नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

आइसक्रीम खा…पण हे वाचा

बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत. परवाच चिपळूण मधेहि बस्किन रॉबिन या आंतरराष्ट्रिय ब्रैंडच आऊटलेट सुरु झालय. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कदाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत. मागे एकदा रत्नागिरीला मिरजोळे एम आय डी सी मधे एका क्लाएंट बरोबर मिटींगसाठी माझ्या एका सरांबरोबर एका हॉटेलमध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या क्लायंटने अजून एका माणसाबरोबर ओळख करुन दिली . तो माणूस मुंबई मधे आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे माझ्या क्लायंट बरोबर आउटलेट उघडायचे होते त्यासाठी त्याला तिथे किंवा झाड़गाव एम आय […]

कलिंगडाच्या आरोग्यदायक बिया

आता कडक उन्हाळा सुरू झालाय. जिकडेतिकडे कलिंगडाचे ढीग रचलेले दिसतायत. उन्हामुळे शरीरातील कमी झालेलं पाणी भरुन काढायला कलिंगडाची मदत होते. ऊन्हाळ्यात फ्रूट-प्लेट सगळ्यांच्या आवडीची. त्यात आता कलिंगडाचं प्रमाण जास्तच असणार. मात्र, कलिंगड खाताना त्यातील बिया आपण नेहमीच फेकून देतो. पुढच्यावेळी कलिंगड खाताना बिया फेकून देऊ नका. कलिंगडाप्रमाणेच त्याच्या बिया गुणकारी असून आपल्या शरीराला फायद्याच्या असतात. कलिंगड […]

भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी आहे. पण का?

भारत ही मधुमेहाची जागतिक राजधानी आहे. मी स्वतः इंग्लंड, अमेरिका आणि सर्व स्कॅन्डीनेव्हियन देशांमध्ये भरपूर प्रवास केला आहे. वास्तविक ह्या देशांमधील खाण्यापिण्याच्या सवयी पहिल्या तर आपल्यापेक्षा जास्त गोड पदार्थ त्यांच्या जेवणात असतात. तरीदेखील भारताला मधुमेहाचा हा शाप का? ह्याविषयी सर्वात मुख्य लक्षात आलेला मुद्दा म्हणजे रात्रीच्या जेवणाच्या वेळा. ह्या वेस्टर्न कंट्रीजमध्ये, अगदी न्यूयॉर्क सारख्या मोठ्या शहरांमध्ये […]

हास्य उजळू दे

ताणतणावाच्या विरुद्ध क्रिया म्हणजे हास्य! हास्य ही परमेश्वराने मानवाला दिलेली सर्वांग सुंदर देणगी ! सुंदर हास्य हे मानवाशिवाय त्याने कोणालाच दिलेलं नाही. माकडचाळे केल्यावर माकड हसतं असे म्हणतात पण ते म्हणजे दात विचकण, त्याला सुंदर हास्य म्हणता येणार नाही. कोणत्याही अपेक्षेशिवाय तुमच्या स्वास्थासाठी मिळालेल्या या देणगीचा मानवाला कैकवेळा विसर पडतो आणि कधी उगाचच ताणतणावाच्या गर्तेत खोल […]

सकारात्मक नैतिक बळ

आपल्या शरीरात बिघाड होतो त्यामुळे एखादी व्याधी उत्पन्न होते. कधीकधी आयुष्यात सतत अडचणी, त्रास आणि समस्या यांच्या मालिकाच निर्माण होतात. मग हे दोन्ही प्रकारचे म्हणजे शारीरिक आणि मानसिक त्रास घालविण्यासाठी आपण आपल्या विचारात योग्य बदल करुन सुधारू शकतो का ? याचं उत्तर ‘होय ‘ असं द्यायला काहीच हरकत नाही. कारण मानसिक स्वास्थ बिघडलं तर त्यातून शारीरिक […]

जरा हसून पाहा !

आपण पाहातो, अनुभवतो की मानसिक ताणतणावामुळे प्रथम मनाचं आणि नंतर शरीराचं आरोग्य धोक्यात येतं. कारण ताणतणाव हे मानसिक अनारोग्याचं लक्षण आहे. एकदा अंतरंगातच बिघाड झाला तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर दिसायला कितीसा वेळ लागणार? मग या ताणतणावाच्या अगदी विरुद्ध क्रिया केली तर? आपलंच शरीर आणि मन. त्यात दोन वेगवेगळ्या भावनांच्या प्रभावाने जर दोन वेगळे परिणाम मिळणार […]

सिर सलामत तो ‘हेल्मेट’ पचास !

मोडेन पण वाकणार नाही या उक्तीप्रमाणे देहाचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे डोके (शीर) जे आपण सहजासहजी कोणापुढे झुकवत नाही. देव, सद्गुरू किंवा आपल्या आई-वडिलांच्या समोर वाकून नमस्कार करण्यासाठी वापरतो. म्हणजे याचे महत्व नक्की जास्त आहे ते जपलं पाहिजे आणि त्यासाठी त्याची योग्यती काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. पूर्वीच्याकाळी म्हणजे साधारण इ.स.पू. ९०० मध्ये लढताना एखादा भाल्याचे […]

सुगंधी शेती !

ग्लोबल वॉर्मिंगमुळे सर्व जगात हवामानाचे अंदाज चुकत आहेत. कधी ओला दुष्काळ तर कधी कोरडा असे आपल्याला दरवर्षी अनुभवास येते. आपल्या महाराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांनी शेतीचे नुकसान झाल्याने आत्महत्येचा मार्ग स्वीकारला. यावर मात करण्यासाठी पारंपारिक शेती सोडून काही नवीन मार्ग शेतकरी बंधू शोधू लागले आणि त्यात त्यांना यश येऊन त्यांनी सुगंधी तेल मिळणाऱ्या गवताची शेती करण्यास सुरवात केली […]

देशापुढील ई-कचऱ्याची गंभीर समस्या

देवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याला गुरुवारी पहाटे लागलेली आग सोमवारपर्यंत धुमसत होती. आगीने रौद्र रूप धारण करण्याची कदाचित बरीच करणे असतील. मुळात कचराच होऊ नये म्हणून बऱ्याच योजना आखण्यात आल्या आहेत पण देशातील नागरिक मनापासून त्यांच्या कृतीतून अंमलबजावणी करताना दिसत नाहीत त्यामुळे दिवसेंदिवस सगळ्याच प्रकारच्या कचार्यांची समस्या देशापुढे गंभीर रूप धारण करीत आहेत. अश्याच देशापुढील ई-कचऱ्याच्या समस्येबद्दल […]

लहान वयात दृष्टिदोष

आजकाल अगदी लहान वयात मुलांना चष्मे लागतात. पूर्वी चाळीशीनंतरच बहुधा चष्मा वापरावा लागत असे. लहान वयात दृष्टिदोष निर्माण होण्यामागे नेमके काय कारण असावे असा विचार केल्यावर एक महत्वाची गोष्ट लक्षात आली. शरीरात ५ ज्ञानेंद्रिय असतात. कान, त्वचा, डोळे, जीभ आणि नाक. ह्यापैकी डोळे सोडून चार ज्ञानेंद्रियांचा विकास गर्भावस्थेत थोडा थोडा झालेला असतो. डोळ्यांचे कार्य मात्र जन्मानंतर […]

1 … 148 149 150 151 152 … 163
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..