नवीन लेखन...

टिप्पणी – (१)

बातमी : ‘कोळी कुटुंबांचा आतां गिरगांव चौपाटीला ‘रामराम’ ?
संदर्भ : लोकसत्ता, मुंबई आवृत्ती , ‘मुंबई’ पुरवणी , दि. २८.०६.१६.

ज्या कोळी कुटुंबांनी लोकमान्य टिळकांच्या स्मारकासाठी जागा दिली होती, त्यांनाच आतां गिरगांव चौपाटी सोडण्याची वेळ आलेली आहे. कोणत्याही सुविधा उपलब्ध न करतां सरकारी यंत्रणांनी या कोळ्यांची हकालपट्टी करण्याची तयारी चालवली आहे.

पिढ्या बदलल्या की विचार बदलूं शकतात, नव्या पिढीला जुन्या संबंधांची जाण असतेंच असें नाहीं, आणि असलीच तर, पर्वा असतेच असें नाहीं. इतिहासात याची अनेक उदाहरणें दिसून येतात.

एक उदाहरण पाहूं या . ओरंगझेबाच्या मृत्यूनंतर मुघल राजपुत्रानें शाहूला कैदेतून सोडलें. तो महाराष्ट्रात आला व त्याचा, राजारामाची पत्नी ताराबाई हिच्याशी संघर्ष सुरूं झाला. धनाजी जाधव, त्याचा कारभारी बाळाजी विश्वनाथ वगैरे मंडळी शाहूच्या पक्षात गेली. शाहू छत्रपती झाला. तरीही सरखेल कान्होजी आंग्रे ताराबाईच्या पक्षात होता. बाळाजी विश्वनाथ यानें कान्होजीचें मन वळवलें व त्याला शाहूच्या पक्षात आणले. यानंतर बाळाजी विश्वनाथ व कान्होजी आंग्रे यांच्यात फार चांगले संबंध राहिले. पुढे बाजीराव (पहिला) यानेंही जंजिरा मोहिमेच्या वेळीं आंग्र्यांची मदत घेतली होती. बाजीरावाच्या मृत्यूनंतर त्याचा पुत्र नानासाहेब हा पेशवा झाला. त्याला सर्व मराठी सत्ता स्वत:च्या हातात हवी होती. (त्या गोष्टीच्या कारणांची व योग्यायोग्यतेची चर्चा येथें अभिप्रेत नाहीं ). नानासाहेबानें तुळाजी आंग्रे याला पकडून तहहयात कैदेत डांबले, व कैदेतच तुळाजीचा मृत्यू झाला. केवळ चाळीसएक वर्षांमध्ये आणि २ पिढ्यांतच, विचारांमध्ये एवढा अमूलाग्र बदल घडून आला. खरें तर, बालाजी विश्वनाथाला पेशवेपद मिळाले, त्याला अप्रत्यक्षपणें कान्होजी जबाबदार होता. कारण, जेव्हां शाहूनें बाळाजीला कान्होजीशी लढायला सागितलें, त्या वेळी बाळाजीनें पेशवेपद मागून घेतलें, आणि नंतर कान्होजी शाहूच्या पक्षाला मिळाल्यावर बाळाजीचा दबदबा वाढला. परंतु, दोन पिढ्यांनंतर नानासाहेबानें जुन्या गोष्टी बाजूला ठेवून त्याच्या तत्कालीन लक्ष्यांचा व धोरणांचा अवलंब केला आणि आंग्रे कैदेत पडला.

९६ वर्षांपूर्वी गिरगांवातील कोळ्यांनी आपली ज़मीन दिली, त्यानंतर आतां चौथी पिढी चालूं आहे. सरकारें बदलली, सरकारी अधिकारी बदलले. आतां ते सध्याच्या परिस्थितीचा विचार करून त्याप्रमाणें निर्णय घेणार. शंभर वर्षांपूर्वी या बिचार्‍या कोळ्यांच्या पूर्वजांनी काय केलें, याला आतां विचारतो कोण !

नानासाहेब पेशव्याच्या एकूण वृत्तीचा मराठेशाहीला किती फायदा-तोटा झाल, हें पुढे पानिपतानें दाखवून दिलेंच. मान्य, की पानिपताशी आग्र्यांचा संबंध नव्हता, पण नानासाहेबाच्या वृत्तीचा तर होता ना!
असें म्हणतात की, इतिहासाकडून माणसानें शिकावें. पण इथें इतिहास वाचायला वेळ कुणाला फुरसत आहे ? इतिहासातून शिकण्याची बात तर दूरच !

– सुभाष स. नाईक

सुभाष नाईक
About सुभाष नाईक 297 Articles
४४ वर्षांहून अधिक अनुभव असलेले सीनियर-कॉर्पोरेट-मॅनेजर (आतां रिटायर्ड). गेली बरीच वर्षें हिंदी/हिंदुस्थानी, मराठी व इंग्रजी या भाषांमध्ये गद्य-पद्य लिखाण करत आहेत. त्यांची ९ पुस्तकें प्रसिद्ध झाली आहेत. पैकी ६ ‘पर्यावरण व प्रदूषण’ या विषयावरील इंग्रजी न हिंदी कवितांची पुस्तकें आहेत. दोन पुस्तकें , ‘रामरक्षा’ व ‘गणपति-अथर्वशीर्ष’ या संस्कृत स्तोत्रांची मराठी पद्यभाषांतरें आहेत. अन्य एक पुस्तक ‘मृत्यू आणि गत-सुहृद ’ हा विषयाशी संल्लग्न बहुभाषिक काव्याचें आहे. गदिमा यांच्या ‘गीत रामायणा’चें हिंदीत भाषांतर. बच्चन यांच्या ‘मधुशालचें मराठीत भाषांतर केलेलें आहे व तें नियतकालिकात सीरियलाइझ झालेलं आहे. टीव्ही वर एका हिंदी सिट-कॉम चें स्क्रिप्ट व अन्य एका हिंदी सीरियलमधील गीतें व काव्य लिहिलेलें आहे. कत्थक च्या एका कार्यक्रमासाठी निवेदनाचें हिंदी स्किप्ट लिहिलें आहे. अनेक मराठी व हिंदी पब्लिकेशब्समध्ये गद्य-पद्य लेखन प्रसिद्ध झालें आहे, जसें की, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सत्यकथा, स्वराज्य, केसरी, नवल, धर्मभास्कर, धर्मयुग, धर्मभास्कर, साहित्य अकादेमी चें हिंदी जर्नल ‘समकालीन भारतीत साहित्य’ , मराठी अकादेमी बडोदा चॅप्टर चें मराठी जर्नल ‘संवाद’, तसेंच प्रोफेशनल सोसायटीचें इंग्रजी जर्नल यांत लेखन प्रसिद्ध झालेलें आहे.मराठी , हिंदी व इंग्लिश वेबसाईटस् वर नियमित गद्य-पद्य लेखन. कांहीं ई-बुक सुद्धा प्रसिद्ध.
Contact: Website

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..