देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे
गुरूवार दिनांक १३ एप्रिल २०१७ हा दिवस बोरिवलीकरांच्या, विशेषत: प्रबोधनकार ठाकरे सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या, कायमचा स्मरणात राहील. या दिवशी या वर्षातल्या सर्वात देखण्या आणि भारदस्त कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचा योग बोरिवलीकरांना आला. कार्यक्रम होता बोरिवलीच्या ‘जनसेवा केंद्रा’ने आयोजित केलेला जगद्विख्यात सिद्धहस्त चित्रकार श्री. वासुदेव कामत यांच्या सत्काराचा आणि तो ही साक्षात परमपुजनीय सरसंघचालक डाॅ. मोहनराव भागवतांच्या […]
