उभा तुझ्या अंगणी स्वरांचा “अबोल” हा पारिजात आहे!
भुदरगड येथील साहित्य संमेलनात प्रसिद्ध लेखक -शिवाजी सावंत म्हणाले होते- “अश्रुंचे वय किती ?” डोळ्यात उगवल्यापासून ते ओघळून जाईपर्यंत (किंवा डोळे कोरडे होईपर्यंत)कां खूप आधीपासून (आत खोलवर साठल्यापासून ते कधीच बाहेर न येईपर्यंत?) लताच्या स्वरांचे वय काय? कानावर पडल्यापासून ते विरून जाईपर्यंत की मी जन्मल्यापासून आजतागायत जे मी आत साठवून ठेवलंय (आणि जे माझ्याबरोबरच संपेल) तेथपर्यंत? […]
