नवीन लेखन...

रुद्रा – कादंबरी – भाग २१

पुढील तारखेस पुरावा म्हणून दाखल केलेले  जसवंतचे घेतलेले जवाब, रुद्रास वाचून दाखवण्यात आले. राघवने हा भाग कोर्टास सांगितला. दीक्षितांनी काही जुबुबी प्रश्न जसवंतच्या संदर्भात विचारले.
“आरोपी रुद्रप्रसाद, आपणास जसवंतच्या जबानी समंधी काही विचारावयाचे असेल तर तुम्ही इन्स्पे. राघवला विचारू शकता. आपले काही ऑब्जेक्शन असेल तर सांगा. ”
रुद्राने ऑब्जेक्शन घेतले नाही.
त्यांनतर इन्स्पे. राघवाची साक्ष झाली. त्यात त्याने जाधव काकांचा फोनवरील इन्टिमेशन पासून ते शव पोस्टमोर्टम साठी पाठवल्या पर्यंतची माहिती सांगितली.
रुद्राचे ‘नो ऑब्जेक्शन!
मग पोस्टमोर्टम करणारे डॉ., त्यांत त्यांनी मृत्यूचे कारण,मृत्यूची वेळ, या गोष्टी संदर्भात माहिती दिली. त्या दिवशी शेवटची साक्ष झाली ती फिंगरप्रिंट एक्सपर्टची. त्याने रुद्राचे फिंगरप्रिंट्स आणि संतुकरावांच्या मृत देहावर, विशेषतः नाकावर आणि कानाजवळचे ठसे, आरोपीचेच असल्याचे प्रमाणित केले.
तरीही रुद्राचे ‘नो ओब्जेक्शनचं! त्या दिवशीचे कोर्टाचे कामकाज संपले, तेव्हा कशालाच जर हा रुद्रप्रसाद हरकत घेत नसेल तर, गुन्हा का नाकबूल केलाय? हाच प्रश्न कोर्टात हजर असल्याच्या मनात होता. काही ‘चटपटीत’ बातमीच्या मागावर असलेल्या स्थानिक वृत्तपत्रांचा रिपोर्टर्सची निराशा झाली होती. नाही म्हणायला, सरकारी वकील श्री दीक्षितांनी हि केस लवकरात लवकर निकाली निघावी या दृष्टीने माननीय कोर्टास सलग तारखा देण्याची विनंती केली होती. इतर कामाचा दबाव असूनही कोर्टाने विनंती मान्य केली होती! पुढील तारखे पासून या केस साठी ‘विशेष बाब’ म्हणून सलग दहा दिवस सुनावणी साठी दिले जातील असे जाहीर करून टाकले!
०००
या तारखेस ‘संतुकराव मर्डर केस’चा तुकडाच पडायचा या जिद्दीने अडव्होकेट दीक्षित कोर्टात आले होते. सोबत प्रोजेक्टर आणि स्क्रीन पण त्यांनी आणवला होता. आज काही तरी विशेष पहायला मिळणार याची उपस्थितीत कुजबुज सुरु झाली.
कोर्ट स्थानापन्न होऊन कोर्टाचे कामकाज सुरु झाले तसे दीक्षित घसा खाकरून बोलावयास उभे राहिले.
” न्यायदानासाठी सलग तारखा दिल्या बद्दल आम्ही सर्वजण माननीय कोर्टाचे आभारी आहोत. आजची साक्ष अत्यंत महत्वपूर्ण आहे. सरकारच्या वतीने आमचे शेवटचे साक्षीदार आहेत श्री राकेश!”
राकेश साक्षीदाराच्या पिंजऱ्यात उभा राहिला. त्याने न्यायासनास आदरपूर्वक नमस्कार केला.
” राकेश, आपण पोलीस खात्यात काय काम करता ते कोर्टास सांगावे.” दीक्षित म्हणाले.
“मी पोलिसात कॉम्पुटर संबंधित सर्व कामे पहातो. सायबर सेल मध्ये असिस्टंट इन्चार्ज आहे.”
“आज मी जी व्हिडीओ कोर्टास दाखवणार आहे ती तुम्हास माहित आहे का?”
“हो.”
