नवीन लेखन...

श्वासाचा मागोवा आणि चित्तांतील शांतता !

श्वासोछ्वास ही शरीराची अत्यंत महत्वाची नैसर्गिक क्रिया आहे. जीवंतपणाचे ते सर्वांत प्रमुख लक्षण असते. श्वास आहे तर जीवंतपणा आहे. त्याच्या शिवाय देह केवळ मृत झालेला असेल. जगण्यासाठी प्राथमिक गरज असते ती प्राणवायुची. अर्थात ऑक्सिजनची. वातावरणात तो मुबलक प्रमाणांत असतो. शरीर तो शोषून घेतो. व त्यातून शक्ती अर्थात उर्जा प्राप्त होते. जगण्याचे ते आद्य व प्रमुख साधन. श्वासोछ्वास क्रिया म्हणजे प्राणवायू घेणे व कार्बंनडाय ऑक्साईड मिश्रीत वायू शरीरावाटे बाहेर सोडणे. ह्या प्रक्रियेत फुफ्फूस, श्वास नलिका, नाक ही अवयवे सतत कार्यारत असतात. ह्या क्रियेची आपणास एका मर्यादेपर्यंतच जाणीव होत असते. तरी ही दैनंदिन क्रिया अजाणता (Involuntary Action)  सदैव होत असते. आपले त्या क्रियाकडे केंव्हाच लक्ष नसते. वा तशी गरज देखील भासत नाही. सर्वकांही नैसर्गिक, सहज, व सतत होत राहते. केवळ शरीराची हालचाल कमीजास्त प्रसंगानुरुप होते, तेव्हांच त्या क्रियेची जाणीव होऊ लागते. ज्याला Conscious Breathing अर्थात श्वासोछ्वासाची जाणीव म्हणता येईल.

श्वास घेणे व सोडणे ही म्हटले तर छोटीशीच क्रिया. परंतु हीला ध्यान धारणेत फार महत्व असते. श्वासावर लक्ष केंद्रित करणे ह्या प्रक्रियेमध्ये, मेंदूत उत्पन्न होणाऱ्या विचारांच्या जाणीवेवर बाधा येते. विचारावरचे लक्ष सारले जाऊन ते श्वासावर केंद्रित करण्याच्या प्रयत्यांत, भरकटणाऱ्या विचारांवरचे लक्ष त्या क्षणाला तरी टाळता येते. श्वास अर्थात हवा ही नाकाद्वारे कशी आंत जाते, घशातून छातीकडे तीचा मार्ग असतो. तुम्हास त्याच्या मार्गावरच लक्ष केंद्रित करायचे असते.  हवा नाकाद्वारे आंत खेचली जाऊन ती पून्हा त्याच वाटेने परत बाहेर टाकली जाते. आंत जाणारी हवा थोडा क्षण क्रिया थांबते. व परत हवा बाहेर पडते. ह्या सर्व क्रिया तूम्हास जाणीव पूर्वक टिपायच्या असतात. हवेचे आंत बाहेर येणे फक्त. म्हणजेच श्वासावर लक्ष केंद्रित करायचे असते. हे सुद्धा विचारावर लक्ष केंद्रित करण्यासारखेच असते. परंतु ह्यात विचाराबरोबर वाहून जाणे टाळले जाते. पून्हा येणाऱ्या विचारावर लक्ष जाण्यापासून अलिप्त राहता येते. ह्यांत विचारावरचे लक्ष श्वासावरच जात असल्यामुळे लक्षाची जाणीव एक मार्गीच होते. आत घेतला जाणारा व बाहेर काडून टाकलेला श्वास फक्त केंद्रित करणे.

खरे म्हटलेतर श्वासोछ्वास ही क्रिया Involuntary  अर्थात अजाणता होणारी, परंतु तीच आता प्रथम  Voluntary जाणती करायची असते.  म्हणजे श्वास दिर्घ करुन घेणे व हलके हलके सोडणे हे ह्यात महत्वाचे.

ज्याप्रमाणे थंड पाण्याचा ग्लास भरुन पाणी पितानांच त्या पाण्याचा थंडपणा व तोंडातून घशातून पूढे जाताना जाणीव होते तशीच जाणीव तुमच्या श्वासाचीपण झाली पाहीजे. हा जाणता श्वासोछ्वास Awareness of breathing  हा शक्यतो नेहमीचा भाग असावा. ह्याकडे लक्ष केंद्रित असावे. फक्त ध्यान धारणेच्या वेळीच नसून तुमच्या दैनंदिन जीवनाच्या प्रत्येक हलचालीच्या वेळी देखील ही सवय तुमची कार्यकुशलबुद्धी वा लक्ष केंद्रित करण्याच्या वृत्तीला वाढविते.

