नवीन लेखन...
Avatar
About संदीप सामंत
संदीप सामंत हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक आहेत.

आठवावेसे वाटले म्हणून( उत्तरार्ध )

‘टीब्रेक’ नंतर गोलंदाजांनी आपला एण्ड बदलावा तसा विषय बदलून मी गाडी हळूच त्यांच्या करीअरकडे वळवतो. गाडी मला हव्या त्या स्टेशनवर ,इंग्लंडच्या १९६३/६४ च्या भारत दौऱ्यावर येऊन थांबते.पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिला, १० जानेवारी ते १५ जानेवारी १९६४ दरम्यान खेळला गेलेला, मद्रासच्या नेहरु स्टेडियमवरचा कसोटी सामना. दुसऱ्या दिवसअखेर धावफलक ….. भारत..पहिला डाव….७ बाद ४५७ ( डाव घोषित…. बुधी […]

आठवावेसे वाटले म्हणून (पूर्वार्ध)

मी आणि व्ही.पी. सिंग आम्ही दोघेही संभ्रमावस्थेत असण्याचा तो १९८८-८९ चा मंतरलेला काळ होता. पंतप्रधान बनण्याच्या कल्पनेने ते आणि कॉन्ट्रॅक्टर बनण्याच्या आशेने मी ,असे आम्ही दोघेही पछाडलेले होतो. निर्माता, दिग्दर्शक आणि नायक बनण्याच्या कल्पनेने महेश कोठारे ( डँम इट ) ‘झपाटलेला’ होता जवळपास तसेच. […]

बोलावेसे वाटले म्हणून

शब्द हे तुम्हाला अज्ञात प्रदेशात नेणारे पूल बांधत असतात ” असे हिटलर त्याच्या भाषणांत नेहमी म्हणत असे. माझा एक वर्गमित्र ( ज्यांना वर्गमैत्रिणी नसतात त्यांना नाइलाजाने वर्गमित्र असतात. ज्याप्रमाणे ज्यांना सुंदर मेहुण्या नसतात त्यांना श्रावण न पाळणारे दोन भरभक्कम मेहुणे असतात त्याचप्रमाणे.) […]

हसावेसे वाटले म्हणून

तुम्ही शेवटचे मनमुराद,खळखळून ,मोठ्याने कधी हसलाय ?गेल्या आठवड्यात ? गेल्या महिन्यात ? आठवतंय ?
मी काल रात्रीच हसलो. निमित्त होते “शहेनशहा ” सिनेमाचे. सवयीने चॅनल सर्फिंग करता करता अचानक, जगदीप मिनाक्षी शेषाद्रीच्या मसाज पार्लरमध्ये गेल्याचा प्रसंग सुरु असल्याचे माझ्या नकळत माझ्या डोळ्यांनी माझ्या बोटांना सांगितले आणि ते बेटे पुढे सर्फिंग करायचंच विसरले. […]

सांगावेसे वाटले म्हणून – शोले

यंदाच्या ऑगस्ट महिन्यात १५ तारखेला “शोले” या चित्रपटाने ५० वर्षे पूर्ण करुन ५१ व्या वर्षात पदार्पण केले. सिनेरसिकांची पिढी दर १० वर्षांनी बदलते म्हणतात. या हिशेबाने सिनेरसिकांच्या जवळपास ५ पिढया “शोले “च्या अंगाखांद्यावर खेळल्या. आम्ही आमच्या पहिल्या पॉकेटमनीमध्ये आणि नवसाच्या पहिल्या वहिल्या फुलपॅण्टमधे शोले पाहिला. माहीमच्या “बादल” मध्ये तेव्हा ४ रुपये ४० पैसे स्टॉलचे तिकीट होते. आणि ५ रुपये ५० पैसे बाल्कनी.तेव्हढे पैसे तर मला वाटते आजकाल भिकारीदेखिल घेत नाहीत. मरण सोडून बाकी सगळ्याच गोष्टी मधल्या काळात कमालीच्या महागल्या. […]

लिहावेसे वाटले म्हणून

दादर चौपाटीच्या वाळूसारखे मुठीतून निसटून गेलेले, रुपेरी पडद्याला साक्षीला ठेऊन, स्वतःच्या घरापेक्षाही जास्त आपलेपणा वाटणाऱ्या अंधाऱ्या थिएटरमध्ये अनुभवलेले ते मंतरलेले क्षण आम्ही कायमचे गमावले. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..