नवीन लेखन...

अमेरिकेतील ड्रायव्हिंग आणि टेक्स्टिंग

अमेरिकेत एप्रिलमध्ये “ड्रायव्हिंग आणि टेक्स्टिंग वीक (driving and texting week)” पाळला जातो. यासंबंधी मुलाने माहिती दिली ती फार उद्बोधक असल्याने आणि मी ती आपल्यापर्यंत पोहोचवावी असे त्याने सुचवल्याने इथे लिहीत आहे.

मोटारनिर्मितीव्यवसाय सुरू झाल्यापासून कारनं प्रवास करण्याकडे अमेरिकनांचा ओढा राहिला. त्या दृष्टीने रस्ते बांधण्याला वेग आला. हायवेज्, एक्स्प्रेसमार्ग तयार केले गेले. आवश्यक तिथे पूल बांधले गेले. त्याचा परिणाम असा झाला की, जगातील उत्तमोत्तम मोटार कंपन्या आपली उत्पादने घेऊन.. इथल्या बाजारपेठेत उतरल्या आणि ग्राहकांचाही त्यांना प्रतिसाद मिळत गेला.

स्वाभाविकच रस्त्यांवर गाड्यांची संख्या वाढली आणि अपघातही. त्यात अनेक माणसे मारली जातात आणि हे प्रमाण सतत वाढते राहिले आहे. त्याच्या कारणांचा शोध घेता गाडी चालवताना पुष्कळजण मोबाईलवर गप्पा मारतात, एसएमएस करतात, व्हाटस्अपवर मग्न असतात असे लक्षात आले. त्यामुळे ड्रायव्हरचे ड्रायव्हिंगवरील लक्ष ढळते. परिणामत: अनेकजण मृत्युमुखी पडतात.

हे प्रकार होऊ नयेत, किमान कमी व्हावेत याकरिता जनजागृती व्हावी या हेतूने वर उल्लेखिलेला आठवडा पाळण्यात येतो. आकाशवाणी, वृत्तपत्रे आणी टीव्ही या माध्यामातून अनेक कार्यक्रम करण्यात येतात. टीव्हीवर सादर करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सामील झालेल्या जोडप्याची कहाणी हृदयद्रावक होती. त्यांची कॉलेजला जाणारी एकुलती मुलगी कारने घरी परतत होती. एके ठिकाणी ट्राफिक जाम होता. तिच्या कारच्यापुढे अनेक कार रस्ता मोकळा होण्याची वाट पाहत होत्या. तिला ही थांबण्याशिवाय गत्यंतर नव्हते. तो अकस्मात काय घडले हे कळले नाही. एक भलीमोठी कार तिच्या कारवर मागून येऊन धडकली आणि मोठा अपघात झाला. त्या मुलीचे आईवडील ऑफिसात होते. त्यांना मेसेज गेले. घाईघाईने ते हॉस्पीटलमध्ये तिला नेले होते, तिथे गेले. तिथे त्यांना त्यांच्या मुलीच्या मृत्यूची बातमी मिळाली. त्यांच्या वर

दुःखाचा डोंगर कोसळला. काही महिन्यानंतर चौकशी अहवाल आला. त्यात मागून आलेली गाडी एक बाई ताशी ऐशी मैल वेगाने चालवीत होती आणि त्याचवेळी ती मित्रांना एसएमएस करण्यात दंग होती. अपघात घडण्याआधी तिने दहाबारा एसएमएस केले होते आणि त्या नादात ट्राफिकमुळे थांबलेल्या गाड्या तिच्या ध्यानात आल्या नव्हत्या. परिणामतः पुढच्या गाडीतील तरुणी हकनाक मेली आणि तिच्या आईवडिलांचे भावविश्व उद्ध्वस्थ झाले. अशा प्रकारचे दारुण दुःख इतरांना सहन करायला लागू नये म्हणून ते ठिकठिकाणी जाऊन त्यासंबंधी प्रचार करीत असतात.

मोबाईलच्या आहारी आज सर्वजण गेले आहेत. संबंधितांनी यातून वेळीच बोध घ्यावा हे बरे.

-डॉ. अनंत देशमुख

(अनघा प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या ओ अमेरिका ह्या पुस्तकामधून)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..