मन चंचल असून ते कधीच शांत राहू शकत नाही. हा त्याचा नैसर्गिक गुणधर्म ठरलेला असतो. त्यांत केव्हांच बदल करुन त्याला स्थिर अवस्थेत ठेवता येणे शक्य नसते. मात्र त्याच्या सततच्या धावपळीला, उड्डानाला एकाच दिशेने राहण्याचे मार्गदर्शन प्रयत्न करुन करता येते. हे फक्त जाणीवपूर्वक सवयीने साध्य करता येते.  श्वासाच्या हलचालीवर लक्ष केंद्रित करणे ह्याने ते साध्य होते. मनाला सुद्धा  ‘ एका वेळी एकच विचार ‘    ह्या तत्वावर हलचाल करण्याची गरज असते. तो त्याचा स्थायी स्वभाव तेव्हां त्या मनाला उत्पन्न होणाऱ्या विचारांच्या मागे धावू देण्यापेक्षा जाणीवपूर्वक श्वासाच्या हलचालीवर केंद्रित करणे शक्य होऊ शकते. ह्यालाच मनाची एकाग्रता साधणे  म्हणता येइल.

ह्याच श्वासांच्या हालचालीवर मनाला केंद्रित करताना शरीरांत कांही क्रिया होऊ लागतात. प्रथम चांगल्या सपाट स्वच्छ आसनावर ताठ पाठीच्या कणाने बसलेल्या शरीराला स्थिर वा अचल केले जाते. व डोळे बंद करुन प्रथम ईश्वरी चिंतन वा नामस्मरण केले जाते. थोड्या वेळाने लक्ष श्वासाकडे केंद्रित केले जाते. ह्या प्रयत्न्यात मन एकाग्र होण्यास सुरवात होते. ह्या सर्व क्रिया जाणीवपूर्वक Voluntary action  होत असतात. मात्र तुमच्या उत्स्फूर्त प्रामाणीक, आन्तरीक आणि सत्य प्रयत्नाने ह्याच जाणीवपूर्वक सूरु केलेल्या क्रियेमध्ये, लक्ष श्वासावर केंद्रित होत असताना, तुम्ही  हळू हळू स्वतःला विसरु लागतात. अर्थात शरीराला विसरतात. स्वतःकडे आंत असलेल्या एका विशाल पोकळीमध्ये जावू लागतात. हे अजाणता   Involuntary  होऊ लागते. हीच जाणता व अजाणताची सिमा रेषा असते. कदाचित् विचीत्र अशा वातावरणांत तुम्ही शिरत असल्याचा भास होऊ लागतो.  Hallucinations प्रमाणे. जाण –अजाण ही सिमा अत्यंत महत्वाची असते. कारण याच पायरीवर तुम्ही कदाचित् बेचैन होतात. भिती वाटते. एका माहीत असलेल्या अस्तीत्वामधून अपरिचीत वातावरणांत तुम्ही शिरत असल्याचा भास होऊ लागतो. हीच तुमची सत्व परिक्षेची वेळ असते. कित्त्येकजण जोराचा प्रयत्न करुन त्या सिमारेषेवरुन झटका देत, शरीर मनाला एकदम जागृत करतात. डोळे उघडतात व त्या अजाण अशा वातावरणांत जाण्याचे हमखास टाळतात. तुम्ही ध्यानमार्गाच्या दारापर्यंत पोहंचले असतात, परंतु तुमचे मन कमकुवत बनते. तुम्ही परत सामान्य व  दैनंदिन वातावरणांत येतांत. झोपेच्या क्रियेमध्ये असेच असते. प्रथम व्यक्ती विश्रांती घेते. शरीर शिथील बनते. डोळे बंद होतात. हलके हलके देहातील जाणीवधारक क्रिया बंद पडून, सहज तुम्ही झोपेच्या आधीन जातात. जागृत अवस्था व निद्रा ह्याच्या सिमा रेखा निसर्ग अतिशय कौशल्याने पार करुन, एका स्थितीमधून दुसऱ्या स्थितीमध्ये नेवून सोडतो. ह्याची थोडीदेखील जाणीव आपणास होऊ देत नाही.  कारण  ही नैसर्गिक क्रिया असते. व जन्मापासून निसर्ग तुम्हाला ह्यात साथ करीत असतो. म्हणून यात सहजता आढळून येते. दोन अवस्थेचे पदार्पण. जागृत आणि निद्रा अथवा निद्रेतून चाळविले जावून जागृत होणे. हे निसर्ग सहज साध्य करतो.

