मला चित्रकलेची आवड लहानपणापासून होती. मी दादरच्या बालमोहन विद्यामंदिर शाळेत जात होते. घर शाळेच्या अगदी जवळ असल्यामुळे आमचे चित्रकलेचे सर मला सुस्वागतमची रांगोळी काढायला बोलवत असत. त्यांचा मला जास्त सहवास मिळायचा व ते मला चित्रकलेबद्दल बरेच सांगायचे. आमच्या शाळेत प्रत्येक वर्गाचं दरवर्षी एक मासिक काढलं जायचं, त्याचं मुखपृष्ठ नेहमी मीच काढत असे. […]
माझा मोठा भाऊ सुरेश त्याच्या दोन मित्रांना घेऊन कुठल्यातरी नाटकातले संवाद सादर करायचा. घरातल्या हॉलमध्ये आईच्या काही नऊवारी साड्या किंवा रोज वापरायच्या चादरी इकडे तिकडे लटकावून त्यांचं स्टेज तयार व्हायचं. आम्ही बाल गोपाळ , मित्रमंडळी हे सगळे त्यांचे प्रेक्षक असायचो. […]
हॅलो .. ग्लोबल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर… कॅन्सर वॉर्ड, हेड नर्स प्रमिला बोलते आहे ! मी आपली काय मदत करू शकते? ” फोनची रिंग वाजताच रिसीवर कानाला लावत नेहमीच्याच यांत्रिक पद्धतीने प्रमिला मावशींनी उत्तर दिलं… पण समोरून कोण बोलतंय हे समजताच तो यांत्रिक पणा नाहीसा झाला, चेहऱ्यावर प्रसन्न हास्य पसरलं आणि अत्यंत प्रेमळ स्वरात त्यांनी विचारपूस […]
मला आजही लख्खं आठवतंय, आजीचं एक पालूपद …. तुला “अनुभव” येईल नं तेव्हां कळेल. मी म्हणायची, ‘आजी कुठून ग येईल तो अनुभव ?’
‘अगं, तो काही असा सांगून येत नाही वेडाबाई. तुझं तुलाच जाणवेल हो.’ […]
शब्द हे तुम्हाला अज्ञात प्रदेशात नेणारे पूल बांधत असतात ” असे हिटलर त्याच्या भाषणांत नेहमी म्हणत असे. माझा एक वर्गमित्र ( ज्यांना वर्गमैत्रिणी नसतात त्यांना नाइलाजाने वर्गमित्र असतात. ज्याप्रमाणे ज्यांना सुंदर मेहुण्या नसतात त्यांना श्रावण न पाळणारे दोन भरभक्कम मेहुणे असतात त्याचप्रमाणे.) […]
जुन्या मुंबईत चहाचे हॉटेल आणि पाव-बिस्कुटाची बेकरी हे दोन धंदे प्रामुख्याने भंडारी लोकांच्या हातांत होते. सबंध मुंबईला ब्रेड, पाव, लिमजी बिस्किटे या भंडारी बेकऱ्याच पुरवीत असत आणि गोऱ्या लोकांच्या खाणवळीतही त्या ब्रेड पावांची लज्जत वाखाणली जात असे. काही भंडारी हॉटेलात चहाशिवाय मांसाहाराची फार चोखट सोय असे आणि अशी तीन-चार जुन्यांतली जुनी भंडारी हॉटेले कोटांत नि गिरगांवात अजून चालू आहेत. भंडारी हॉटेलातच चहा मिळत असल्यामुळे, बामणांची पंचाईत व्हायची. […]
सोंडू पाटलाच्या शेतातं भैमूंग सोंगायची लगबग चालू व्हती.नव्हाळीच्या चार शेंगा लेकरायच्या तोंडी लागतील मणून सगळं गांव पाटलाच्या शेतात उलथलं व्हत.त्याल कारणबी तसच होतं.सोंडू पाटील गावातला दिलदार माणूस समजला जायचा,पण परतेक्षात मात्र त्यो लयचं बेरकी आन धुर्त व्हता.! त्याच्या हातून चार शेंगा जास्त सुटायच्या.त्यालं कुठं,कव्हा आण कसे हात मोकळे सोडायचे,ही कला अवगत व्हती.आवळा देऊन कोव्हळा काढण्याच्या बाबतीत […]
कदाचित माझा प्रवास हिंसेकडून अहिंसेकडून सुरु झालेला आहे कदाचित तो तेंव्हाच सुरु झाला होता जेंव्हा वीस वर्षापुर्वी मी मांसाहार सोडून शाकाहारी झालो होतो… […]
कळत-नकळत घडणा-या अनेक गोष्टिंचा भार शेवटि ”नशिब” नावाच्या ऐरणीवर येऊन आदळतो.माणसाच्या जीवनभ्रमंती मध्ये सुख-दुःखाच्या वळणावर ‘कधी हासु तर कधी आसु’ व्यक्त होत असतात. […]
आठवी ‘ ब ‘ च्या वर्गातील त्या ” चौकडी ” चे डोळे भिंतीवरील घड्याळा कडे लागले होते..कधी एकदा त्या घड्याळात दोन चे ठोके पडतात आणि कधी मधली सुट्टी होते.!!!.. असं या चौघांना झालं होतं…. मधल्या सुटीची घंटा वाजली तसं चौघे म्हणजे रोहन, मनोज, अजित आणि दीपक म्हणजेच दिपू… वर्गातून पळत सुटले ते सायकल स्टँड कडे …. […]