नवीन लेखन...

प्रतिकृती – भाग १ (कथा)

माझं नाव बाजीराव दौलतराव थोरात. राहणार- वडनेर, ता. शिरूर. जि. पुणे. राज्य महाराष्ट्र, देश-भारत.

नुसतं नाव सांगायचं, तर त्यासोबत ही आगगाडी कशाला? असं तुम्ही म्हणाल. सांगतो. मी आहे शास्त्रज्ञ. जैविकशास्त्रात मी संशोधन करतो. आता आलं ना लक्षात? शास्त्रज्ञ, प्रोफेसर, कलाकार म्हटला की त्याचा एखादा स्क्रू’ ढिला असणार अशी लोकांची समजूत असते. आता न्यूटन एवढा मोठा शास्त्रज्ञ. पण त्याने म्हणे आपल्या दोन मांजरांसाठी दरवाजाला दोन भोकं, एक मोठं आणि एक लहान पाडून ठेवलेली होती. मांजरांना येता-जाता यावं म्हणून. ही कथा सगळ्यांना माहीत आहे. खरी खोटी कोण जाणे. पण शास्त्रज्ञ हा प्राणी जरा ‘हा’च असतो या समजूतीखाली ही गोष्ट खपते. आणखी समजूत म्हणजे अशा मंडळींना टोकदार छोटीशी दाढी असते. जाड काचांचा चष्मा, ढगळ पँट, काहीसा बावरल्यासारखा चेहरा म्हणजे एकूणच काय एखादं बावळट ध्यान अशी प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते. म्हणजे ‘विक्षिप्तपणा’ हे लक्षण! आता मी जी गाडी सोडली होती त्याचं तुम्हाला फारसं आश्चर्य वाटत नसणार!

पण तसं काही नाही बरं का. मी आपला तुमच्यासारखाच साधा माणूस आहे. पण मी जेव्हा परदेशात संशोधनासाठी गेलो होतो ना तेव्हापासून मला ही लांबसडक पत्ता सांगायची खोड लागली बघा. पत्र पाठवताना हा सगळा पत्ता लिहायला लागायचाच हो!

तर सांगायचा मुद्दा, माझं नाव आणि पत्ता कळल्यावर हा गृहस्थ हातात नांगर धरून शेतीवाडी न करता, गेला बाजार एखादा पुढारी न बनता थेट एक शास्त्रज्ञ कसा काय झाला बुवा असा प्रश्न तुमच्या मनात येणारच. म्हणजे प्रश्न तसा गैर नाही. अहो पवार, पाटील, शिंदे, थोरात, घोरपडे वगैरे मंडळी एकतर शिवाजी महाराजांच्या किंवा पेशव्यांच्या दरबारात किंवा आताच्या काळात मंत्रालय किंवा विधानमंडळात बस्तान जमवून असणार ही ठाम समजूत! तिथे हा पठ्या चक्क एक शास्त्रज्ञ? सांगतो.

तसं आमच्या गावी आमचा बक्कळ जमीनजुमला, शेतीवाडी आहेच. शिवाय एक जुना वाडा, गढीच म्हणाना, ती पण आहे. ‘थोरातांची गढी’च म्हणतात तिला.

मी आमच्या आबांचा दुसरा मुलगा. आम्ही दोघंच भाऊ, बहिणी नाहीत. मी धाकटा म्हणून आईचा फार लाडका, जरा इकडेतिकडे गेलो की तिचं सुरुच.

‘बाज्या कुठे आहेस रे?’ मोठा झालो तरी तिच्या डोळ्यांसमोर असल्याशिवाय तिला काही चैन पडायचं नाही. मोठा भाऊ राजकारणात आहे, आमदार आहे. घरचं खाऊन लष्करच्या भाकरी भाजायचं काम चालूच असतं त्याचं. मग मी माझी लाईन कशी बदलली? सांगतो.

-विनायक रा. अत्रे
(‘कथागुच्छ’ या कथासंग्रहातून)

विनायक रा अत्रे
About विनायक रा अत्रे 91 Articles
श्री विनायक अत्रे हे महाराष्ट्र शासनाचे सेवानिवृत्त मुख्य वास्तुविशारद (Retd Chief Architect) आहेत. हास्यनाटिका, कथासंग्रह, काव्यसंग्रह तसेच विविध मासिके, नियतकालिके आणि दिवाळी अंकांतून त्यांनी विपुल लेखन केले आहे. त्यांनी बालगोपालांसाठी अनेक पुस्तके, एकांकिका वगैरे लिहिल्या आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..