“ती तुम्हास कशी माहित आहे?”
” ती व्हिडीओ माझ्या कडे तपासणी साठी इन्स्पे. राघवनी पाठवली होती.”
“म्हणजे तुम्ही ती तपासली आहे! ओके. ती जेनुइन आहे का? का एडिटेड आहे? म्हणजे तुकडे-तुकडे जोडून ती तयार करण्यात आली आहे?”
” ती व्हीडिओ एडिटेड नाही. ती ओरिजिनल आहे! अगदी अस्सल.”
“तुम्ही इतके खात्रीपूर्वक कसे सांगू शकता?”
” दोन गोष्टीच्या आधारे! एक तर हि सम्पूर्ण व्हिडीओ सिंगल शॉट मध्ये आहे. आणि दुसरे कारण मी त्यातला तज्ञ आहे.”
” धन्यवाद, राकेश. मिस्टर रुद्रप्रताप, आपले काही ऑब्जेक्शन?” रुद्राकडे वळत दीक्षितांनी विचारले.
” मी तो व्हिडीओ पाहूनच माझे ऑब्जेक्शन घेईन!” रुद्रा म्हणाला.
“तर न्यायमूर्ती महोदय, आपली परवानगी असेल तर, आम्ही कोर्टास आरोपी रुद्रप्रसाद यांनी संतुकराव सहदेव यांचा खून कसा केला हे प्रत्यक्ष दाखवणार आहोत!”
‘बापरे!आता काय प्रोजेक्टरवर खून दाखवणार कि काय?’ ‘ कमाल आहे इन्स्पे. राघवाची! कसला सॉलिड पुरावा दाखल केलाय!’, ‘पण खून करतानाचा व्हीडिओ केला कोणी?आणि मग खुन्याला का नाही थांबवलं?’ असे अनेक प्रश्न कुजबुजीतून उमटू लागले.
“शांतता! चित्रीकरण दाखवण्याची परवानगी देण्यात येत आहे!” कोर्टाने परवानगी दिली. दीक्षितांनी हाताने राकेशला इशारा केला. राकेशने तत्परतेने ती व्हिडीओ प्रोजेक्टरवर लोड केली. स्क्रीन ऍडजेस्ट केला. तोवर पट्टेवाल्यानी खिडक्यावरील पडदे ओढून घेतले. प्रोजेक्टर ऑन झाला.
पंधरा मिनिटे कोर्टात स्मशान शांतता होती! रुद्राने केलेल्या खुनाचे ते भयनाट्य सम्पूर्ण कोर्टाने पहिले.
” मिस्टर रुद्रप्रताप, आत्ता तुम्ही, मी आणि सर्वानी जी व्हिडीओ पहिली त्या संबंधी आपणास काही ऑब्जेक्शन आहे का ?”दीक्षितांनी विचारले.
” नाही!”रुद्रा खाली मान घालून म्हणाला.
“न्यायमूर्ती महोदय, या व्हिडीओ संदर्भात मला आरोपी रुद्रप्रसाद याना काही प्रश्न विचारायचे आहेत. परवानगी असावी.”
कोर्टाने परवानगी दिली.
“आरोपी रुद्रप्रसाद, या व्हिडिओत आपण आहेत काय?”
“हो आहे!” रुद्राचा आवाज कमालीचा शांत होता. त्यात कोठेही भीतीचा लवलेशही नव्हता!
“कोठे आहेत?”
“मी संतुकरावांच्या पाठीमागे उभा आहे!”
“तुम्ही तेथे काय करत आहेत?”
” अहो मी त्यांच्या पाठीशी उभा आहे, हे आत्ताच तर सांगितलंय ना?”
“मला सांगा, संतुकरावांच्या तोंडावर असलेले हात कोणाचा आहे?”
“तो,न, माझाच हात आहे!”
“उजवा कि डावा ?”
“डावा!”
“त्या हाताची बोट कुणाची आहेत?”
” अर्थात, ती माझीच आहेत!”
“तुमच्या त्या बोटानी संतुकरावांचे नाक चिमटीत दाबून धरले आहे का नाही?”
“हो, धरलाय!”
“तो तुमचा डाव्या हाताचा तळहात संतुकरावांच्या तोंडावर दबलेला आहे का नाही?”
“हो, आहे!”
