नवीन लेखन...

प्रतिकृती (कथा)-भाग-६

साधारण दहा-पंधरा मिनिटांचा अवधी गेला असावा. कुपीच्या तळाशी पायांची बोटं पूर्ण वाढलेली दिसू लागली. हळूहळू सगळं पाऊल आणि नंतर वरवर वाढत वाढत गुडघ्यापर्यंत पूर्ण पाय! मग वरवर जात जात मांड्या, कंबर पोट, हात, छाती असा क्रमाक्रमाने संपूर्ण आमदार प्रकट झाला! ही प्रक्रिया सुमारे सहा तास चालली होती. पण आम्हाला त्याची अजिबात जाणीव झाली नाही! ते अद्भुत […]

प्रतिकृती (कथा)-भाग-५

दादाचा विश्वासच बसेना. ती त्याला संशोधनाची माहिती सांगितली. आता मी प्राणी किंवा माणूस एक दिवसापासून एक वर्षापर्यंत जिवंत ठेवू शकतो इतकी प्रगती केली आहे हेही सांगितलं. त्याला हे पण स्पष्ट केलं की हे अत्यंत गुप्त संशोधन आहे आणि याची वाच्यता कुठेही करू नकोस. नंतर घरातल्या देवासमोर बेलभंडारा उचलून मी त्याच्याकडून गुप्ततेची शपथ वाहून घेतली. एवढं होऊनही […]

प्रतिकृती (कथा)-भाग-४

आता माझ्या मनात मानवी प्रतिकृती निर्माण करावी असे विचार येऊ लागले. जोपर्यंत उंदीर, सशांवर भागत होतं, तोपर्यंत काही अडचण नव्हती. पण एखादा माणूस निर्माण करायचा ही फार गंभीर, धोकादायक आणि अवघड, जवळजवळ अशक्यप्रायच गोष्ट होती. यासाठी मला कुणीतरी विश्वासू मदतनीस लागणार होता. माझ्या शोधाची घरातच काय पण इतरत्रही कुणाला माहिती नव्हती. एक वेडा शास्त्रज्ञ म्हणून कुणी […]

प्रतिकृती (कथा)-भाग-३

गावी पोचायला दोन दिवस लागले. आई शेवटच्या घटका मोजत होती. मला पाहून तिला खूप बरं वाटलं आणि आश्चर्य म्हणजे तिची प्रकृती सुधारू लागली. पण तिने एकच ध्यास घेतला, “बाज्या, आता तू पुन्हा जाऊ नकोस. पुरं झालं ते संशोधन! तुला इथे काय कमी आहे. तू आता इथेच माझ्याजवळ राहा. लग्न कर, मला नातू पाहू दे.” तसं तर […]

प्रतिकृती (कथा)-भाग-२

आमच्या गावात गोविंदभट नावाचे एक कीर्तनकार होते. रामनवमी, हनुमान जयंती, कृष्णाष्टमी अशा निरनिराळ्या धार्मिक प्रसंगी आणि एरवीही, आठवड्यातून एक-दोन वेळा गावातल्या राममंदिरात गोविंदबुवांचं कीर्तन असायचंच. बरेच वेळा मी आईबरोबर कीर्तनाला जात असे. म्हणजे आईच मला घेऊन यायची. हे बुवा आमच्या वाड्यावरसुद्धा घरच्या देवांची पूजा करायला रोज सकाळी यायचे. बुवांची आणि माझी चांगली गट्टी जमायची. तर सांगायचा […]

प्रतिकृती – भाग १ (कथा)

नुसतं नाव सांगायचं, तर त्यासोबत ही आगगाडी कशाला? असं तुम्ही म्हणाल. सांगतो. मी आहे शास्त्रज्ञ. जैविकशास्त्रात मी संशोधन करतो. आता आलं ना लक्षात? शास्त्रज्ञ, प्रोफेसर, कलाकार म्हटला की त्याचा एखादा स्क्रू’ ढिला असणार अशी लोकांची समजूत असते. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..