नवीन लेखन...

खेकडे खाल्ल्याने होणारे आठ फायदे

8 Reasons to Eat Crabs for Good Health

व्हॉटसऍपवर व्हायरल झालेला डॉ. भूषण सोहनी यांचा हा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत.  अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार 


’८′ हेल्दी कारणांसाठी ‘खेकड्यां’चा घ्या जरूर आस्वाद !

 मांसाहार्‍यांच्या आहारात मासे, अंडी, चिकन या सोबतच आवर्जून आढळणारा एक पदार्थ म्हणजे ‘खेकडे’. सूप, सलाड आणि स्टार्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारातून त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. खेकड्यांमधून मिनरल्स, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स, व्हिटामिन्स या सोबतच उच्च प्रतीच्या प्रोटीन्सचा शरीराला पुरवठा होतो. मग आहारात या चवदार पदार्थांचा समावेश करण्याची ही ’८′ कारणं जरूर जाणून घ्या.

 १) मधूमेहींसाठी फायदेशीर –

खेकड्यांमध्ये उच्च प्रतीचे क्रोमियम  आढळते. यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. खेकड्यातील मांसल भागामध्ये कार्बोहायड्रेट कमी असते त्यामुळे मधूमेहग्रस्त मांसाहारींसाठी खेकडा हा एक उत्तम पर्याय आहे. यासोबत रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी हे पदार्थ जरूर आहारात ठेवा.

 २) कॅन्सरचा धोका कमी होतो –

खेकड्यामध्ये मुबलक प्रमाणात आढळणारे मिनरल शरीरातील ऑक्सिडेटीव्हमुळे होणारे नुकसान कमी करण्यास मदत करते. परिणामी कर्करोगाचा धोकादेखील कमी होतो. त्यातील अ‍ॅन्टीऑक्सिडंट घटक शरीरात कॅन्सरला प्रवृत्त करणार्‍या घटकांचा प्रादूर्भाव कमी करण्यास मदत करतात.

 ३) हृद्यविकाराचा धोका कमी होतो –

खेकड्यांमधून ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिडचा मुबलक पुरवठा होतो. यामध्ये कमीत कमी सॅच्युरेटेड फॅट्स असल्याने रक्तातील घातक कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. तसेच यामध्ये आढळणार्‍या नायसिन व क्रोमियम यामुळे शरीरातील कोलेस्ट्रेरॉलचे प्रमाण नियंत्रणात राहते. परिणामी हृद्यविकाराचा आणि स्ट्रोकचा झटका येण्याची शक्यता कमी होते.

 ४) त्वचाविकारांपासून सुटका होते –

खेकडे खाल्ल्याने अ‍ॅक्ने, रॅशेस अशा त्वचाविकारांबरोबरच डॅडरफचादेखील त्रास कमी होण्यास मदत होते. खेकड्यांमध्ये मुबलब प्रमाणात झिंक आढळते, यामुळे तेल निर्मितीचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे त्वचाविकारापासून बचाव होण्यास मदत होते.

 ५) रक्तपेशींच्या निर्मितीचे कार्य सुधारते –

रक्तपेशींच्या निर्मीतीसाठी आवश्यक असणार्‍या व्हिटामिन बी12 चा खेकड्यांमध्ये मुबलक साठा असतो. तसेच यामुळे अ‍ॅनिमिया होण्याचा धोकादेखील कमी होण्यास मदत होते. खेकड्यातील ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड शरीरातील रक्तभिसरण्याची प्रकिया सुधारण्यास मदत करतात.

 ६) वजन घटवण्यास मदत करते –

चविष्ट असले तरीही खेकड्यांमध्ये कॅलरी अधिक प्रमाणात आढळत नसल्याने तुम्ही खेकड्यांचा आहारात समावेश नक्कीच करू शकता. यामुळे तुम्हांला आरोग्यदायी मार्गाने वजन आटोक्यात ठेवू शकता. तसेच यामधून मिळणारे प्रोटीन घटक खेळाडू आणि बॉडीबिल्डर व्यक्तींच्या आहारात असणे फायदेशीर ठरते.

 ७) रक्तदाब नियंत्रणात राहतो –

खेकड्यामधील पोटॅशियम घटक शरीरात इलेक्ट्रोलेटसचे संतूलन राखण्यास मदत करतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. खेकड्यांमध्ये आढळणारे हे पोटॅशियम घटक शरीरात रक्तदाबावर नियंत्रण मिळवण्यास प्रमुख भूमिका निभावतात.

 ८) सांधेदुखी कमी होते –

खेकडे हे सेलेनियम या अ‍ॅन्टीऑक्सिडंटचा पुरवठा करणारे उत्तम मांसाहारी स्रोत आहेत. शरीरात मिनरल्सच्या कमतरतेमुळे सांधेदुखीचा त्रास वाढतो. म्हणूनच आहारात खेकड्यांचा समावेश करावा. यामुळे ऑक्सिडेटीव्ह स्ट्रेस कमी होण्यास तसेच सांध्यांचे दुखणे कमी होण्यास मदत होते.

डाॅ. भूषण सोहनी. ( एम.डी.)

9 Comments on खेकडे खाल्ल्याने होणारे आठ फायदे

    • खुप छान माहिती आहे. कोणी खेकडे विकणारे आहेत का ? ( Wholesale ) मध्ये मला १५ किलो लागतात आठवड्याला विकायला
      नं – ९३२६०२२७७० / ९१६७१३७७८४
      सतिश तुळशिराम निकम
      डोंबिवली

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..