नवीन लेखन...

आइसक्रीम खा…पण हे वाचा

बड्या बड्या कंपन्या आकर्षक आउटलेट्स उघडून खवैय्ये मंडळींना मेजवानी देण्याचा प्रयत्न करताना आपण पाहतो आहोत.

परवाच चिपळूण मधेहि बस्किन रॉबिन या आंतरराष्ट्रिय ब्रैंडच आऊटलेट सुरु झालय. पण याच आईस्क्रमच्या पडद्यामागे अनेक गोष्टी आहेत. कदाचित त्या पासून आपण अनभिज्ञच आहोत.

मागे एकदा रत्नागिरीला मिरजोळे एम आय डी सी मधे एका क्लाएंट बरोबर मिटींगसाठी माझ्या एका सरांबरोबर एका हॉटेलमध्ये गेलो होतो. तेव्हा माझ्या क्लायंटने अजून एका माणसाबरोबर ओळख करुन दिली . तो माणूस मुंबई मधे आईस्क्रीमचे निरनिराळे आणि नवनवीन फ्लेवर्स बनवतो आणि आईस्क्रीम कंपन्यांना विकतो. आता त्याला स्वतःचे माझ्या क्लायंट बरोबर आउटलेट उघडायचे होते त्यासाठी त्याला तिथे किंवा झाड़गाव एम आय डी सी मधे प्लांट सुरु करायचा होता .त्यासाठी प्रोजेक्ट रिपोर्ट करा म्हणून तो मला व सराना  पटवत होता. तो जे काही सांगत होता ते ऐकून मी उडालोच.

त्याच्या म्हणण्यानुसार त्याने अनेक नवीन फ्लेवर्स बनवले आहेत. जे काही कंपन्यांनी विकत घेतली असून सध्या मार्केटमध्ये लोकांना खूप आवडताहेत. तेआवडणाऱ्यात मीही एक होतोच.

तो म्हणाला ; “आता मी ग्वाहा(पेरू) आणि चॉकलेटआईस्क्रीम मध्ये ४ -४नवीन फ्लेवर्स बनवलेआहेत. जे मला आता कुठल्याच कंपनीला विकायचे नाहीयेत. हे फ्लेवर्स लोकांनाखूप आवडणार आहेत. ज्याचा आपल्याला आउटलेट उघडून फायदाउठवता येईल. ”

प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करताना आम्हाला उपलब्ध मार्केट त्याची सध्याची परिस्थिति प्रोडक्टचा वाव त्याला उपलब्ध असणारा पर्याय ,लागणारा पैसा, लागणार वेळ ब्रेक ईवन पॉइंट वगैरे गोष्टी विचारात घ्याव्या लागतात म्हणून मी त्याला एक साधा प्रश्न विचारला की ; “समजा आपण आउटलेटउघडलं आणि तुझे फ्लेवर लोकांना आवडले नाही तर तू त्या चॉकलेट किंवा पेरू फ्लेवरचे जे उत्पादन करशील ते किती दिवस राहू शकत? लोकांना ते आवडे पर्यंत जो काळ जाईल तोवर ते आईस्क्रीम वायाजाणार नाही का ? मग ते नुकसान कुणी सोसायच?”. पुढे माझेअनेक प्रश्न होतेच. वीजखर्च, दुध , कच्चा माल वाहतूक इत्यादी.

त्यावर तो आपले तंत्रज्ञान किती भारी आहे हे सांगताना म्हणाला की ;“त्याची काही काळजी करू नका. मुळात हे आईस्क्रीम कधीच खराब होत नाही.अगदी आठ दिवस लाईट नसले तरीही…”

आम्ही चकित झालो . सरांनी विचारलं ;“ते कस काय? दुध आहे ते खराब होणारच.”

तो तत्काळ म्हणाला ; “छे छे. दुधापासूनआईस्क्रीम बनवण्याचे दिवस केव्हाचसंपलेत. ”

“मग कशापासून बनवतोस बाबा आईस्क्रीम ?”

“डालडा तुपापासून!”

