नवीन लेखन...

राजभवनातल्या बंकरचं रहस्य !!

मुंबईच्या राजभवनात अत्यंत सुस्थितीतला ब्रिटिशकालीन बंकर सापडल्याच्या बातम्यांनी काही दिवसांपूर्वीची वर्तमानपत्रं भरून गेली होती. केवळ राज्यपालांचं कुतूहल जागृत झाल्याने हा बंकर उजेडात आला अन्यथा इथे एवढा अनमोल खजाना दडलाय हे कोणाच्याच लक्षात आलं नसतं. या अगोदर तिथे मुक्काम केलेल्या अनेक राज्यपालांच्या तरी हे कुठे लक्षात आलं होतं.? ‘हे असं का?’ हा स्वत:ला पडलेला कुतूहलमिश्रित प्रश्न जगातील […]

बाजीराव पेशवे

मित्रांनो १८ ऑगस्ट ही तारखेप्रमाणे *श्रीमंत बाजीराव पेशवे सरकारांची* जयंती आहे. हे निमीत्त साधुन त्यांच्या बद्दल माहीती देण्याचा प्रयत्न आहे. सदर स्वरूपात त्यांच्या पराक्रमाबाबत थोडक्यात माहीती देण्याचा विचार आहे. शिवराय व शंभुराजे नंतर इतिहासाला दखल घ्यायला लावणाऱ्या या पराक्रमी योध्याला लोकांनी फक्त मस्तानी पुरताच ओळखला आहे. शिवरायांनी स्थापन केलेल्या स्वराज्याचे साम्राज्यात रूपांतर हे बाजीरावांनीच केले. दिल्ली […]

शिवरायांनी बांधलेला ३५० वर्षांपूर्वीचा पूल

शिवरायांनी एक पुल बांधला होता माहिती आहे का..????? प्रतापगडाच्या पायथ्याशी “पार्वतीपुर” नावाचे एक गाव आहे नंतर त्यांचे “पार”असे नाव पडले. पार गावाजवळ शिवरायांनी एक पुल बांधून घेतला होता,त्याच खणखणीत नि योजनापूर्व केलेले बांधकाम अजूनही शाबूत आहे. ८ मीटर रुंदीचा हा पुल बहुधा प्रतापगडाच्या उभारणीच्या काळात म्हणजे १६५६-१६५८ या दरम्यान बांधला गेला असावा. कोयना नदी ओलांडण्यासाठी ५२ […]

लोथल येथील सिंधु-सरस्वती संस्कृतीची वसाहत व जगातील सर्वात जुना डॉक

लोथलचा काळ आहे इ.स.पूर्व २४०० ते इ.स.पू. १९०० असा. लोथल हे आजच्या गुजरातमधील अहमदाबाद जिल्यामधे धोलका तालुक्यात आहे. ते खंभातच्या आखातापासून जवळ आहे. भारतात आणि जगात आज अनेक मोठमोठी बंदरे आहेत. पण लोथल येथें जगातील सर्वात जुना डॉक (गोदी) आहे, आणि तो आजपासून ४४०० वर्षांपूर्वीचा आहे ! […]

टिप्पणी – ६ : मोहेन-जो-दारो

बातमी : आशुतोष गोवारीकर यांचा ‘मोहेन-जो-दारो’ या सिनेमाबद्दल संदर्भ : ‘लोकसत्ता’ मुंबई आवृत्ती, दि. २४ जुलै २०१६. आजच्या लोकसत्तामध्ये (पुरवणीत) आशुतोष गोवारीकर यांच्या ‘मोहेन जो दारो’ या चित्रपटावर लेख आला आहे. या विषयावर त्यांनी केलेला अभ्यास कौतुकास्पद आहे. या विषयावरील experts ना सुद्धा ते कन्सल्ट करतच आहेत. गेली कांहीं वर्षें मी या संस्कृतीविषयीं वाचन करत आलेलो […]

देवगडातल्या ‘गिर्ये’ गांवचं ‘श्री देव रामेश्वर मंदिर’

