नवीन लेखन...

धर्मवीर……होय धर्मवीरच!!

‘आता हे हिंदुराज्य जाले’ या ओळी आहेत शंभूराजांनी बसवलेल्या शिलालेखावर. चाफळपासून ते थेट तिरुपती देवस्थानपर्यंत जी जी वर्षासने छत्रपती शिवाजी महाराजांनी लावून दिली आहेत; ती तशीच चालू रहावीत ही आज्ञा आहे शंभूराजांची. सज्जनगडावर समर्थांची समाधी बांधली ती शंभूराजांनी. ‘आहे तितुके जतन करावें । पुढे आणखी मेळवावे । महाराष्ट्र राज्य करावे । जिकडे तिकडे ॥‘ हा समर्थ […]

हिरोजी फर्जंद

लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजेल ह्या काळजीमुळे प्रत्येक रयत रयतेतील प्रत्येक जण महाराजांवर जीव ओवाळून टाकीत होता त्यातीलच एक म्हणजे हिरोजी फर्जंद मिर्झा राजे जयसिंग यांबरोबर झालेल्या कराराच्या ओझ्यामुळे महाराजांना पातशहाच्या भेटीसाठी आग्र्यास जाणे भाग पडले औरंगजेबाचा पन्नासाव्या वाढदिवसाला महाराज त्या औरंग्याच्या दरबारात हजर होते येथे मात्र महाराजांचा अपमान करण्यात आला आणी […]

मुंबईला ‘बृहन्मुंबई’ बनवणारा एक रस्ता

मुंबईतील बहुतेक सर्व मुख्य रस्त्यांना स्वतःचा असा इतिहास आहे.. मुंबईवर राज्य केलेल्या (आताच्या नाही, पूर्वीच्या) राज्यकर्त्यांप्रमाणेच मुंबईतील काही रस्त्यांनी मुंबईला जागतिक दर्जाचे महानगर बनवण्यात अहं भूमिका बजावलेली आहे..या रस्त्यांच्या निर्मितीची एक स्वतंत्र कथा आहे तश्याच याच्या शेजारी असलेल्या वास्तुंच्याही कथा-कहाण्या आहेत.. आपल्याला व्यवसाय-धंद्यानिमित्त अनेक ठिकाणी फिरावं लागत..आपण ज्या रस्त्यावरून रोज ये-जा करतो त्या रस्त्याचे ऐतिहासिक महत्व […]

मुंबईला ‘तिची जमीन’ देणारा एक रस्ता आणि ‘ब्रीच कँडी’ची जन्मकथा

प्राचीन काळापासून मानव शहर वसवत आलाय..बरीशी जागा, आजूबाजूला पाण्याची सोय बघायची आणि वसती करायची हा पुरातन परिपाठ आहे..प्राचीन हरप्पा किंवा मोहोन्जादारो शहर असतील किंवा अगदी आता-आता पर्यंत वसलेली शहर असोत, अगदी याच पद्धतीने त्यांची निर्मिती झाली आहे..या सर्व शहरात आणि मुंबई शहरात एक जमीन अस्मानाचा फरक आहे आणि तो म्हणजे मुंबईला वसण्यासाठी तिची, स्वतःची अशी जमीनच […]

अपरिचित इतिहास

शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरी सकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन आला होता. त्याने एका मुघल सरदारास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंद मोडून काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले […]

भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक – वासुदेव बळवंत फडके

पिळदार शरीर, पाच फूट दहा इंच उंची, गोरा वर्ण, तरतरित नाक, निळसर डोळे, रुबाबदार चेहरा अशी सिंहासारखी देहरचना असणारी व्यक्तिच, ब्रिटिशांच्या गुलामगिरीच्या बेडीत अडकलेल्या तमाम भारतीयांच्या स्वातंत्र्यासाठी पहिली डरकाळी फोडू शकते आणि फोडली ती वासुदेव बळवंत फडके या क्रांतिकारकाने. म्हणूनच त्यांना ‘भारतीय सशस्त्र क्रांतिचे आद्य जनक ‘ म्हटले जाते. थोर क्रांतिकारकाच्या जीवनाचा आढावा घ्यावयाचा ठरल्यास तो […]

मराठा आरमार दिन – भाग-२

आपल्या देशात आरमारी सामर्थ्याचे महत्व प्रथम शिवाजी महाराजांनी ओळखलं. त्यांच्या निधनानंतर बलाढ्य आरमार हे त्यांचे सुत्र धरुन कान्होजी आंग्रेंनी सागरी सत्तेवरची मराठेशाहीची पकड इतकी बळकट केली की त्यांचा हा पराक्रम चमत्कारात गणला जावा.शत्रुंनी त्यांचा उल्लेख समुद्री चाचे असाच करायचे खरं तर आपल्या समुद्रावर आपली सत्ता आणि हे सर्व शत्रु चाचे आहेत.इंग्रज त्यांना जमिनीवरचं आणि पाण्यातलं जे […]

1 10 11 12 13 14 15
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..