नवीन लेखन...

आरोग्यविषयक लेख

लांबपल्ल्याच्या ट्रेनमधील शौचालयातून मल-मुत्राचा निचरा

सध्या देशात सर्वत्र स्वच्छता अभियान कार्यक्रमा अंतर्गत हागणदारीमुक्त गाव योजना सर्व जिल्ह्यातील गाव-खेड्यात जोरात चालू आहे. परंतू अजूनही मुंबई सारख्या शहरातील स्वच्छतेबद्दल ‘सुज्ञास सांगणे नलगे’ असे आहे. रोज सकाळी रेल्वेच्या बऱ्याच ट्रॅकलगतच्या जागेत केले जाणारे प्रातर्विधी बद्दल न बोलणेच बरे. तसेच चालत्या आणि स्टेशनमध्ये थांबलेल्या लांबपल्ल्याच्या ट्रेनमधील शौचालयातून मल-मूत्राच्या होणाऱ्या निचऱ्याने स्टेशन आणि आसपासचा परिसर दुर्गंधीयुक्त […]

पतंजलीचे साबण

या वर्षी भाऊबीजेला माझ्या बहिणींनी पतंजली च्या विविध साबणांचे एक कीट मला भेट दिले होते. मी ते साबण वापरतोय. मी जगभरातले साबण वापरले आहेत परंतु पतंजली चे साबण मला आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाला खूप आवडले आहेत. मुलतानी मातीचा साबण तर अप्रतिम. हे साबण भारतीय आहेत. परंतु ते फक्त भारतीय आहेत म्हणून नव्हे तर त्यांचा दर्जा जगातील […]

कांदेपुराण – बहुगुणी औषधी कांदा

कांदा हे एक अतिशय बहुगुणी, बहुमोली कंदमूळ आहे. आपल्या जेवणात तर तो नेहमी असतोच, पण राजकारणातही तो गाजतो. केवळ कांद्यामुळे काही राज्यांची सरकारं उलथंवली गेल्याची उदाहरणं जुनी नाहीत. असा या कांद्याविषयी थोडं जाणून घेऊ. कांद्याचे दोन प्रकार आहेत. लाल कांदा आणि पांढरा कांदा. कांदा हा अतिशय स्वादिष्ट पदार्थ आहे. तो जेवणाची लज्जत वाढवतो. कांद्याशिवाय मिसळीची कल्पनाच […]

सनसेट अपियरन्स

डॉक्टर जेनर जोसेफ हे प्रसिद्ध बालरोग तज्ञ व शास्त्रज्ञ होते. निसर्ग प्रेमी होते. त्यांनी आपले घर समुद्र किनाऱ्यावर बांधले होते. रोज सूर्यास्त समयी ग्यालरीत बसून समुद्राच्या पैलतीरी आकाशातून मावळनाऱ्या सूर्याला बघताना त्यांना खूप आनंद वाटत असे. एकदा त्यांच्या क्लिनिकमध्ये दोन तीन महिन्याच्या बालकाला आणले गेले. मुलाचे डोके खुपच मोठे होते. कपाळ भव्य, परंतु नाक तोंड डोळे […]

गुणकारी वनस्पती जेष्ठमध !!

प्राचीन भारतीय आयुर्वेदिक उपचार पद्धतीमध्ये लाखो वनस्पतींचा वापर होत आला, परंतु पाश्चात्य एलोपेथिक औषधांच्या भडीमाराने भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच मोडला गेला. भारत हे कृषिप्रधान राष्ट्र आहे, भारताची अर्थव्यवस्था ही शेती उत्पन्नावर अवलंबून आहे. पारंपारिक पद्धतीने केला जाणारा कृषिव्यवसाय आज आधुनिकतेकडे झुकलेला दिसतो. यांत्रिक शेती-अवजारांच्या वापराबरोबरच प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. भारतीय शेतीत उत्पन्नाचे प्रमाण वाढत असले […]

