अंदमान द्वीपसमूह : भारताचा निसर्गरत्न
अंदमान व निकोबार बेटे हिंद महासागरात, बंगालच्या उपसागराच्या आग्नेयेस पसरलेली आहेत. या द्वीपसमूहात एकूण ५७२ बेटे आहेत, त्यापैकी फक्त ३८ बेटांवरच लोकवस्ती आहे. ह्या ५७२ बेटांमध्ये अंदमान बेटे ३२५ हून अधिक आहेत आणि मुख्यत्वे पर्यटनासाठी प्रसिद्ध. निकोबार बेटे त्यामानाने तुलनेने अलिप्त व तिथे मुख्यत्वे तिथल्या मूळ निवासी लोकांचे वसतयव असल्यामुळे पर्यटकांसाठी खुली नाहीयेत. अंदमान निकोबार बेटांचा समूह उत्तर–दक्षिण ८०० किलोमीटर पर्यंत पसरलेला आहे. येथे उष्णकटिबंधीय हवामान असून वर्षभर ऊन–पाऊस यांचा खेळ चालतो. ऑक्टोबर ते मे – पर्यटनासाठी उत्तम कालावधी आणि जून ते सप्टेंबर – मान्सून; पाऊस जास्त असल्याने, फारसे पर्यटक येत नाहीत. […]