“काय डालडा तूऽऽऽऽप?” होय डालडा-वनस्पति तूप दचकलात ना
पण काय आहे सर
“आज काळ एखाद दोन कंपन्या सोडल्यातर सगळे डालडाच वापरतात आणित्यामुळेच ते परवडतं. आजकाल आईस्क्रीममध्ये एकही थेंब दुध नसतं. डालडाला थोडी प्रोसेस केली आणि त्यात फ्लेवर्स मिक्स केले की कळतही नाही की ते डालडातूप आहे. शिवाय ते दुधाच्याआईस्क्रीमपेक्षा खाताना जास्त मऊ लागतं.त्यामघे जो दुधाच्या आइसक्रीम मधे बर्फाचा कचकचित पणा काही वेळा येतो तो येत नाही आणि तेच लोकांना आवडतं.दूसर म्हणजे डालडा आईस्क्रीम जिभेवर येताच त्वरित विरघळते आणि गिळले जाते. शिवाय थंडपणा आणि तुपकटपणा यामधून तोंडात जे तयार होते ते नक्की काय आहे हा विचार लोक करीत नाहीत. पण तेच लोकांना आवडते. लोक अशाच स्वादाला पसंती देतात. ”

तो भरात येऊन त्याच्या तंत्राच मार्केटिंग करत होता आणि आम्ही आमचा इतिहास पोटात ढवळत बसलो होतो.

पुढे तो सांगत होता; “डालडा आईस्क्रीमचं वैशिष्ट्य असं की ते डालडा सामान्य तापमानात कितीही काळ राहिला तरीही अजिबात खराब होत नाही.हे आपण घरात बघतच असतो याउलट दुधाला मात्र सारखं फ्रीजिंग लागतं. शिवाय दुधाच्या आईस्क्रीमला काही दिवसांनी वास येतो. आणि १०-१२ दिवसात ते खराब होऊन जातं. त्यामुळेखर्च वाढतो. डालडा आईस्क्रीम वर्ष भर जरी फ्रीजच्या बाहेर राहिलं तरी फरक पडत नाही, त्याचे फ्लेवर्सही खराब होत. नाहीत.

डालडा आईस्क्रीमसाठी लाईटखुपच कमी लागते. १० डिग्रीतापमानातही त्याचा आईस्क्रीम फील येतो. तर दुधाच्या आईस्क्रीमसाठी उणे तापमानाची (नक्की किती ते आत्ता आठवत नाही.) गरज असते. सहाजिकच दुधाच्याआईस्क्रीमच्या विजेचा खर्च वाढतो.

शिवाय दुधापेक्षा डालडा कच्चामाल म्हणून जास्त स्वस्त आहे. तस ते हाताळणी आणि प्रोसेसलाही खूप सोपेआहे. दुधाचे रोजचे कलेक्शन, त्याचे फ्रीजिंग आणि साठवण याचा विचार करता त्याची जी बेसिक किंमत होते. त्या किंमतीतही लोकांना ते आईस्क्रीम खाण परवडू शकत नाही. डालडा आईस्क्रीममध्ये खूप मोठे प्रोफिट मार्जिन आहे.म्हणूनच आजकाल इतके पॉश आईस्क्रीमआउटलेट निघू शकतात. ”

“डालडा आईस्क्रीम उत्पादनाचाआणखी एक फायदा असा आहे की एकच प्रोडक्शन युनिट चालवून भारत भर कुठेही आपण याचे वितरण करू शकतो.तेही कमी खर्चात. दुधाच्या आईस्क्रीमला तो बेनिफिट नाही. त्यासाठी प्रत्येक ठिकाणी प्रोडक्शन युनिट सुरु करावेलागेल.ह्यामुळेच जर आज तुम्ही मार्केट मधल्या प्रतितयश कंपन्याच्या आइसक्रीम चे प्रोडक्शन ठिकाण बघितल तर ते हरियाणा , मध्यप्रदेश इकडचे दिसेल आता त्याच कारण कळल”

तो रंगात आला होता. त्याने त्याचे नवीन नुकतेच बाजारात आलेले फ्लेवर टेस्ट करायला दिले.मला डालडा आईस्क्रिम खाल्ल्यामुळे नक्की काय तोटा होतो ते माहीत नाही.पण त्यानंतर आईस्क्रीम खायची मजा निघून गेली इतकं नक्की.

ह्यापुढे आइसक्रीम खाताना ब्रैंड महत्वाचा नसून त्याचे कंटेंट किंवा इंग्रीडियंट बघा ते महत्वाचे आहे. बाकी तुमचे निर्णय आणि आरोग्य दोन्हीही तुमच्याच हातात आहे ….

 

— व्हॉटसअॅप वरुन

Avatar
About Guest Author 522 Articles
मराठीसृष्टीवर ज्या लेखकांनी स्वत:चे अकाऊंट बनवले नाही त्यांचे लेख या Guest Author द्वारे प्रकाशित होतात. आपले सर्व लेख एकत्रितपणे मिळवण्यासाठी स्वत:चे अकाउंट मराठीसृष्टीवर जरुर बनवा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..