नवीन लेखन...

सोनोमा शहर

सोनोमा हे सॅनफ्रन्सिस्कोपासून तासाभराच्या अंतरावर असलेले एक शहर. कॅलिफोर्नियाच्या या भागात अनेक ठिकाणी द्राक्षाचे मळेच्या मळे आहेत. त्यामुळे इकडे अनेक वायनेरीज आहेत. द्राक्षापासून ‘वाईन’ हे मद्य बनविले जाते. असे कारखाने असतात तिथे त्याच्या विक्रीची दुकाने असतात. त्यांना वायनरीज म्हणतात. ही दुकाने अतिशय आकर्षक पध्दतीने सजवलेली असतात. गि-हाईकांना बसण्यासाठी खुर्च्या टेबले असतात. काचेच्या कपाटांमधून अनेक जातींच्या आणि प्रकारांच्या वाईन्सच्या सीलबंद बाटल्या लावून ठेवलेल्या असतात. या वायनरीजमध्ये प्रायः गोऱ्या तरुणी गिऱ्हाईकांना वाईन्ससंबंधी माहिती द्यायला असतात. त्या त्यांच्या समोर एक छोट्या आकाराचा ग्लास ठेवतात आणि त्यात दोनचार चमचे वाईन भरतात. गि-हाईकांने ती प्यायची आणि तिच्या चवेसंबंधी, गुणवत्तेसंबंधी आपली मते द्यायची. त्याला काही शंका अथवा प्रश्न पडले असतील तर ते त्याने त्या मुलीला विचारायचे. ती त्यांची उत्तरे देईल. किंवा दुसऱ्या जातीची वाईन ती ग्लासमध्ये भरील. तिची चव गिऱ्हाईकाने घ्यायची. हा सिलसिला गिऱ्हाईकाचे समाधान होईपर्यंत चालतो. नंतर तो त्यापैकी वाईन (Wine) ची निवड करतो आणि त्याला हव्या तेवढ्या वाईन्स तो विकत घेतो. याला ‘वाईन टेस्टिंग’ असेही म्हणतात. अनेक ठिकाणी ते मोफत असते आणि आवडलेल्या वाईनची निवड केल्यावर त्यांच्या किंमतीएवढे पैसे भरावे लागतात. काही ठिकाणी सुरुवातीच्या प्रक्रियेसाठीही विशिष्ट डॉलर्स आकारले जातात. ‘सोनोमा’ शहरात रस्त्यारस्त्याच्या कडेला अशी अनेक दुकाने आढळतात. कारण हा इथला महत्त्वाचा व्यवसाय आहे. शिवाय वाईनशौकिनांची संख्याही खूप असते.

पण केवळ वाईनटेस्टिंगसाठीच प्रसिद्ध आहे असे नाही. हे शहर इटालियन लोकांच्या दाट वस्तीचे असून त्यांनी त्यांची संस्कृती, घरांची रचना, केक्स,, चॉकलेट निर्मिती, खेळणी, कपडे, भांडी आणि अन्य वस्तू यांचे वैशिष्ट्य आजवर जपून ठेवले आहे. ‘सोनोमा’ला भेट देणाऱ्या पर्यटकांना त्यांच्या विषयीही आकर्षण असते आणि ते ती विकतही घेतात. या करिता अनेक दुकाने उघडी असतात.

‘सोनोमा’च्या रस्त्यांच्या फूटपाथवरून स्वच्छंदपणे मैत्रिणीच्या हातात हात घालून फिरणे आणि वेगवेगळ्या घरांच्या रचना, रंगसंगती पाहाणे हेही इथे घडताना दिसते. (अपवाद फक्त भारतीयांचा असतो.) -‘

सोनोमा’ नेहमीच शौकिनांसाठी तत्पर असते.

-डॉ. अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..