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील ‘गिर्ये’ हे एक दक्षिण कोकणातील कोणत्याही गावाप्रमाणे एक निसर्गसंपन्न गाव. सुप्रसिद्ध ‘विजयदुर्ग’ किल्ला याच ‘गिर्ये’ गावात वसला आहे व त्याचे आदिलशाही अम्मलातले नाव ‘घेरिया’ हा ‘गिर्ये’चाच अपभ्रंश आहे ( ‘गिर्ये’च घेरिया झालं की ‘घेरिया’चं गिर्ये यात नेहेमीप्रमाणे तज्ञांत मतभेद आहेत. आपला तो विषय नाही.). आता इतक्या वर्षानंतर ‘विजयदुर्ग’ हे वेगळे महसुली गाव […]

शिवकालीन आंतरराष्ट्रीय व्यापारी संबंध

शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याचा जवळपास २५ देशांशी व्यापारी संबंध आलेला दिसतो. ते पंचवीस व्यापारी व त्यांचे देश पुढील प्रमाणे १) फिरंगी- क्रिस्त- किरिस्ताव- पोर्तुगीज- पोर्तुगाल २) इंगरेज- इंग्रज -इंग्लंड ३) वलंदेज- डच- हॉलंड ४) फरांसिस- फ्रेंच- फ्रांस ५) दिनमार्क- डिंगमार- दीडमार- डेन्मार्क ६) निविशयान- नॉर्वेजिअन- नॉर्वे ७) ग्रेग- यवन-ग्रीक ८) लतियान- लॉटीअन- तलियना- इटालियन ९) यहुदीन- […]

व्यक्ती, समाज – २ : बाजी प्रभू देशपांडे व पावनखिंड : कांहीं चर्चा

• शिवरायांच्या पन्हाळगड ते विशाळगड अशा दौडीच्या संदर्भातील मानाचें पान आहे, बाजी प्रभू देशपांडे यांचा घोडखिंड ऊर्फ पावनखिंड येथील पराक्रम. जरी ती घटना सर्वांना माहीत असली, तरी, आपण आधी ती थोडक्यात पाहूं या ; नंतर त्या अनुषांनानें तिच्यावरच्या एका साहित्यकृतीवर कांहीं चर्चा करतां येईल. • सिद्दी जौहरनें पन्हाळगडाला घट्ट वेढा घातला, आणि तो पावसाळ्यातही तसाच चालूं […]

व्यक्ती, समाज – १ : पन्हाळगडचा शिवा काशीद : एक शोध

• आषाढ महिना आला की जशी विठ्ठलाची आठवण होणें साहजिक आहे; तशीच शिवाजी-काळातील, पन्हाळगडचा वेढा, आणि त्यासंदर्भात, बाजी प्रभू देशपांडे व शिवा काशीद यांचें स्मरण होणें अपरिहार्य आहे. बाजी प्रभूंबद्दल अनेक ठिकाणी उल्लेख झालेला असतो, (मीही अन्यत्र त्यांच्याबद्दल कांहीं लिहीतच आहे ) ; पण, आपल्याला शिवा काशीद याच्याबद्दल फारशी माहिती नसते. इतिहासकारही त्याच्याबद्दल जास्त माहिती देऊं […]

टिप्पणी – (१)

बातमी : ‘कोळी कुटुंबांचा आतां गिरगांव चौपाटीला ‘रामराम’ ? संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती , ‘मुंबई’ पुरवणी , दि. २८.०६.१६. ज्या कोळी कुटुंबांनी लोकमान्य टिळकांच्या स्मारकासाठी जागा दिली होती, त्यांनाच आतां गिरगांव चौपाटी सोडण्याची वेळ आलेली आहे. कोणत्याही सुविधा उपलब्ध न करतां सरकारी यंत्रणांनी या कोळ्यांची हकालपट्टी करण्याची तयारी चालवली आहे. पिढ्या बदलल्या की विचार बदलूं […]

1 11 12 13 14 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..