नवीन लेखन...

मौरवुडस् नॅशनल पार्क

सॅनफ्रान्सिस्कोजवळ उत्तरेला मौरवूड नावाचा परिसर आहे. खरेतर ते जंगलच आहे म्हणा ना.

ही जमीन इथल्या विल्यम केंट नावाच्या काँग्रेसमनने १९०८ साली अमेरिकेच्या तेव्हाचे प्रेसिडेंट रुझवेल्ट यांना पत्र पाठवून ‘नॅशनल पार्क’ व्हावे म्हणून दिली. या शिवाय त्याचे नाव ‘मौर वूड नॅशनल पार्क’ असे ठेवावे हेही सुचविले. जॉन मौर यांनी तेव्हा ‘नॅशनल पार्क’ ही संकल्पना पुढे आणून काम केले होते. तेव्हा त्यांचे स्मरण राहावे हा त्यामागे हेतू होता. त्यानुसार अमेरिकन सरकारने राष्ट्रीय वनविभाग म्हणून घोषित केलेला हा भाग आहे.

याचे वैशिष्ट्य असे की उंच उंच रेडवूड वृक्षं इथे आहेत. ते ३५० फुटापर्यंत वाढतात. इथे ते १५८ फूट उंच आहेत. किंबहुना रेडवूड वृक्षांचे जतन-संगोपन व्हावे ही केंट यांची इच्छा होती. या वृक्षांपैकी काही तर ५०० ते ८०० वर्षं जुने आहेत. स्वाभाविकच त्यांची उंची, बुंध्याचा आकार नजरेत भरतात. हा परिसर राखीव क्षेत्र असल्याने इथे वृक्षतोड होत नाही. उलट त्याच्या जवळच पॅसिफिक महासागर असल्याने हा भाग नेहमीच धुक्याने आणि दमट वातावरणाने वेढलेला असतो. त्यामुळे इथे स्वाभाविक, नैसर्गिक गतीने वृक्षवाढ होत असते.

या भागात ‘रेडवूड’ जातीची झाडे फार मोठ्या प्रमाणात असून ती सरळ उंच वाढत जातात. या झाडांना आयुष्यही भरपूर असते. त्यापैकी एक तर १२०० वर्षांचे असावे. त्यामुळे त्यांच्या सरळ वाढत जाणाऱ्या खोडांचा जमिनीलगतचा व्यास (diameter) १५/२० फुटांचा आढळतो. अशी काही झाडे पुढे ठिसूळ होऊन पडतात. त्यांचे कापलेले logs आसपास हेतूत: सुरक्षित ठेवलेले आहेत. ते पाहून त्या झाडांची भव्यता आपल्या लक्षात येते. शिवाय पाण्याचे. ओढेही असल्याने वनस्पती आणि वन्यजीवनाला ते वरदान ठरले आहे. एरवी काही निवडक पक्षी दिसतात. कीटकांचा आणि फुलझाडांचा अभाव ही त्यामागे कारणे असावीत. प्राणी फारसे दिसत नाहीत.

पण इथे दाट झाडी आणि भरपूर पाणी असल्याने पक्षांच्या विविध- आणि त्यातही काही दुर्मिळ-जाती पाहायला मिळतात. त्या जवळजवळ ५० असाव्यात.

पार्कमध्ये हरणं, खारी, चिंपांझी आणि अस्वलं असे प्राणी दिसून येतात.

उंचदाट झाडीतून सूर्यकिरणंही खाली उतरतात, तेव्हा ते विलोभनीय दृश्य असते. या भागात रानवाटा खूप आणि त्यावरून धाडस करून भटकंती करणारेही काही कमी नसतात.

प्रवेशद्वाराजवळच एक कॅफे असल्याने प्रवाशांच्या खाण्यापिण्याची सोय होते. या शिवाय एक विविध वस्तू विकत मिळण्याचा एक स्टॉलही तिथे होता.

-मौरवूड नॅशनल पार्क खरोखर पाहाण्याजोगा आहे.

-डॉ. अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..