नवीन लेखन...

अरूणाचल प्रदेश – अनोळखी प्रवास पथांचा शोध

भारताच्या पूर्वेकडील टोकावर, जिथे उगवता सूर्य पहिल्यांदा हिमालयाच्या कुशीत हसतो, त्या भूमीतील काही ठिकाणं नकाशावर दिसतात, पण त्यांचं सौंदर्य मनाने अनुभवावं लागतं – तेव्हाच प्रवासाचा अर्थ उमगतो. ‘तवांग’ आणि ‘सेला खिंड’सारख्या प्रसिद्ध ठिकाणां पलीकडेही अरूणाचल प्रदेशात अशा अनेक अद्भुत जागा आहेत – ज्या तुम्हाला अनोख्या संस्कृतींच्या, निसर्गाच्या आणि मानवी साधेपणाच्या जवळ नेतात. चला, या भागात करूया अशाच काही “गुप्त रत्नांचा” शोध, ज्यामुळे तुमचा पुढचा प्रवास एक नवीन अनुभव ठरेल. […]

अरुणाचल प्रदेश – उगवत्या सूर्याची भूमी (लँड ऑफ rising sun)

भारताच्या नकाशाकडे पाहीलं, की पूर्वेकडच्या टोकाशी डोंगररांगांमध्ये सामावलेलं एक राज्य आपल्याला दिसतं – अरुणाचल प्रदेश. नावाप्रमाणेच भारतात सर्वप्रथम सूर्य इथेच डोकावतो. सकाळच्या पहिल्या किरणांनी हिमालयाच्या कड्यावर पडलेलं सोनसळी तेज, दऱ्यांमधली धुक्याची चादर आणि शांत डोंगर वेडं वातावरण – प्रवाशाला नकळत मोहवून टाकतं. […]

मार्मोरिस प्रवासगाथा – जग पाहण्याची गाथा

ही २६ भागांची मालिका भारतातील ओळखीची पण अनुभवल्याशिवाय राहून गेलेली आणि काही अनपेक्षित आश्चर्यानी भरलेली, अनुभवासाठी सज्ज असलेल्या स्थळांची गाथा आता मराठीसृष्टी च्या वाचकांसाठी येत आहे. प्रत्येक लेखात एक नवीन destination, त्याची संस्कृती, स्थानिक खाद्यसंस्कृती, व्यवहार्य प्रवासटिप्स आणि आपला अनुभव समृद्ध करणाऱ्या खास मार्गदर्शक सूचना असतील. […]

सहा दिवसांत सात जागतिक आश्चर्य पाहण्याचा विक्रम

सात दिवसांपेक्षा कमी कालावधीत जगातील सात आश्चर्यांना भेट देण्याचा विक्रम जेमी मॅकडोनाल्ड याने केला आहे. ‘ॲडव्हेंचरर’ या टोपण नावाने प्रसिद्ध असलेला जेमी हा ब्रिटिश नागरिक आहे. […]

सेरेंगेटीतील श्वापदांचे अदभुत स्थलांतर

सफरीत ओढे, नाले, नद्या ओलांडण्यासाठी श्वापदांची एक रांगेत पन्नास किमी लांबीची विलक्षण रांग लागते. १९५१ साली ब्रिटिश राज्यकर्त्यांनी हा पाचहजार सातशे चौरस मैलांचा टापू ‘सेरेंगेटी राष्ट्रीय उद्यान’ म्हणून घोषित केला. श्वापदांच्या या मांदियाळीत सामील असतात, वनराज सिंह, डहाण्या वाघ, चित्ते, किंकाळी फोडणारे तरस, कोल्हे. वर आकाशात गिधाडे भक्षाच्या शोधात सतत घिरट्या घालत असतात. […]

एका बेटावरचे बलाढ्य कासव

कासवांचे पृथ्वीतलावर २२ कोटी वर्षांपासून वास्तव्य आहे. म्हणजे कासव हे सरडे, साप किंवा मगरी या प्राण्यांपेक्षा पुरातन प्राणी आहे. […]

उषःकाल होता होता काळरात्र आली

मे-जून २००८ मधला हा प्रसंग. झांझीबार बेटावरचा वीजप्रवाह कोणतीही पूर्वसूचना नसतांना एके दिवशी अचानक बंद पडला. कारण होते, या बेटाला वीज पुरवठा करणारी टांझानियाहून येणारी विद्युतवाहक तार विद्युत्मंडलासकट एकवीस मे २००८ रोजी कोसळून पडली. देशभर काळोख पसरला. एकवीस मे ला गेलेली वीज जवळ जवळ एक महिन्याने म्हणजे १९ जूनला परत आली. समुद्र-तळावरची जुनी विद्युतवाहिनी तार कमकुवत […]

झांझीबार म्हणजे प्रणयरम्य नगरी

झांझीबार आहेही तसेच, अगदी मस्त! पण अशा पर्यटन स्थळांच्या व्यवस्थापनाच्या वास्तवतेतले प्रचंड मोठे आव्हान ध्यानात येत आहे. झांझीबार पर्यटन विकास क्षेत्रात सर्वच ‘आलबेल’ नव्हते. एक खटकणारी गोष्ट म्हणजे विकास कार्यात स्थानिक छोट्या मोठ्या व्यापार्‍यांना शिरकाव प्राप्त झाला नाही. […]

1 2 3 4 28
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..