गुलजार यांचा हा लेख ललित-लेख आहे, असें जर जाहीर केलें गेलें असतें, तर मग त्यांच्या या कल्पनाविष्काराबद्दल कांहीं तक्रार असायचें कारणच नव्हतें. मात्र, तसें न केल्यानें, वास्तविक परिस्थिती काय होती अथवा काय होती-असेल , याचा ऊहापोह करणें क्रमप्राप्त झालें. या मंथनातून, गालिबबद्दल योग्य ती माहिती सर्वांपर्यंत पोचेल अशी आशा. […]
कॉलेजचे प्रिन्सिपॉल साहेब गालिबच्या शायरीचे चाहते होते, त्यांना गालिबबद्दल, गालिबच्या फारसी भाषेच्या ज्ञानाबद्दल आदर होता. जेव्हां जेव्हां गालिब त्यांना भेटायला जात, तेव्हां प्रिन्सिपॉल साहेब स्वत: बाहेर येऊन गालिबचें स्वागत करीत आणि त्यांना आंत घेऊन जात. म्हणूनच, गालिबच्या दोस्तानें शब्द टाकल्यावर ते प्रिन्सिपॉल गालिब यांना फारसीच्या प्राध्यापकाची नोकरी द्यायला राजी झाले. […]
रुद्राने आपल्या फ्लॅटवरून एक नजर फिरवली. सर्व आवश्यक वस्तू त्याने पॅक करून एका छोट्याश्या बॅग मध्ये भरून घेतल्या होत्या. रात्रभर खपून त्याने त्या बुटक्याच्या उशीच्या अभ्र्यात लपवलेला स्पाय कॅमेरा आणि रेकॉर्डिंग डिवाइस हस्तगत केले होते. त्याची कॉपी नसेलतर खुनाचा कसलाच पुरावा कोणालाच मिळणार नव्हता! त्याचे आणि बुटक्या टकल्याचे कनेक्शन राघवच्या हाती लागण्याची एक अंधुक शक्यता होतीच! […]
लोकसत्ताच्या दि. १७ फेब्रुवारी च्या ‘लोकरंग’ पुरवणीमधील गुलजार यांचा लेख सुंदर आहे, पण तो ललित लेख स्वरूपाचा आहे. हा लेख म्हणजे गुलजार यांच्या गालिब समजून घेण्याचा पुन:प्रारंभ आहे, असें लोकसत्ता म्हणताहे. तेव्हां पुढील लेखांची वाट पहावी लागेल. मात्र हेंही खरें की प्रस्तुतचा लेख वाचून बराचसा अपेक्षाभंग झाला. गुलजार यांच्याबद्दल पूर्ण आदर राखूनही असें म्हणावेसें वाटतें की, ‘मिर्झा गालिब’ ही आपली टी. व्ही. मालिका काढायच्या वेळीं गुलजार यांनी जी पटकथा, स्क्रिप्ट लिहिलें असणार, त्या ‘पोतडीतून’ हा ललित लेख बाहेर काढलेला आहे. […]
मी चोचीने पंखात अडकलेली ती शुष्क काडी काढून टाकली. चोचीनेच पंखाची पिस सारखी केली. तेव्हड्यात माझे लक्ष समोर गेले. तो लिंग देह एका वृद्ध स्त्रीचा होता. मी माझ्या एकुलत्या एक डोळ्याने निरखून पहिले. तीने साधारण साठी ओलांडलेली होती. म्हणजे बऱ्यापैकी जगलेली होती. खात्यापित्या घरची असावी. तरी पण ती दुःखी दिसत होती. […]
मनोहरच्या घरात राघवला काहीच क्लू लागला नव्हता. सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे त्याच्या सोबत त्याचा मोबाईलही चाकाखाली चिरडला गेला होता. त्या मोबाईलच्या कॉल हिस्ट्रीत खुन्याच्या पाऊल खुणा असण्याची शक्यता होती. खरेतर खून झाल्या दिवशी राघव ज्या ठिकाणी होता त्याच ठिकाणी आजही होता. प्रगती म्हणावी तर शून्य! […]
अजयची बस रामगड थांब्यावर पोचली तेव्हा संध्याकाळचे सात वाजून गेले होते. रामगड हे एक छोटे तालुक्याचे गाव होते. दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने आता थोडी विश्रांती घेतली होती. मात्र वातावरण कुंद होते व हवेत प्रचंड गारठा आला होता. बसच्या दिवसभराच्या प्रवासाने अजय खूप वैतागला होता. […]
अनपेक्षितपणे तो बुटका टकलू ढाब्यातून वेगाने धावत हायवे कडे पळत होता, त्याच्या मागे राघव होता. क्षणात त्या बुटक्याला चिरडून तो राक्षसी ट्रक निघून गेला होता. रुद्राला हे नाट्य तो उभा होता तेथून दिसत होते. मेंदूने या सर्वांचा अर्थ लावेपर्यंत काहीवेळ तो एका जागी स्तब्ध उभा राहिला. या अपघातून तो बुटका वाचणे शक्यच नव्हते. […]
राघवला जेम तेम तीन तासाची झोप मिळाली होती. तो सकाळी आठच्या सुमारास तयार झाला होता. आज बरीच कामे होती. त्याने मोबाईल ऑन केला. जाधवकाकाचे दोन मिस्ड कॉल दिसत होते. तसाही तो त्यांना फोन करणारच होता. “हॅलो,जाधवकाका तुमचे दोन मिस्ड कॉल दिसतायत!” “सर, सकाळीच शकीलशी बोलणे झाले. काल रात्री तुम्ही धम्माल केलीत म्हणे. ” “धम्माल कसली काका? […]