प्रत्यक्षातलं काही
अगदी क्वचित प्रसंगी मात्र खूप चांगला, सुखावणारा अनुभव येऊन जातो. त्या दिवशी असच झालं, मी बोरीवलीहून ठाण्याला जाणारी TMT ची वातानुकूलित बस पकडली. आत येऊन तोल सांभाळत पैसे काढण्यासाठी मी खिशात हात घालताच, कंडक्टरने अगदी आपलेपणाने मला आधी बसून घ्यायला सांगितलं. ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेल्या सीटवर बसलेल्या व्यक्तीला उठवून मला बसायला जागा दिली. […]
