नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

भारतमातेच्या वीरांगना – ३० – दुकडीबाला देवी

इंग्रज क्रांतिकारकांच्या मागावर नेहमीच असत. असेच एकदा ते तपास करत करत दुकडीबाला ह्यांच्या घरी पोचले. तिथे त्यांना काही शस्त्र सापडलीत आणि दुकडीबाला देवी ह्यांना अटक करण्यात आली.

त्यांना प्रचंड यातना दिल्या गेल्या जेणेकरून त्या आपल्या अन्य साथीदारांची नावं सांगतील, पण दुकडीबाला इंग्रजांच्या जाचापुढे बधल्या नाहीत. त्यांनी कोणाचेही नाव घेतले नाही, की एकही माहिती फुटू दिली नाही. त्यांना अडीच वर्षांचा सश्रम कारावास देण्यात आला.कारावासात असतांना सुद्धा त्यांनी कधीही तक्रार केली नाही. त्यांच्या वाटेला नेहमीच इतरांपेक्षा जास्त कठीण कामं येत गेली आणि त्या करत गेल्या. […]

सहप्रवासी (कथा)

फर्स्ट क्लासचा प्रवासी होता तो. मागच्याच स्टेशनवर भरपेट खाऊन, – पिऊन सुध्दा – केबिनमधल्या बर्थच्या मऊ मुलायम कव्हर घातलेल्या गादीवर, सर्व गात्रे सैल सोडून डुलकी घेत, शांत निद्रेची वाट बघत पडला होता. पण डुलकी पाच मिनिटांपेक्षा जास्त वेळाची नव्हती. […]

देवभूमीतील पंचबद्री  – विशालबद्री किंवा बद्रीनाथ – भाग 1

पांडुकेश्वर ते विशालबद्री हे २४ कि.मी. अंतर आहे. या स्थानाचे माहात्म्य विशाल आहे म्हणून हे स्थान विशालबद्री म्हणून ओळखले जाते. ह्या पवित्र भूमीत देवदेवता, ऋषी-मुनी, साधू-संन्याशी, तपस्वी महात्म्यांनी वास्तव्य केले. तपोसाधना, ध्यानसाधना केली. बद्रीनाथचे दर्शन हे त्यांचे जीवन ध्येय होते. या भूमीत व्यास महर्षीनी वेद-पुराणांची, महाभारताची रचना केली. शंकराचार्यांनी ब्रह्मसूत्रावर, उपनिषदावर भाष्य याच भूमीत केले. पांडुकेश्वर […]

भारतमातेच्या वीरांगना – २९ – दुर्गावती वोहरा (दुर्गा भाभी)

नौजवान भारत सभा च्या त्या सक्रिय सदस्या होत्या . त्यांच्या कार्याची सुरवात अगदी लवकरच झाली होती तरी त्यांच्या कामाचा परिचय तेव्हा झाला ज्यावेळी त्यांच्या अध्यक्षतेखाली करतार सिंग सारबा (ज्यांनी वयाच्या १९ व्या वर्षी देशासाठी सर्वोच्च बलिदान दिले) ह्यांची ११ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
श्री विमल प्रसाद जैन ह्यांचा बॉम्ब बनविण्याचा कारखाना होता, ‘ हिमालयन टॉयलेट्स’ ह्या नावाखाली. दिखाव्या साठी काही और बनायचे आणि प्रत्यक्षात तिथे बॉम्ब बनविले जायचे. दुर्गा भाभी आणि त्यांचे पती श्री बोहरा दोघे जातीने तिथे मदत करायचे. […]

उद्घोषक (अनाउन्सर)

प्रत्येक यंत्रणेत अनेक पातळ्यांवरचं व्यवस्थापन सांभाळणं हा मोठा कौशल्याचा आणि तंत्रशुद्धतेचा भाग असतो आणि रेल्वेबाबत तर, देशभर ठरलेल्या वेळेत, ठरलेल्या मार्गांवर रेल्वे धावती असणं आणि कोणती गाडी कोणत्या स्टेशनामध्ये किती वाजता येते आहे, जाते आहे हे प्रवाशांना माहीत असणं, असा प्रवाशांप्रतीच्या व्यवस्थापनाचा दुहेरी भाग ठरतो. आज प्रवाशांपर्यंत गाडीची माहिती पोहोचवण्याचं काम उद्घोषक करतात, पण रेल्वेच्या सुरुवातीच्या […]

भारतमातेच्या वीरांगना – २८ – प्रितीलता वड्डेदार

१९३२ साली पाहाडतळी युरोपियन क्लब वर हल्ला करण्याची योजना सूर्य सेन ह्यांनी केली आणि ह्याची जवाबदारी प्रितीलता ह्यांच्यावर सोपवली. हाच तो क्लब जिथे बाहेर पाटी होती, “Indians and dogs are not allowed”. २४ सप्टेंबर च्या रात्री १०.४५ मिनिटांची वेळ निश्चित करण्यात आली. प्रितीलता एका पंजाबी युवक बनून गेल्या,तर त्यांचे इतर साथीदार वेगळ्या वेषात क्लब जवळ पोचले. आतमध्ये ४० इंग्रज उपस्थित होते. बॉम्ब ने हल्ला करण्यात आला. गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात एक व्यक्ती मारला गेला तर अर्ध्याच्या वर जखमी झाले. प्रितीलता आणि त्यांचे साथीदार तिकडून बाहेर पडले, पण इंग्रजांनी दिलेल्या प्रतिउत्तरात प्रितीलता ह्यांच्या पायाला गोळी लागली, त्या पळण्यास असमर्थ ठरल्या. इंग्रजांच्या हाती पकडल्या जाण्यापेक्षा त्यांनी मरण पत्करले. पोटॅशियम सायनाईड खाऊन त्यांनी आपले जीवन देशाच्या चरणी अर्पण केले. […]

‘हरवलेल्या’ शहरांचा शोध

अ‍ॅमेझॉनच्या जंगलात लपलेली अशी दोन पुरातन शहरं, दक्षिण अमेरिकेतील बोलिविआ या देशात सापडली आहेत. बोलिविआतील मोजोस पठारांच्या परिसरात सापडलेली ही शहरं सहाशे वर्षं जुनी आहेत. या प्राचीन वसाहतींचा शोध लावण्यासाठी लायडर या तंत्रज्ञानाचा उपयोग केला गेला. बॉन येथील ‘जर्मन आर्किऑलॉजिकल इंस्टिट्यूट’ या संस्थेतील हायको प्र्युमर्स आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं हे संशोधन ‘नेचर’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे. […]

देवभूमीतील पंचबद्री  – योगबद्री

हेलंगपासून १४ कि.मी. अंतरावर ‘जोशीमठ’ हे प्रसिद्ध स्थळ आहे. ह्या स्थानाचे मूळ नाव ‘ज्योर्तिमठ’! जोशीमठ हा अपभ्रंश आहे. जोशीमठ ते बद्रीनाथ हा रस्ता अरुंद व अवघड आहे. या रस्त्यावर जोशीमठापासून २४ कि.मी. अंतरावर पांडुकेश्वर हे गाव आहे. पांडू राजाने आपला अखेरचा काळ या ठिकाणी व्यतीत केला होता. पांडवांची ही जन्मभूमी समजली जाते. असेही सांगतात की स्वर्गारोहणासाठी […]

1 52 53 54 55 56 223
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..