कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे बहुतांश व्यक्तींना आर्थिक अडचणीना सामोरे जावे लागत आहे. अशावेळी अर्थप्राप्तीच्या पर्यायी मार्गाचाही शोध घेतला जात आहे. जिओमुळे स्वस्त झालेल्या इंटरनेटचा वापर मनोरंजनाबरोबरच माहिती,ऑनलाईन उत्पन्न मिळविण्यासाठी म्हणजेच online earningकरण्यासाठी मोठ्या प्रमाणावर केला जातोय.त्यासंबंधीचे आकर्षक थंबनेल असलेले युट्यूब व्हिडिओ पाहून अनेकांच्या मनात गैरसमज व अवास्तव अपेक्षा देखील निर्माण झाल्या आहेत.अशावेळी ऑनलाईन उत्पन्नाचे मार्ग, पद्धती योग्यरीत्या समजून न घेता त्या गोष्टी करावयास गेल्याने निराशाच पदरी पडते. अशावेळी तुम्ही ऑनलाईन उत्पन्नाचे पर्याय शोधत असाल तर काही बाबी लक्षात ठेवणे तुमच्या गरजेचे असेल. […]
जगातल्या ५ महत्त्वाच्या सस्पेंशन ब्रिज मधील सर्वोत्तम! जगप्रसिद्ध गोल्डन गेट ब्रिज पेक्षा लांब व मोठा असलेला इंजीनियरिंगचा चमत्कार! माणसाने ठरवलं तर अशक्य काहीच नसतं हे आपण बऱ्याचवेळा ऐकतो आणि लोकांना समजावतो सुद्धा! ह्याची पुरे पुर प्रचिती देणारी एक जागा म्हणजे जपान मधला सस्पेंशन ब्रिज! आकाशी खाईक्यो .. […]
आदि शंकराचार्यांनी रचलेल्या या श्री गणेशाच्या स्तुतीपर स्तोत्रात पाच श्लोक आहेत. सहावा फलश्रुतीचा आहे. यातील श्लोकांचे / चरणांचे विविध अभ्यासकांनी वेगवेगळे अर्थ लावलेले दिसतात. […]
मद्रास डे हा सण , तामिळनाडूतील मद्रास (आताचे चेन्नई) स्थापनेच्या स्मरणार्थ साजरा केला जाणारा सण आहे. दरवर्षी हा सण २२ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. २२ ऑगस्ट १६३९ ही तारीख मद्रासपट्टणम किंवा चेन्नापट्टणम ह्या गावाच्या खरेदीसाठी अधिकृतपणे घोषित करण्यात आली. हे गाव ईस्ट इंडिया कंपनीचे घटक असलेल्या अँड्र्यू कोगन व फ्रान्सिस डे यांनी त्यावेळचे विजयनगरचे व्हाइसरॉय दमर्ला वेंकटाद्री नायक यांच्याकडून खरेदी केले. […]
आज दिनांक १९ ऑगस्ट. जगभरातल्या छायाचित्रं काढणाऱ्या कॅमेराप्रेमींचा हा अत्यंत लाडका दिवस. आज ‘ जागतिक छायाचित्रण दिवस ‘ आहे. आजच्या दिवसाला सगळे छायाचित्र काढणारे कलाकार , घराबाहेर पडून आपली हौस भागवून घेतात. छायाचित्रणाचा इतिहास काय आहे व छायाचित्रणाचा किती प्रकार आहेत हे आपण जाणून घेऊ. […]
मंडळी आज दिनांक १७ ऑगस्ट. ह्या तारखेला परदेशात काळ्या मांजरीचा कौतुक दिन साजरा करतात. म्हणूनच तिचं कौतुक करण्यासाठी ही कथा. फक्त एकच सांगू इच्छितो. काळी मांजर दिसायला भयानक जरी असली तरी ती खूप खेळकर आणि प्रेमळ असते. जरा अंधश्रद्धेला बाजूला ठेवून तिचाही विचार करा. बिचारी ती मुकी , ती आपल्या भावना आपल्याकडे कशा व्यक्त करणार […]
या लेखाद्वारे, मुलींसाठीच्या खास अशा एका संधीची ओळख करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. या संधीचा आपण लाभ घेतलात तर जवळ जवळ शून्य खर्चात आपली मुलगी डिप्लोमा इंजिनिअर बनू शकते आणि नुसते डिप्लोमाचे प्रमाणपत्रच नाही तर कोर्स संपल्यावर तिच्याकडे एका वर्षांचा इंडस्ट्री मधील कामाचा अनुभव देखील असेल ज्याच्या जोरावर तिला नोकरी मिळविण्यात कोणत्याच अडचणी येणार नाहीत! […]
म्हणूनच आजपासून प्रतिज्ञेतील ” माझा ” हा शब्द ओळखून वागण्याचे ठरवले आहे. कारण आपण जेव्हा एखादी वस्तू माझी आहे अशी म्हणतो त्या वेळेस आपण त्या गोष्टीची जिवापलीकडे काळजी घेतो, जपतो आणि म्हणूनच भारत “माझा” देश आहे. […]
अरे किती रंग बदलशील? एखादा सरडा पण तुझ्यापेक्षा कमी रंग बदलत असेल , असं बोलून आपण सरड्याला बदनाम करतो. वास्तविक पाहता सरडा आपला रंग वेगवेगळ्या कारणांसाठी बदलतो. त्याला अनेक नैसर्गिक व विज्ञानातील कारणं आहेत. […]
आज दिनांक १३ ऑगस्ट. परदेशात हा दिवस खास डावऱ्या म्हणजे डाव्या हाताने काम करणाऱ्या लोकांसाठी साजरा केला जातो. ह्या दिवसाला ‘इंटरनॅशनल लेफ्ट हँडर्स डे’ म्हणून संबोधलं जातं. काय विशेष असतं लेफ्टी लोकांमध्ये? पूर्ण जगात ह्यांची संख्या किती आहे? डावरी प्रसिद्ध व्यक्तिमत्व कोण? ह्या संदर्भात आपण ह्या लेखात माहिती घेऊ. […]