नवीन लेखन...

पहिल्या पानावरुन तसेच इतरही विभागातून प्रमोट करण्यासारखे काही खास लेख

श्राद्ध म्हणजे ऋणमुक्ती

भारतीय संस्कृतीने आपल्याला श्रेष्ठ संस्कारांचा बहुमोल खजाना दिला आहे. पारंपारिक प्रथा, उत्सव, जयंती, उपवास…. ह्या सर्वांद्वारे ईश्वर तसेच आपले पूर्वज, महात्म्याचा आदर करणे, त्यांची कर्मकथा आठवून त्यांच्याकडून काही शिकण्याची समज दिली आहे. त्यांच्यापैकीच एक म्हणजे श्राद्ध. […]

लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग ८)

सीमाभागातील मराठी माणूस महाराष्ट्रात जाण्यासाठी लोकशाही मार्गाने लढत होता. कर्नाटकी पोलिसांच्या लठ्या-काठ्या झेलत होता. छातीची ढाल करून अंगावर वार घेत होता. कर्नाटकी अत्याचारांना समर्थपणे तोंड देत होता. मराठा तुटेल, मोडेल पण वाकणार नाही याची पुन्हा, पुन्हा प्रचिती येत होती. […]

ब्रह्म मुहूर्त

गेलेला वेळ पुन्हा हाती येऊ शकत नाही. आणि कोणी त्याला पकडू ही शकत नाही. म्हणून जर सफलतेचे शिखर गाठायचे असेल, समाधानी जीवन जगायचे असेल तर ब्रह्म मुहूर्ता मध्ये उठून स्वतःला प्रशिक्षित करावे. मन प्रसन्न व शक्तिशाली झाले तर शारीरिक समस्या ही समाप्त होतील. […]

पुण्यातील प्रभात चित्रपटगृहाचा वाढदिवस

प्रेक्षकांच्या गरजा ध्यानात घेऊन चित्रपटगृहाची उभारणी करण्यात आली होती. सामान्य प्रेक्षकांना परवडतील असे दर ठरवून आसनव्यवस्थेची वर्गवारी करण्यात आली होती. […]

दुःख स्वीकारावे स्वानंदे

आज नाही तर उद्या हे दुःखांचे काळे ढग नक्कीच आपल्या जीवनातून निघून जातील व सुखाचा सूर्योदय होईल. म्हणून ह्या दुःखाला एक रात्र समजा. रात्र कितीही काळीभोर असली तरी सूर्याची सुखद सोनेरी किरणे ही आपल्या आयुष्यावर अचूक वेळी पडतीलच. ह्या रात्रीचा स्वीकार करा. स्वीकारभाव अनेक कठीण समस्यांना सामोरे जाण्याचे बळ देईल. त्यातच आहे खरा आनंद. […]

धन्यवाद मंत्र

वस्तु, पदार्थ, प्रकृती सर्वांची आवश्यकता आपल्याला आहे. त्यांचा शिवाय आपले जीवन नीरस आहे. म्हणून त्यांना ही हृदयाच्या निर्मळ भावनांनी धन्यवाद. तसेच ज्या ईश्वराने वेळोवेळी आपल्याला मदत केली. जिथे सगळ्या आशा संपल्या होत्या अशा वेळी जीवन सुखांनी भरून टाकले अश्या त्या परम सत्येला धन्यवाद करायला विसरू नका. हा धन्यवाद मंत्र सतत करत राहिले तर कधीच दुःखाची झळ आपल्याला लागू शकणार नाही. […]

महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ९ – फणस

फणस हा सदाहरित वृक्ष असून मूलस्थान भारतीय द्वीपकल्प आहे असे समजले जाते. त्याचे शास्त्रीय नाव Artocarpus heterophyllus (Family Moraceae) आहे. यास इंग्लिश मध्ये जॅकफ्रुट म्हणतात […]

क्रोधावर नियंत्रण

पुरातन काळातील कथा आपल्याला हेच शिकवतात की जितके आपण शांत, प्रेमळ राहू तितके लोकांचे आवडते आणि जितके अहंकारी, तापट स्वभाव तितकेच लोकांचे नावडते. आज आपल्यासमोर जे आदर्श व्यक्ति आहेत त्यांच्या जीवनामध्ये संतुलन दिसून येते स्वतःवर नियंत्रण ठेवणारा व्यक्तीच दुस-यांना नियंत्रित करू शकतो. आपले मात्र संपूर्ण जीवन दुसयाला नियंत्रण करण्यामध्ये व्यतीत होते. […]

लढा सीमेचा – लढा अस्मितेचा !! (भाग ७)

३ मे १९५९ पासून मराठी भाषिक प्रदेशात साराबंदीचा प्रचार करण्यात आला. सीमा भागातील १५० गावात साराबंदीचे आंदोलन सुरू करण्याचे ठरविण्यात आले. परंतु हे आंदोलन करतांना दोन महत्वाचे निर्णय घेण्यात आले. साराबंदी आंदोलन करताना मराठी व कानडी भाषिकांत संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेण्यात यावी व साराबंदीचा निर्णय गावच्या जनतेने स्वयंस्फुर्तीने घ्यावा, असे ते दोन निर्णय होते. त्याला लोकांचा प्रतिसादही मिळाला. […]

1 114 115 116 117 118 241
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..