नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

हम नही सुधरेंगे

आज भारतात सगळीकडेच जी बेशिस्त माजली आहे त्यावर गोष्टीतून केलेलं खुसखुशीत भाष्य…. […]

अशी ही व्यापाराची तर्‍हा

कैरोमधल्या पिरॅमिडबद्दल शाळेत असल्यापासून कुतूहल होतंच. Chariots of Gods आणि इतर काही पुस्तकांमधून पिरॅमिड व तत्सम इतर अवाढव्य कलाकृतींबद्दल वाचून त्याविषयीचे आकर्षण वाढले. एवढे अवाढव्य काम कोणी केले असेल, कशासाठी केले असेल याची उत्सुकता निर्माण झाली. ‘चॅरिएट्स ऑफ गॉड’ मध्ये ब-याच आश्चर्यकारक जागांचा व बांधकामांचा उल्लेख आहे. हिस्ट्रीचॅनलवर तेंव्हा एक‘ एनशियंट एलियन्स ’म्ह्णून एक मालिकाही बघण्यात आली व नास्काच्या रेषा, पिरॅमिड्स, चीनची भिंत वगैरे ब-याच माहितीची भर पडली.त्यातल्या त्यात  पिरॅमिडस हे जरा जवळचे वाटले. म्हणून पिरॅमिडच्या तीव्र ओढीने आम्ही इजिप्तचा विचार करू लागलो म्हटले तरी चालेल. […]

फणस (लघु कथा)

डोंगरे डॉक्टरांचे म्हणणे लोकांना किती पटले कोणाक ठाऊक.कारण गाव तसे अंधश्रद्धाळू. भुता खेतांचे अस्तित्व मानणारी बहुतेक माणसे. महादूची ही हकीगत गावात सगळीकडे पसरली,  त्याला तिखट मीठ लाऊन शेजारच्या गावात पण पोचली आणी त्यानंतर जयरामचे भूत नंतर अनेकांना त्या रस्त्यावर वडाच्या झाडा जवळ सगळ्यांना दिसू लागले. […]

मै भी चौकीदार?

भादूर. आमच्या सोसायटीचा वाॅचमन. त्याचं नांव ‘बहादूर’, पण तो ‘भादूर’ असा उच्चार करतो, म्हणून आम्हाही त्याला भादूरच म्हणतो. नेपाळकडचाच आहे. आडनांव माहित नाही. विचारल्यावर एकदा सांगितलं होतं त्याने, पण त्याचा उच्चार माझ्या कानांना इतका विचित्र वाटला, की ते लक्षात राहूनही माझ्या लक्षात राहीलेलं नाही. पण ते थापा नक्की नव्हतं. बुटकासा, गोरा, गरीब आणि प्रामाणिकही..! […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग-४

आमची भाषा टिकेल, हें ठीक. पण मग आतां स्‍वस्‍थ बसायचं कां? आपल्‍या जनजीवनात, व्‍यापार-व्‍यवहारात इंग्रजीच्‍या तुलनेने आपल्‍या मातृभाषेला दुय्यम स्‍थान मिळूं नये, असं आम्‍हाला जर वाटत असेल, तर आपण त्‍यासाठी प्रयत्‍न केले पाहिजेत. आपल्‍या भाषांना आधुनिक संदर्भात समृद्ध बनविण्‍यासाठी झटलं पाहिजे. त्‍यासाठी करायच्‍या काही गोष्‍टींकडे आपण एक नजर टाकू. […]

रुद्रा – कादंबरी – भाग १४

मनोहर ‘पंजाब ढाब्या’च्या मागच्या लॉनवर आला, तेव्हा जसवंत अधीरतेने एका कोपऱ्यातल्या टेबल जवळ  उभा असलेला दिसला. मनोहरने आसपासचे निरीक्षण केले. लॉनवर फारशी गर्दी नव्हती. बहुतेक सुटे सुटे टेबल होते. जसवंतच्या टेबलच्या आसपास कोणी नव्हते. दूर एक मुसलमान आपल्या मुलासोबत काहीतरी खाण्यात दंग होता. मनोहर निश्चित मनाने जसवंतच्या टेबलवर जाऊन समोर बसला. “जसवंत, राघवला तुझा संशय आला […]

एकविसाव्‍या शतकातील मातृभाषेचे स्‍थान : भाग ३

एक गोष्‍ट आम्‍ही ध्‍यानात घेत नाहीं, अन् ती ही की भारताचा एकएक प्रांत युरोपातल्‍या एकएक देशाएवढा आहे. युरोपात एखादी भाषा जेवढ्या लोकांची मातृभाषा आहे, तेवढ्याच, किंवा संख्‍येने त्‍याहून अधिक लोकांची कुठलीही एक भारतीय भाषा ही मातृभाषा आहे. […]

रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग

रामायणातील एक अनभिज्ञ प्रसंग ज्याचा उल्लेख आजपर्यंत फार कमी झाला. त्रिचूर वैद्यनाथन यांनी Working on SELF Realisation ह्या समूहावर एक लिंक सामायिक केली आहे. त्यातील कहाणीचे मराठी भाषांतर सादर करीत आहे. रामायणातील फारशी माहित नसलेली एक कथा […]

विलेक्शनचा फार्स

नाटकाचे अनेक प्रकार असतात. त्यातल्या ‘फार्स’ ह्या नाट्य प्रकारात, सध्याचं मुख्यतः द्विपात्री आणि द्विसंवादी निवडणुक नाट्य फिट्ट बसतं. या नाटकात मुख्य संवाद असे दोनच, ‘मै भी चौकीदार’ आणि ‘चौकीदार चोर है’ किंवा ‘चौकीदार चोर है’ आणि ‘मै भी चौकीदार’ हे, पण वेगवेगळ्या स्वरात आणि कधीकधी तारस्वरात म्हटलेले. […]

साठा उत्तराची कहाणी

पुणे येथील सुप्रसिद्ध `पद्मगंधा प्रकाशन’ चे प्रमुख आणि मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष श्री अरुण जाखडे यांचे जीवनानुभव कहाणी त्यांच्याच शब्दात ! […]

1 382 383 384 385 386 525
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..