्तित्व असू शकते हा तज्ज्ञांचा निकष, गुन्हेगारास कठोर शासन या तत्वांचा विचार करता, हे न्यायासन आरोपी रुद्रप्रसाद रानडे याना निर्दोषत्व बहाल करते!, पण त्यांच्या डाव्या हातास मात्र ‘सदोष मानव हत्या’ केल्या बद्दल दोषी ठरवते आहे! या गुन्ह्याबद्दल त्या डाव्या हाताला ‘देह दंडा’ची शिक्षा फर्मावते आहे! सदरील गुन्हेगार ‘हात’ कोपरा पासून अलग केला जावा! हे या कोर्टाचे आदेश आहेत!”
हा कोर्टाने दिलेला आदेश रुद्राच्या कानात घुमत होता.
तेव्हड्यात कोणी तरी त्याच्या खांद्याला स्पर्श केल्याचे त्याला जाणवले. त्याने मागे वळून पहिले, तो इन्स्पे. राघव होता!
“रुद्रा, तू कोर्टाची हि लढाई जरी जिंकली असलीस तरी हा राघव तुला सोडणार नाही. सत्य कधीच लपून रहात नाही. आणि मी ते सत्य हुडकून काढीनच. ”
“इन्स्पे. राघव मला या आयुष्याने एक गोष्ट शिकवली आहे. ती मी आज तुमच्याशी शेयर करतो. ‘सत्य’ आणि ‘कायदा किंवा न्याय’ हे एका बाजूने असावे हे अपेक्षित असते. पण वास्तवात तसे नेहमीच घडत नसते! आज ‘न्याय’ माझ्या बाजूने आहे! तुम्ही ‘सत्य’ हुडकत बसा. सापडले आणि मला त्यात गुंतवता आले तर, माझी लढण्याची तयारी आहे!”
“या क्षणापासून सावध रहा! मी तुझ्या पाठीशी आहे लक्षात ठेव!”राघव रुद्राला बजावून गेला.
रुद्रा स्वतःशीच हसला. राघवच्या साहेबाना आज सकाळीच त्याने एक महागडे गिफ्ट दिले होते आणि ते त्यांनी खिशात टाकले होते. खऱ्या अर्थाने ते स्वतः त्या क्षणा पासून रुद्राच्या ‘खिश्यात’ विराजमान झाले होते!
रुद्राने हॉस्पिटल मध्ये प्रवेश केला. नवीन हात त्यांनीच वाट पहात होता!
(समाप्त )

—  सुरेश कुलकर्णी


नमस्कार मित्रानो, आज ‘रुद्रा!’ ला निरोप देतो आहोत. माझ्या या पहिल्याच दीर्घ लेखनाचे आपण प्रेमाने स्वागत केल्या बद्दल आभारी आहे. असेच ‘वाचनाशिर्वाद’ मिळत राहो, हीच विनंती. पुन्हा भेटूच. एखादी नवीन कथा घेवून. फिरून एकदा धन्यवाद!

— सुरेश कुलकर्णी

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

3 Comments on रुद्रा – कादंबरी – भाग २५

  1. katha shevti ghait gundalyasarkhi watate..
    mandani surawatipasun surekh hoti, yat shanka nahi.
    pn shewat lkshat yet nahi.

    • वाचना बद्दल धन्यवाद. ‘रुद्राने’ प्राप्त प्राप्तपरस्थितीचा उपयोग करून घेतलाय. पळून जाण्याची संधी असूनही तो ‘सरेंडर ‘झालाय!

Leave a Reply

Your email address will not be published.


*


 

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..