नवीन लेखन...

व्यक्ती, समाज – १ : पन्हाळगडचा शिवा काशीद : एक शोध

• आषाढ महिना आला की जशी विठ्ठलाची आठवण होणें साहजिक आहे; तशीच शिवाजी-काळातील, पन्हाळगडचा वेढा, आणि त्यासंदर्भात, बाजी प्रभू देशपांडे व शिवा काशीद यांचें स्मरण होणें अपरिहार्य आहे. बाजी प्रभूंबद्दल अनेक ठिकाणी उल्लेख झालेला असतो, (मीही अन्यत्र त्यांच्याबद्दल कांहीं लिहीतच आहे ) ; पण, आपल्याला शिवा काशीद याच्याबद्दल फारशी माहिती नसते. इतिहासकारही त्याच्याबद्दल जास्त माहिती देऊं […]

टिप्पणी – (१)

बातमी : ‘कोळी कुटुंबांचा आतां गिरगांव चौपाटीला ‘रामराम’ ? संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती , ‘मुंबई’ पुरवणी , दि. २८.०६.१६. ज्या कोळी कुटुंबांनी लोकमान्य टिळकांच्या स्मारकासाठी जागा दिली होती, त्यांनाच आतां गिरगांव चौपाटी सोडण्याची वेळ आलेली आहे. कोणत्याही सुविधा उपलब्ध न करतां सरकारी यंत्रणांनी या कोळ्यांची हकालपट्टी करण्याची तयारी चालवली आहे. पिढ्या बदलल्या की विचार बदलूं […]

मुंबईचा संक्षिप्त राजकीय इतिहास

नुकताच काही निमित्ताने छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या समोर, आझाद मैदानात असलेल्या मुंबई मराठी पत्रकार संघाच्या इमारतीत जाण्याचा योग आला. ज्येष्ठ पत्रकार श्री. कुमार कदम यांच्या सोबत इमारतीचा फेरफटका मारताना सहज म्हणून इमारतीच्या गच्चीवर गेलो. संघाच्या इमारतीच्या गच्चीवरून मुंबईच्या पूर्व बाजूची स्कायलाईन पहिली आणि ठळकपणे एक दृश्य दिसले. पत्रकार संघाच्या इमारतीच्या गच्चीवर पूर्वेकडे, मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीकडे तोंड करून […]

वाळूत मारल्या रेघा : कुबेर यांची लहानशी, पण चूक

लोकसत्ता मुंबई आवृत्तीमधील श्री. गिरीश कुबेर यांचा ‘एक जखम वाहती ..’ हा लेख माहितीपूर्ण आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या काळातील युरोपीय महासत्तांच्या ‘गुर्मी’ ची त्यातून चांगली कल्पना येते. युद्ध जिंकण्यांच्या २ वर्षें आधीच या महासत्तांनी ‘वाळूत रेघा’ मारल्या होत्या ! पण लेखात दिलेल्या बॅकग्राउंड-माहितीत कांहीं किरकोळ तपशिलाची गफलत आहे. पॅलेस्टाइन भूभाग हा, इंग्लंड व फ्रान्स यांच्यामध्ये विभागण्यांसाठी […]

प्राचीन भारतीय जलव्यवस्थापन

पाण्याच्या व्यवस्थापनाची अनेक उदाहरणं आपल्याला इंग्रजांचे शासन येण्याच्या आधीपर्यंत ठिकठिकाणी दिसतात. अगदी उत्तर पेशवाईत औरंगाबाद ला बांधलेले ‘थत्ते नहर’ असो, की पुण्याला पेशव्यांच्या काळात केलेली पाणी पुरवठ्याची रचना असो. बऱ्हाणपूर ला आजही अस्तित्वात असलेली, पाचशे वर्षांपूर्वीची पाणी वाहून नेण्याची रचना असो की पंढरपूर – अकलूज रस्त्यावरील वेळापूर गावात सातवाहन कालीन बांधलेली बारव असो. ‘समरांगण सूत्रधार’ ह्या […]

