नवीन लेखन...

जागतिक छायाचित्रण दिवस

आज दिनांक १९ ऑगस्ट. जगभरातल्या छायाचित्रं काढणाऱ्या कॅमेराप्रेमींचा हा अत्यंत लाडका दिवस. आज ‘ जागतिक छायाचित्रण दिवस ‘ आहे. आजच्या दिवसाला सगळे छायाचित्र काढणारे कलाकार , घराबाहेर पडून आपली हौस भागवून घेतात. छायाचित्रणाचा इतिहास काय आहे व छायाचित्रणाचा किती प्रकार आहेत हे आपण जाणून घेऊ.

इतिहास –

पहिल्या कॅमेरा छायाचित्रणाची मूळ संकल्पना ख्रिस्तपूर्व ५ व्या शतकापासून सुरू झाली होती. ही संकल्पना तोपर्यंत रूढ राहिली जोपर्यंत ११ व्या शतकात इराकी शास्त्रज्ञांनी ओबस्कुराचा शोध लावला नाही. तरीही प्रथमदर्शनी कॅमेराने प्रतिमा चित्रित केल्या नाहीत , त्याने फक्त त्यांना दुसऱ्या पृष्ठभागावर प्रक्षेपित केल्या. त्यावेळी वस्तूंचे अचूक रेखांकन करण्यासाठी प्रतीमाही वरच्या बाजूला होत्या. तंबूत पहिल्या ओबस्क्युरा कॅमेराने त्याच्या पिनहोलचा वापर प्रतिमा , उजेडातून अंधाऱ्या भागात  आणण्यासाठी केला. हे तंत्रज्ञान तोपर्यंत चालू राहिले जोपर्यंत ओबस्क्युराचा छोटा पोर्टेबल कॅमेरा तयार नाही झाला. १७ व्या शतकात पोर्टेबल ओबस्क्युरा कॅमेराचा शोध लागला.

आपल्याला ठाऊकच असेल की , छायाचित्रणाची खरी सुरुवात १८३० च्या उत्तरार्धात फ्रान्समध्ये झाली. जोसेफ निकफोर निप्सी ह्यांनी पोर्टेबल कॅमेराचा वापर शिसे व कथिल ह्यांच्या मिश्रित कोळसा पेटवण्याचा पात्राचा छायाचित्र काढण्यासाठी केला. हे पहिलं छायाचित्र ठरलं जे बराच काळ धूसर न होता टिकू शकणारं होतं.

निप्सच्या प्रयोगाने छायाचित्रण क्षेत्रात उत्क्रांती घडून आली. पुढे ह्या क्षेत्रात अनेक प्रयोग झाले. १८०० शतकाच्या मध्य ते उत्तरार्धापर्यंत डॅगेरिओटाइप्स, इमल्शन प्लेट्स आणि ओल्या प्लेट्स एकाच वेळी विकसित केल्या गेल्या.

प्रकार –

Fashion Photography

Landscape Photography

Product Photography

Wedding Photography

Macro Photography

Sports Photography

Street Photography ETC

आदित्य दि. संभूस.

#World Photography Day #19th August

Avatar
About आदित्य संभूस 78 Articles
मराठी नाट्य चित्रपट कलाकार, दिग्दर्शक, लेखक...

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..