नवीन लेखन...

मराठे आणि दिल्‍ली – १८वे शतक – भाग १

अठराव्‍या शतकात मराठी सत्तेने प्रत्‍यक्ष वा अप्रत्‍यक्षरित्‍या भारताचा बराच भूभाग आपल्‍या अधिपत्‍याखाली आणला होता, अटकेपर्यंत मजलही मारली होती. इतिहासातील हे युग प्रत्‍येक मराठी माणसाला अभिमान वाटावा असे आहे. परंतु असा एक विचार अलिकडे मांडला गेलेला आहे की, मराठ्यांनी दिल्‍लीला धडक दिली वा दिल्‍ली काबीजही केली पण ते दिल्‍लीपती झाले नाहीत. याचे कारण म्‍हणजे मराठी माणूस त्रिभुवनात गेला तरी त्‍याचा मराठी भाषा, संस्‍कृती व मुलुख याबद्दलचा अभिमान ढळत नाही व या आपल्‍या स्‍वाभिमानामुळे आणि आपल्‍या आत्‍मसंतुष्‍ट किंवा अल्‍पसंतुष्‍ट वृत्तीमुळेच मराठे दिल्‍लीच्‍या उंबरठ्यावरच राहिले, दिल्‍लीपती झाले नाहीत. […]

पानिपतला विसरूं नका

मकर संक्रान्ति साजरी करतांना, आपण १४ जानेवारी १७६१ ला लढल्या गेलेल्या पानिपतच्या तिसर्‍या लढाईची आठवण विसरूं या नको. […]

१४ जानेवारी १७६१ – पानिपत

हाच तो काळा दिवस ज्या दिवशी पानिपतावर मराठ्यांची एक सबंध पिढी शहीद झाली होती . १४ जानेवारी १७६१ हे भारताच्या इतिहासातील एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे. मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसर्‍या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.
[…]

रक्तरंजित आघातातून उभे राहिलेले पवित्र स्थान – सोरटी सोमनाथ

सोरटी सोमनाथच्या मंदिराचा रक्तरन्जीत इतिहास आणि आता उभे असलेले मंदीर भारताचे गौरव स्थान आहे. प्रत्येक भारतीयांनी अवश्य भेट द्यावी असे पर्यटन स्थळ आहे. एखादे धार्मिक स्थान हजारो वर्षे अनेक स्वाऱ्यामध्ये नेस्तनाबूत होते, परंतु त्यानंतर प्रत्येक वेळा फिनिक्स पक्षासारखे राखेतून उभे राहते असे एकमेव स्थान आहे सोरटी सोमनाथ. सौराष्ट्राच्या पश्चिम किनारयावर वेरावळ पासून २० किमी वर वसलेल्या, बारा ज्योतिर्लिंगांमधील प्रथम क्रमांकावर असलेल्या या स्थानाचा इतिहास रक्तरंजित आहे. […]

वरळी कोळीवाड्याची देवता श्री गोलफादेवी..

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा- मुंबईचे आद्य रहिवासी म्हणजे कोळी. मुंबईमध्ये कोळी समाज मुंबई ही ‘मुंबई’ म्हणून ओळखली जाण्यापुर्वीपासून वास्तव्यास आहे. म्हणून तर मुंबई ही कोळ्यांची असे सांगतात. कोळी आणि त्याचं कुटुंब, अश्या सर्वांचच आयुष्य समुद्राशी, त्याच्या लहरीपणाशी, त्याच्या भरती-ओहोटीशी घट्ट निगडीत असल्याने त्यांची वसती समुद्र किनाऱ्यांवर असणं अगदी साहजिक असतं. समुद्रच यांचा माय-बाप, त्यानुळे चुकला कोळी […]

नऊवारी लुगडं..

‘लुगडं’ म्हटलं की अनेकांच्या मनात अनेक प्रकारच्या भावना जागृत होत असतील. कुणाला आजीच्या, आईच्या जुन्या लुगड्यापासून बनवलेल्या उबदार गोधडीची आठवण येईल, तर कुणाला आठवणीतल्या कुणाच्या तरी शालुरूपी लुगड्यावरील ‘पदरावरचा जरतारीचा मोर..’ उगाचंच अस्वस्थ करेल. मला मात्र लुगडं हा शब्द ऐकला की, नऊवारी साडीच डोळ्यासमोर येते. वास्तवीक नव्वार किंवा नऊवार हे कापडाच्या लांबीचं माप आहे, नेसायची पद्धत […]

वाळकेश्वरची श्री गुंडी..

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा– वाळकेश्वर. वाळकेश्वर ज्या टेकडीवर आहे, ती मलबार हिल भौगोलिक दृष्ट्या मुंबईतली सर्वात उंच टेकडी. या टेकडीच्या उंची सारखीच उंची ऐहिक आयुष्यात गाठलेली इथली माणसं. वाळकेश्वराची वस्तीच गर्भश्रीमंतांची. तसंच हा मुंबंईचा राजनिवासांचा विभाग. वाळकेश्वर म्हटलं, की आठवतं महाराष्ट्राच्या राजकारणाच्या घडामोडीचं केंद्रस्थान असलेलं मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान ‘वर्षा’, देश-विदेशातील पाहुण्यांसाठी असलेलं ‘सह्याद्री गेस्ट हाऊस’, अनेक मंत्री, […]

श्री प्रभादेवी..

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा – मुंबईचा प्रभादेवी भाग आज जगभरात प्रसिद्ध आहे, तो इथल्या श्री सिद्धिविनायकामुळे. अलम जगातून या श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी त्याचे भक्तगण येत असतात..पण एक गंमत आहे, हा श्री सिद्धिविनायक कितीही प्रसिद्ध झालेला असो वा अगदी परदेशातही प्रतिष्ठापित झालेला असो, तो ओळखला जातो, तो ‘प्रभादेवी’चा सिद्धिविनायक म्हणूनच. आपल्या देशातील बहुसंख्य देवता विविध नांवाने […]

मुंबईची श्री महालक्ष्मी..!!

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा या देवी सर्वभूतेषु ‘महालक्ष्मी’रूपेण संस्थिता । नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ मुंबईची महालक्ष्मी. प्रमाणभाषेत तिला ‘महालक्ष्मी’ म्हणत असले तरी, बोलीभाषेत मात्र ती ‘महालक्षुमी’. मी या लेखात तिचा उल्लेख तसाच करणार आहे. मी मालवणी असल्याने मला ‘आई’पेक्षा ‘आवस’ हा शब्द अधिक जवळचा वाटतो, तसंच महालक्षुमी हे तिचं नांव मला अधिक भावतं. तमाम मुंबईकरांचं […]

इसवी सन १९०० अखेरीस मुंबईत असलेली हिन्दू मंदिरं

मुंबई शहरातील देवतांचा अभ्यास करताना, सन १८९५ साली श्री. कृष्णराव रघुनाथजी नवलकर उपाख्य के. रघुनाथजी यांनी इंग्रजीत लिहिलेलं ‘The Hindu Temple of Bombay’ हे पुस्तक मुंबईच्या एशियाटिक सासायटीत हाती लागलं. सन १९०० अखेरीस मुंबईत असलेल्या सर्व महत्वाच्या मंदिरांचा, त्यातील देव-देवतांचा आणि त्या देवळांवर असलेल्या सरकारी किंवा खाजगी मालकीचा अत्यंत सुंदर आढावा या पुस्तकात घेतलेला आहे. श्री. […]

1 2 3 4 5 10
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..