ध्यान प्रक्रिया प्रथमावस्थेत कृत्रीम असते. खऱ्या अर्थाने ती देखील नैसर्गिकच असते. परंतु तीला प्राप्त करावे लागते. आपल्या इच्छेनुसार ध्यानावस्था निर्माण करावी लागते. गाढ निद्रेचा खरा आनंद लूटण्यासाठी म्हणजे जाणीव होण्यासाठी गाढ निद्रा व जागृतावस्था  ह्या दोन भिन्न अवस्थेला एकत्र करण्याची कला साध्य झाली पाहीजे. अत्यंत अवघड ही बाब आहे. ह्यात निद्रेमुळे शरीराला संपूर्ण विश्रांतीचे जे सुख समाधान लाभते ते तर साध्य होतेच. त्याच वेळी गाढ निद्रेमधील शांत नितांत आनंद, संतोष ह्याची जाणीव पण जागृत राहून मिळणे हे अप्रतीमच नव्हे काय ?  ध्यानामध्ये हेच साध्य होते. दोन्हीही नैसर्गिक गुणधर्म जागृत अवस्था व निद्रा ह्यांचे सुख.

परंतु ध्यान धारणा सर्व सामान्यासाठी सहज व नैसर्गिक क्रिया रहात नाही. झोप वा निद्रा सहज दोन्ही अवस्थेमधले रुपांतर साध्य करते. ध्यानावस्था जागृत अवस्थेमधून ध्यान लागणाऱ्या स्थितीत जाताना त्या सिमारेषेवरुन झेप घेऊन जाते. हालके हालके निद्रेप्रमाणे जात नाही. हीच झेप अत्यंत महत्वाची असते. उडणाऱ्या पक्षाने झाडाचा वा डोंगरकड्याचा आधार सोडून आकाशाच्या पोकळीत छलांग मारल्याप्रमाणे. पक्षी एकदम पडेल अथवा उडेल. निसर्ग त्याला तसे ज्ञान व कला देतो. विमानाला मात्र झेप घेवून उड्डान करावे लागते. एका मोठ्या पोकळीत शिरण्यासाठी. निद्रा पक्षाप्रमाणे व ध्यान धारणा विमानाच्या उड्डानाप्रमाणे. इस पार वा उस पार.

प्राथमिक अवस्थेमधील ध्यान धारक ह्याच  ‘ झेप ‘ अनुभवातून जातात. दोघाना एका अज्ञात वातावरणात शिरण्याचा एकदम नविन व प्रथम अनुभव घ्यावयाचा असतो. ह्यात शंका, भिती, अनिश्चीतता ह्या भावनाचा वरचश्मा होतो. म्हणून साधक घाबरुन त्याला सामोरे जाण्याचे टाळतो. येथेच कित्येक साघक हतबल होऊन ध्यानात खऱ्या अर्थाने शिरण्यामध्ये अयशस्वी होतात. ते आपले खोलात जाण्याच्या प्रक्रियेला तोडून टाकतात. निराश होतात.  सुरवातीच्या श्वासावरचे लक्ष केंद्रित होण्याची क्रिया प्रथम जाणीवपूर्वक असली तरी सवय व प्रयत्नाने ती अजाणीव अर्थात   Involuntary Action  बनू लागते. ती मग सहज साध्य क्रिया बनते. साधक श्वासावरच्या लक्ष केंद्रित करण्याच्या क्रियेस थोड्याशा प्रयत्नातच देह मनाची स्थिरता निर्माण करु शकतो.

साधकाची पुढची पायरी म्हणजे तो ध्यानावस्थेमधल्या जाण-अजाण ह्या स्थरापर्यंत तर आलेल्या असतो. आता मनाचा निगृह, आत्मविश्वास आणि संकल्पाची शक्ती एकवटून ह्या पायऱ्यावरुन तसेच वाहून जावू देणे. ध्यान योगांत वा ध्यान धारणेमध्ये निसर्ग सदा तुमची साथ देत असतो. साथ देण्यास तत्पर असतो. तुम्हास कांही करावयाचे नसते. मनात कसलीही शंका वा भिती न बाळगता होवू घातलेल्या शांततेच्या अवस्थेला एकरुप व्हायचे असते. ह्यात कोणताच प्रयत्न वा हालचाल अपेक्षित नसते. जी स्थीती जी देहमनाची अवस्था निर्माण झालेली असते, त्यात झोकून द्यावे लागते. हा काळ देखील फार अल्प असतो. पण जर तुम्हास ध्यानावस्था प्राप्त झाली झाली तर मिळणारे समाधान, आनंद ह्याचे शब्दांत वर्णन करता येणार नसते. आणि त्या आनंदाची तुलना तर करताच येणार नाही. कारण तो तुमचा एकमेव  ‘एकमेवाद्वितीयो ‘  आनंद असेल. ज्याला म्हणतात Ecstasy of Joy  अर्थात नितांत आनंद वा परमानंद
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..