शिवरायांच्या ‘छत्रपती’ या संज्ञेबद्दल माहिती

 श्री. साळुंखे यांनी ‘मराठी सृष्टी’वर, ‘मला एक प्रश्न पडलाय’ अशा शीर्षकाचा लेख लिहिला आहे, ज्यात त्यांनी ‘छत्रपती’ या शिवाजी महाराजांच्या बिरुदाबद्दल चर्चा केली आहे . प्रत्येक महाराष्ट्रीय माणसाला शिवरायांच्या ‘छत्रपती’ या अभिधानाबद्दल कुतूहल असतेंच. साळुंखे यांनी तो शब्द ‘क्षेत्रपती’ या शब्दापासून निघाला असावा असें मांडलें आहे. त्यांनी दाखवलेला अर्थ सराहनीय आहेच. शिवराय हे ‘श्रीक्षेत्र महाराष्ट्राचें’ […]

श्रीमंत बाजीराव पेशवे : एक रणकुशल नेतृत्व

२८ एप्रिल रोजी बाजीराव पेशवे यांची २७६ वी जयंती श्रीमंत बाजीराव पेशवे यांची देशाला ओळख ‘अपराजित योद्धा अशी आहे. बाजीरावांनी त्यांच्या २० वर्षांच्या कारकिर्दीत ४१ लढाया लढल्या आणि त्या सर्वच्या सर्व जिंकल्या. अशा प्रकारचे कर्तृत्त्व गाजवणारे ते एकमेव सेनापती आहेत. त्यामुळेच मराठा साम्राज्य विस्तारुन मध्य प्रदेश पार करुन राजस्थान, उत्तरप्रदेश इथपर्यंत पोहोचले होते. आजच्या युद्धशास्त्राच्या अभ्यासकांना […]

मुंबईतील पुतळे – हलवलेले आणि हरवलेले – हर हायनेस क्वीन व्हिक्टोरीया

काळा घोड्यानंतर मुळ जागेवरून हलवलेल्या ‘क्विन व्हिक्टोरीया’च्या अपरिमित देखण्या पुतळ्याची माहिती देण्याचा मोह मला आवरत नाही.. ‘काळा घोडा’ चौकातून आपण एम.जी. रोडने (महात्मा गांधी रोड) सीएसटी स्टेशनच्या दिशेने निघालो, की पाच मिनिटात फ्लोरा फाऊंटन किंवा हुतात्मा चौकात पोहोचतो..हुतात्मा चौकात चर्चगेटच्या स्टेशनच्या दिशेने समोरच ‘सीटीओ’ची म्हणजे आपल्या ‘तार ऑफीस’ची इमारत आहे (१८७२ साली मुंबईचं जीपीओ प्रथम या […]

नेताजी फाईल्स

नुकत्याच नेताजींच्या ज्या फाईल्स उघड करण्यात आल्या, त्यात एक फाईल आहे. फाईल क्र. ८७०/११/p/१६/९२/Pol. काय आहे ह्या फाईलमध्ये? ह्या फाईलमध्ये आहे एक पत्र. मोहनदास गांधींचे सचिव खुर्शीद नवरोजी यांनी २२ जुलै १९४६ यादिवशी व्हाईसरॉय लुई माऊंटबॅटनला लिहिलेले पत्र! गांधींतर्फे पाठवलेल्या ह्या पत्रात ते लिहितात, “सैन्याच्या मनात आझाद हिंद फौजेसाठी सहानुभूती आहे. त्यामुळे उद्या जर का रशियाच्या मदतीने […]

मराठी माणसाचं दुर्दैव आणि इंग्रज राजवट

इ.स. १८०० पर्यंत भारतावर ब्रिटिशांचे राज्य आले होते – महाराष्ट्रावर ब्रिटिशांचे राज्य यायला १८१८ पर्यंत उशीर झाला तो पेशवाई राज्यातील नाना फडणवीस सारख्या कार्यक्षम लोकांमुळे. १८१८ मध्ये ब्रिटिशांचे राज्य आले तरीही लोकांच्या मनात छत्रपती आणि त्यांचे पेशवे यांच्याबद्दल प्रेम होते. ब्रिटिशांना सतत त्याची धास्ती होती. यासाठी ब्रिटिशांनी जी योजना बनवली तिचे दर्शन त्यांच्या १८५० नंतरच्या कारवायांमध्ये […]

1 12 13 14 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..