नवीन लेखन...

विविध प्रकारचे मराठी साहित्य या विभागात वाचायला मिळेल…

दान आणि मान

वटसावित्री पौर्णिमा.. आम्हा बायकांचा अतिशय जिव्हाळ्याचा दिवस असतो वडाच्या पुजेची तयारी पारंपरिक पोषाख आणि श्रद्धेने भक्तीने अखंड सौ भाग्याचे लेण मिळावे म्हणून वडाला दान मागायचे असते गावी असतांना वडाच्या पुजेला जात होते पण नंतर मात्र घरीच वटवृक्षाच्या पुजेचे चित्र मिळायचे ते आणून एका खपटावर डकवून पुजा करते आहे आजही फक्त दोरा घेऊन फेरी मारता येत नाही म्हणून त्याचे सातपदरी फोटोतल्या वडाला चिटकवते पूर्वी सात प्रदक्षिणा घालायची आता नाही. […]

पैली ते सात्वी

इयत्ता पहिली ते सातवीपर्यंत वडीलांकडून आणि आमच्या गुरुजींकडून मी जो मार खाल्लाय, तो मी कधी जन्मात विसरणार नाही. या माराने मला जीवन शिक्षणाचे पहिले धडे दिले. आमच्या मराठी शाळेचे नावच मुळी होते, ‘जीवन शिक्षण विद्यामंदिर.’ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तालुक्यात फोंडाघाट या गावातली ही प्राथमिक शाळा अख्ख्या पंचक्रोशीत गाजलेली. […]

भुयारी

पोरगं बाहेर आलं. हातातल्या मळक्या कपड्याने त्याने टेबल साफ केलं आणि उचलावी की उचलू नये असा विचार करत ती नोट त्याने गल्ल्यावर नेऊन दिली. ‘क्या गंदा काम करता है!’ एवढच पुटपुटत तो आत निघून गेला. […]

बूमरॅंग

काही वर्षांनी दिपक इतका आळशी झाला की, त्याचे सहीपासूनचे सर्व व्यवहार संतोषच सांभाळू लागला. संतोषला काही वेळा, एक विचार सतावत रहायचा की उद्या दिपकनं आपल्याशी भांडून हाकलून दिलं तर आपली अवस्था अतिशय वाईट होईल.. त्यासाठी एकदा त्यानं दिपकला विनंती केली की, माझ्या नावावर ठेवायला काही पैसे देतोस का? त्यावर दिपक म्हणाला अरे, सर्व पैसे तुझ्याच खात्यावर असताना अजून तुला काय हवं? संतोष हे ऐकून, गप्प रहायचा.. […]

प्रतिकृती (कथा)-भाग-२

आमच्या गावात गोविंदभट नावाचे एक कीर्तनकार होते. रामनवमी, हनुमान जयंती, कृष्णाष्टमी अशा निरनिराळ्या धार्मिक प्रसंगी आणि एरवीही, आठवड्यातून एक-दोन वेळा गावातल्या राममंदिरात गोविंदबुवांचं कीर्तन असायचंच. बरेच वेळा मी आईबरोबर कीर्तनाला जात असे. म्हणजे आईच मला घेऊन यायची. हे बुवा आमच्या वाड्यावरसुद्धा घरच्या देवांची पूजा करायला रोज सकाळी यायचे. बुवांची आणि माझी चांगली गट्टी जमायची. तर सांगायचा […]

चैत्राची चाहूल (असाही एक वसंतोत्सव)

वसंत ऋतूची हीच तर गंमत आहे. निसर्ग साद घालतो आणि बाहेरच्या पानगळी बरोबर आपला आळसही गळून जातो. कोणत्याही झाडोऱ्यात फांदी हलली की स्थिर होऊन पहावे. कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाचे बागडणे अव्याहतपणे चालू असते. हीच माझ्या बागेभोवतीच्या चैत्रबनातून जाणवणारी चैत्राची चाहूल. हाच माझा वसंतोत्सव. […]

गंगा दशहरा

जेष्ठ शुक्ल प्रतिपदा गंगादशहरा सुरू होत आहे. फार पूर्वी पासून ही प्रथा आहे पण स्वरूप बदलून गेले आहे. या दिवशी गावाजवळील नदीवर तिला गंगा नदी समजून अंघोळ करत असत. बायका आणि नदीची पुजा करुन खणानारळाने तिची ओटी भरत असत. आणि बहुतेक नदीकिनारी एखादे मंदिर असायचेच. तिथेही दर्शन एखादे फळ म्हणजे आंबा समोर ठेवून प्रार्थना केली जायची.. तेथील पुजारी. पुरोहित जे कोणी असत त्यांनाही दहा आंबे. एखाद्या नवीन ताटात. तबकात. गहू व दक्षिणा देत असत. पुढे हे सगळे घरी बोलावून केले जायचे. आजही काही ठिकाणी अशीच प्रथा आहे. […]

म्हातारा न इतुका

१९९२ साली राॅबर्ट जेम्स वाॅलर यानं लिहिलेली, त्याच नावाची कादंबरी प्रकाशित झाली. त्या कादंबरीची ९.५ दशलक्षची विक्री होऊन, अल्पावधीतच ‘बेस्टसेलर’ ठरली. १९९४ साली क्लींट ईस्टवुडने त्यावर चित्रपट करायचे ठरविले. ५२ दिवसांच्या शेड्युलच्या, पेपरवर्कनुसार शुटींग सुरु झाले. सर्व सहकाऱ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागाने, दहा दिवस आधीच चित्रीकरण पूर्ण झाले. २ जून १९९५ रोजी हा चित्रपट जगभरात प्रदर्शित झाला. चित्रपटाने १८२ दशलक्ष डाॅलर्सचा अभूतपूर्व व्यवसाय केला!! […]

प्रतिकृती – भाग १ (कथा)

नुसतं नाव सांगायचं, तर त्यासोबत ही आगगाडी कशाला? असं तुम्ही म्हणाल. सांगतो. मी आहे शास्त्रज्ञ. जैविकशास्त्रात मी संशोधन करतो. आता आलं ना लक्षात? शास्त्रज्ञ, प्रोफेसर, कलाकार म्हटला की त्याचा एखादा स्क्रू’ ढिला असणार अशी लोकांची समजूत असते. […]

बालमोहन विद्यामंदिर

दादासाहेब रेगे हे व्यक्तिमत्त्व काय होतं, आणि त्यांच्या बालमोहनने आपल्या बाळांना काय दिलं, हे प्रत्येकजण सांगू लागला असता, तर एक सप्ताहच आयोजित करावा लागला असता. आपण एका मराठी शाळेत शिकलो, याचा सार्थ अभिमान, उपस्थित प्रत्येक कीर्तिवंताच्या बोलण्यातून डोकावत होता. […]

1 135 136 137 138 139 489
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..