बहुआयामी व्यक्तिमत्व वीर सावरकर – ४ – सावरकरांची गुण ग्राहकता
सावरकरांनी १९२९ साली सन्यस्तखड्ग नाटकावर पुण्याच्या श्री. वि.ना. कोठीवाले यांनी टीकात्मक लेख लिहिला तो वाचून सावरकरांनी त्यांना भेटीसाठी बोलावले. व म्हणाले “ तुम्ही माझ्या भाषेतल्या दोषावर टीका केलीत ती बरोबर आहे.पण मराठी नाटके बहरत असताना मी अंदमान येथे तुरुंगात होतो,त्यामुळे मला सद्यस्थितीतिल नाटकाची भाषा अवगत नाही, मी मराठी नाटकेही मी पहिली नाहीत,पण नाटकाच्या नावाचे जे विवेचन केले आहे ते अगदी योग्य आहे. व लोकापुढे मांडून माझं ध्येय साध्य केले आहे.” […]