“त्या तुमच्या हाताच्या कृत्याचा संतुकरावावर काय परीणाम होतोय?” ‘हात’ या शब्दावर विशेष जोर देत दीक्षितांनी विचारले.
“ते धडपडताहेत!”
” मग शेवटी काय झालंय?”
“यात संतुकराव गतप्राण झालेत!”
” धन्यवाद,रुद्रप्रसाद!” दीक्षितांनी रुद्राची साक्ष संपवली.
“न्यायमूर्ती महोदय, आत्तापर्यंतचे पुरावे, आत्ता पाहिलेली व्हिडीओ, त्यानंतरची रुद्रप्रसादांची साक्ष, फक्त, फक्त आणि फक्त एकाच गोष्टीकडे निर्देश करते. आणि ती म्हणजे आरोपी रुद्रप्रसाद रानडे यांनी संतुकराव सहदेव यांचा, अत्यंत थंडगार डोक्याने, क्रूरपणे खून केला आहे! आरोपी वरील खुनाचा आरोप निःसंशय सिद्ध झाला असे मानण्यात यावे. न्यायमूर्तीनी अश्या क्रूरकर्म्यास कठोरात कठोर म्हणजे फाशीची शिक्षा द्यावी अशी मी विनंती करतो!” आपले म्हणणे त्रोटकपणे सांगून ऍडव्होकेट दीक्षित विजयी मुद्रेने जागेवर बसले.
“आरोपी रुद्रप्रसाद, आपण खून करतानाची व्हिडीओ आम्ही सर्वांची पहिली आहे. आजवर त्या अनुशंघाने इतरही साक्षी झाल्याचं आहेत. आता तरी आपणास खुनाचा आरोप मान्य आहे का नाही?” कोर्टाने रुद्रास विचारले.
दीक्षितांनी, त्यांच्या साक्षीने रुद्रास करकचून बांधून टाकले होते. आणि आता ‘ हो’ म्हणण्या शिवाय त्याला गत्यंतरच नाही, अशी फक्त दीक्षितांचीच नव्हे तर कोर्टातील उपस्थित सर्वांचीच अपेक्षा होती.
” न्यायधीश महोदय, मी माझे म्हणणे पूर्वीच सांगितले आहे! हा खून मी केलेला नाही!” रुद्रा सावकाश आणि स्पष्ट शब्दात म्हणाला! त्याच्या आवाजात कमालीचा आत्मविश्वास होता!
कोर्टात पिन ड्रॉप सायलेन्स पसरला!
व्हिडीओ सारखा जिवंत पुरावा असूनही, रुद्राने आरोप नाकारला! हेच ऐकले ना आपण? दीक्षितांनी स्वतःलाच विचारले!
“काय? आरोप अमान्य? रुद्रप्रसाद आपण गम्भीर आहेत का? कोर्टाचा बहुमूल्य वेळ जयोय! आपणास आपले म्हणणे सिद्ध करावे लागेल!” कोर्ट रुद्रावर बरसले.
” मला पूर्ण कल्पना आहे,महोदय! माझे निरपराधत्व सिद्ध करण्यास मला संधी दयावी ही विनंती आहे!”
रुद्रा नम्रपणे म्हणाला.
त्या दिवशी रुद्राच्या विनंतीवरून तीन समन्स निघाली. रुद्राचे साक्षीदार होते प्रोफेसर जोगदंड, ओम मॉलचा सेक्युरिटी गार्ड, आणि डॉ. रेड्डी!
(क्रमशः)

—  सुरेश कुलकर्णी

Avatar
About सुरेश कुलकर्णी 176 Articles
मी सुरेश कुलकर्णी. . साधारण कथा , लेख ,जुन्या सिनेमाच्या (हिंदी )गण्यावर माझे लिखाण असते . एखादे छानसे पुस्तक वाचण्यात आले तर त्यावर हि लिहतो . माझ्या वाचकास एक नम्र विनंती माझे लिखाण आवडले तरी ,आणि नाही आवडले तरी जरूर कळवा माझ्या लिखाणाचा पोत त्या शिवाय सुधारणार नाही .माझे सर्व लिखाण काल्पनिक असते .. mb.6361255994. किवा srk101252@gmail --संपर्का साठी

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..