नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३१)

मागील भागात मी साहित्यिक देवेंद्रजी वधवा यांचा उल्लेख केला आहेच. पुन्हा एकदा नगरला एका कार्यक्रमाला योग आला. पुण्यातील ज्येष्ठ कवयित्री ऍड. संध्याताई गोळे, काव्यशिल्प पुणेच्या अध्यक्षा कवयित्री ऋचा कर्वे, सुनेत्राताई गायकवाड, विद्याताई देव यांच्या पु.ल. एक साठवण या कार्यक्रमासाठी नगरला निमंत्रण आले होते. या सर्वच कवयीत्री माझ्या सुपरिचित होत्या. […]

न्हाऊ घाल माझ्या मना

प्राणी असो वा पक्षी, त्यांना आंघोळ ही फार प्रिय असते. चिमण्यां थोड्याशा पाण्यात सुद्धा डुबक्या मारुन पंख फडफडवीत आंघोळ करतात. कावळ्याला चार थेंब मिळाले तरी त्याची आंघोळ पूर्ण होते. हत्तीला डुंबायला भरपूर पाणी लागते. म्हशींना एखाद्या डबक्यात गळ्यापर्यंत डुबवून घेतले की, बाहेर यायची इच्छा नसते. मांजर ही आंघोळीच्या ऐवजी स्वतःला चाटून पुसून स्वच्छ करुन पाण्याची बचत करते. […]

का ? हा प्रश्न (मी आणि ती)

का ? हा प्रश्न आपण कुणालाच विचारू नये.असे माझे स्पष्ट मत आहे. तसा मी तिलाही कधीच विचारला नाही. कारण तिच्या ‘ अफाट बुद्धिमतेची’ मला आधीच कल्पना आली होती. खरे तर ती माठ होती माठ . मुख्य म्हणजे तिलाही त्याची कल्पना होती. […]

हळदीला ठेवलेला आर्केस्ट्रा

हळदीला आर्केस्ट्रा ठेवलेला, पहाटे साडे तीन वाजेपर्यंत आर्केस्ट्रा चालू होता. साडे अकरा बारा वाजेपर्यंत घरातली लहान पोरं आणि स्त्रिया नाचून नाचून दमले आणि एका मागोमाग एक कमी कमी होत गेले. […]

साहित्यिकांचा सहवास – एक संस्कार (भाग ३०)

आपण आपले छंद, आवड प्रामाणिकपणे जपले की आपलेच आयुष्य हे समृद्ध, समाधानी होत रहाते. या प्रवासात जसे ज्येष्ठ, श्रेष्ठ प्रस्थापित साहित्यिक भेटले तसे नवोदित कवी, लेखक देखील माझ्या संपर्कात आले. माझी थोडीफार ओळख झाल्यामुळे मला व्याख्यानांसाठी, कार्यक्रमासाठी, पुस्तक प्रकाशनासाठी, निमंत्रणे येत राहिली. पुस्तके छापण्यासाठी तसेच प्रस्तावनेसाठी देखील अनेक पुस्तके माझ्याकडे आली, हे सर्व मी कुठलीही अपेक्षा न करता करत राहिलो. […]

गफूरभाई

दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. मी नारायण पेठेतील संस्कृती प्रकाशनच्या ऑफिसमध्ये काम करीत होतो. एके दिवशी दुपारी कुरळ्या केसांना भांग पाडलेला, सावळ्या रंगाचा, उंचापुरा माणूस समोर येऊन उभा राहिला. अंगात पांढरा झब्बा, त्यावर निळ्या रंगाचं जाकीट, खाली पांढरी सुरवार व पायात चपला. त्यांना मी ‘या, बसा’ म्हटलं. सुमारे सव्वीस वर्षांनंतर गफूरभाई पुणेकर मला भेटत होते. […]

पतंग

ती माझ्या लाइफ मध्ये आली ती एक ऍक्सीडेन्ट म्हणून. ती दिसायला मस्त होतीच पण तिचा मूळ गुण म्हणा , अवगुण म्हणा.. एन्जॉय लाईफ… […]

‘लघु’ जीवन !

बघता बघता आपले करमणुकीचे जग आक्रसत गेले. चित्रपटाची लांबी खुपायला लागली. दोन तासांपेक्षा जास्त वेळ चित्रपटगृहात बसणे म्हणजे वेस्ट ऑफ टाइम वाटू लागले. नाटके कापून “दोन अंकी” फ्लेवर मध्ये सर्व्ह व्हायला लागली. पुढे जाऊन दीर्घांक ( मध्यंतर विरहित सलग नाट्यानुभव देणारे) सादर व्हायला लागले. टीव्हीवरील मालिका २० मिनिटांमध्ये करमणुकीचा समर्थ डोस देऊ लागल्या. कादंबरीची कथा आणि नंतर “अलक ” ( अति लघु कथा ) झाली. महाकाव्यांच्या “चारोळ्या ” झाल्या. […]

डायरीतील विस्कटलेली पाने – भाग दोन

ही डायरी वाचण्यासाठी उघडली. पहिल्याच पानावर ठळक अक्षरात लिहिलं होतं, ‘देशाचा इतिहास संपवा, संस्कृती संपेल. इतिहासाला गाडून टाका, भविष्य पोरकं होईल!’ हे काहीतरी भयावह होतं. अनाकलनीय होतं. मेंदूला झिणझिण्या आणणारे शब्द होते. काय असावा त्याचा अर्थ? कुणाची होती ही डायरी? कुणी लिहून ठेवली? ‘त्या’टॅगलाईन मधून काय सुचवायचं होतं? […]

1 … 303 304 305 306 307 … 526
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..