स्त्री वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

दाम्पत्याने विवाहानंतर किमान तीन वर्ष सतत प्रयत्न करूनही गर्भधारणा न होणे ह्याला वंध्यत्व म्हणतात. वंध्यत्वाचे वैद्यकीय कारण पुरुष किंवा स्त्री दोघांपैकी एकात किंवा दोघांमध्येही असू शकते. नेमके कारण शोधून त्याची चिकित्सा केल्याने गर्भधारणाहोणे शक्य असते. नेमके कारण लक्षात आले नाही तर मात्र स्त्रीलाच दोषी ठरवून ‘पुनर्विवाह’ करण्याची मानसिकता अजूनही भारतात, विशेषतः अशिक्षित किंवा अति उच्चभ्रू समाजात […]

गोरेपणाच्या मलमांच्या पानभर जाहिराती

प्रसिद्ध त्वचारोग तज्ञ डॉ. किरण नाबर यांनी दैनिक लोकसत्ताच्या संपादकांना लिहिलेले पत्र वाचा आणि पुढेही पाठवा…. प्रति, संपादक, दैनिक लोकसत्ता. महाशय, आपल्या वर्तमानपत्रात गेले कित्येक दिवस यू बी फेअर व नो स्कार मलमाच्या पान-पान भरून जाहिराती येत आहेत. या मलमांमध्ये स्टीरॉइड हे औषध आहे. ही मलमे चेहऱ्यावर लावल्यामुळे मुरमे येणे , त्वचा पातळ बनणे, त्वचा कायमची […]

नखांची स्वच्छता

निरोगी आरोग्यासाठी शरीराच्या स्वच्छतेसोबत हातांची आणि हातासोबत नखांची विशेष स्वच्छता करणे गरजेचे आहे. नखांमध्ये साचणार्‍या घाणीमुळे अनेक आजार होऊ शकतात. नखातील मळ अन्नपदार्थाच्याद्वारे आपल्या शरीरात जाऊन त्याचे आपल्याला अपाय होतात. यासाठी नखे नियमित स्वच्छ करावीत. नखांची अवाजवी वाढ ही आज-काल फॅशन मानली जात असली तरी ती आरोग्यासाठी धोकादायक आहे. यासाठी वाढलेली नखे लगेचच काढावीत. हात धुताना […]

त्वचेची स्वच्छता

आपली त्वचा ही अत्यंत नाजूक असते. त्यामुळे त्वचेची निगा राखण्याची नितांत गरज आहे. केवळ त्वचा स्वच्छ राखण्यामुळेही आपण अनेक आजारांपासून दूर राहू शकतो. सध्या अनेक कारणांमुळे त्वचारोगांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. बाहेरून आल्यावर लगेचच हात-पाय, चेहरा पाण्याने स्वच्छ धुवावे. शक्य असल्यास साबणही वापरावा. त्वचेसाठी साबण निवडताना विशेष काळजी घ्यावी. आज-काल बाजारात साबणाचे शेकडो नमुने मिळतात. पण […]

पुरुष वंध्यत्व – आयुर्वेदाच्या चष्म्यातून

गर्भधारणेसाठी ऋतु – क्षेत्र – अम्बु – बीज हे चार घटक सुयोग्य स्थितीत असणे आवश्यक आहे. ऋतु म्हणजे योग्य काळ, क्षेत्र म्हणजे ठिकाण, अंबु म्हणजे आवश्यक असे सर्व हॉर्मोन्स व बीज म्हणजे सामर्थ्यवान पुरुष व स्त्रीबीज. हे चार घटक सर्वदृष्टीने समृद्ध आणि सामर्थ्यवान होण्यासाठी गर्भधारणेपूर्वी पुरुष व स्त्री दोघांनी पंचकर्माने शरीरशुद्धी करावी असा शास्त्रादेश आहे. दैनंदिन […]

1 … 149 150 151 152 153 … 163
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..