नवीन लेखन...

हंटिंगटन लायब्ररी, आर्टकलेक्शनस् आणि बोटॅनीकल गार्डनस्

लॉस एन्जीलीसजवळ प्रसिध्द ‘हंटिंगटन लायब्ररी, आर्टकलेक्शनस आणि बोटॅनीकल गार्डनस्’ ही वास्तू कित्येक मैलांवर पसरलेली आहे. १९१९ च्या सुमारास हेनरी ई. हंटिंगटन यांनी ती तयार केली. हंटिंगटन हे दक्षिण कॅलिफोर्नियातील एक विख्यात उद्योगपती होते. दुर्मिळ पुस्तकं, कला आणि वनस्पती यामध्ये त्यांना विलक्षण रस होता. जगभरातून त्यांनी दुर्मिळ ग्रंथ, वस्तू आणि विविध जातींच्या वनस्पती त्यांनी गोळा केल्या. त्यातून हे संग्रहालय तयार झाले.

या गार्डनचा विशेष असा की, तिच्यात लहान मुलांसाठी एक स्वतंत्र भाग आहे. शिवाय चायनीज, जपानीज, ऑस्ट्रेलियन, हर्ब, रोज आणि बोटॅनिकल अशा वेगवेगळ्या बागा आहेत. या शिवाय म्युझियम, लायब्ररी, गिफ्टशॉप आणि विविध कफेटिरियाज् आहेत. एका दिवसात हा संपूर्ण पार्क कोणालाही पाहाणे अवघड गोष्ट आहे. इथली लायब्ररी ही जगातील एक महत्त्वाची लायब्ररी मानली जाते. तिच्यात अकराव्या शतकापासूनचा ब्रिटीश, अमेरिकन इतिहास, साहित्य, कला, विज्ञानाचा इतिहास यांच्याविषयी अधिकाधिक संदर्भसाधने ठेवण्यात आली आहेत. लेखकांची हस्तलिखिते, वेगवेगळ्या काळात छपाई यंत्रणेत विकास; म्हटला तर त्यासंबंधी प्रत्येक टप्यावरील ती ती उपकरणं, त्यांच्या विषयीच्या संबंधितांच्या वेळोवेळी लिहिण्यात आलेली हस्तलिखिते आणि छापील टिप्पण्या, सर्व काही काळजीपूर्वक जतन करून ठेवण्यात आलेले. तेव्हा विज्ञानाच्या अनेकविध शाखांमधील, आणखी उपशाखांतील विषयांचा अभ्यास, त्यातील स्थित्यंतरे, इतर लेखकांचे लेखन, वृत्तपत्रे, ग्रंथ यांचा संग्रह इथे जाणीवपूर्वक जतन करून ठेवण्यात आलेला आहे.

या शिवाय चित्रकला, चित्रे- विशेषत: हंटिंगटन कुटुंबातील व्यक्तींची आणि तत्कालीन अमेरिकन, ब्रिटीश आणि अन्य राजकीय नेते, लेखक, कलावंत, वैज्ञानिक यांची नामवंत चित्रकारांनी केलेली पोर्टस, अनेकांची लहान मोठी शिल्पे, काचांवरील म्यूरल्स, तत्कालीन विविध वस्तू यांनी ही लायब्ररी आणि संग्रहालय समृध्द आहे. त्याच्या आजुबाजूला बाहेर मोठ्या आणि मध्यम

आकाराचे संगमरवरी आणि काळ्या रंगाचे आकर्षक पुतळेही आहेत.

या वास्तूच्या २०७ एकर जागेपैकी १२० एकर जागेवर जवळजवळ १२ मोठ्या बागा आहेत. त्यांच्यावर जगभरातून आणलेल्या नाना जातींच्या झाडावेलींची लागवड केलेली आहे. एकाच ठिकाणी विविध ऋतूंमध्ये आपल्यातील असाधारण सौंदर्य प्रकटणारी ही निसर्गसंपत्ती पाहाताना आपले मन वेडावते.

या बागांमध्ये garden of Flowing Fragrance किंवा Chinese Garden, the Desert Garden, the japanese Garden. The Rose Garden, Ceremonial Tree Garden इतक्या मोठ्या आहेत की त्या बारकाईने पाहायच्या म्हटले तर पुष्कळच वेळ जात असतो. पण त्यात आपल्याला खरेच आनंद होत असतो. याशिवाय ungle garden, subtopical garden, herb garden, rose garden, Shakespeare garden अशा विविध बागा.. तिथे आपण कधीच न पाहिलेली अशी रंगीत, नाजुक नजाकतीच्या वनस्पती, झाडे-वेली आहेत. ब्रिटिश स्थापत्यकलेचा नमुना एका इमारतीच्या रूपाने पाहायला मिळतो. तिथे जुन्या काळातील रचना जशीच्या तशी ठेवलेली आहे. चहाच्या भिन्नभिन्न रूची तिथे आपल्याला आस्वादता येतात.

इथे काय पाहावे, कॅमेऱ्याने किती टिपावे, मनात कसे साठवावे, कोणाकोणाला न्याहाळावे? असे मनात असंख्य प्रश्नांचे काहूर निर्माण होते.

इथल्या लहान मुलांच्या बागेबद्दल लिहायला हवे. त्यांची सहज करमणूक व्हावी म्हणून हेतूत: रचना करण्यात आली आहे. एके ठिकाणी लहान लहान रंगीत मासे पाण्याच्या मोठ्या टँकमध्ये ठेवलेले होते. एके ठिकाणी कासवाची, डॉल्फीनची छोटी शिल्पे पाण्याचा साठा करून त्यात ठेवलेली होती. नाजूक वेली वृक्षांची जोपासना ग्रीन हाऊसमध्ये करण्यात आलेली होती. एके ठिकाणी वरून वनस्पतींचे आवरण असलेला बोगदा होता. मुलांनी एकीकडून आत शिरायचे आणि दुसऱ्या बाजूने बाहेर पडायचे असा खेळ तिथे खेळता येत होता.

या संस्थेचा आणखी एक विशेष म्हणजे ती Calendar नावाचे एक द्वैमासिक प्रकाशित करते. त्याचे स्वरूप प्राय: हाऊसजर्नलसारखे आहे. इथे प्रारंभीच प्रवेशदारापाशी एक वस्तुविक्रीचे केंद्र आहे. तिथे जुन्या नव्या वस्तू, खेळणी, पुस्तके, होजयरी, शिल्पे विकत घेता येतात. शेजातीच किमान दोन कफेटिरियाज् आहेत. दर्शनी भागात कारंजेही असून त्याच्या सभोवताली खुर्च्या टेबले आहेत आणि तिकीटविक्री कार्यालय, माहितीकेंद्रही जवळ आहेत. लहान बसमधून बसून बागांमध्ये फेरफटका मारण्यासाठी बसची सोय असून ती ठराविक वेळीच उपलब्ध असते.

हंटिंगटन गार्डनमधला प्रवास निश्चितच डोळ्यांना शांतविणारा आणि मनात उत्तेजीत करणारा होता.

-डॉ. अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..