नवीन लेखन...

शैक्षणिक

‘शून्य’ तापमानाकडे

शून्याखालील २७३.१५ अंश सेल्सियचं तापमान म्हणजे भौतिकशास्त्रात संशोधन करणाऱ्या अनेक शास्त्रज्ञांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. कारण पदार्थाचं तापमान जसंजसं या विशिष्ट तापमानाच्या जवळ जातं, तसे त्या पदार्थाच्या गुणधर्मांत आश्चर्यकारक बदल होत जातात. निरपेक्ष शून्य तापमानाच्या जवळ त्या पदार्थाचं एका नव्या स्थितीत रूपांतर होतं. या स्थितीत, त्या पदार्थातले सर्व रेणू एकत्रित होऊन, त्या सर्वांचा एक मोठा रेणू झाल्यासारखा भासतो. पदार्थाची ही स्थिती अत्यंत विस्मयकारक आहे. […]

पहाटक्षणांची मातब्बरी !

पहाटक्षणांमधील सुंदरता, भुरळ, जादू, उत्साहवर्धक जोम आणि प्रेरणा लोळण्यात/पेंगण्यात/आळसात वाया मी घालवू नये. उलट मला माझ्या उरलेल्या आयुष्यात हे पहाटेचे ” अधिकचे ” जीवन सामावून घेऊ देत. […]

वर्षावनांचा कायापालट

पृथ्वीवरील प्राणिसृष्टीवर वर्चस्व गाजवणारे डायनोसॉर हे सरीसृप या आघातामुळे नष्ट झाले आणि सस्तन प्राणी हे, त्यानंतर अस्तित्वात आलेल्या प्राणिसृष्टीचे महत्त्वाचे घटक बनले. या आघातानंतर, प्राणिसृष्टीप्रमाणे वनस्पतिसृष्टीत कोणता बदल घडून आला, याचं कुतूहल उत्क्रांतीच्या अभ्यासकांना आहे. हे कुतूहल काही प्रमाणात शमवू शकणारं एक संशोधन ‘सायन्स’ या शोधपत्रिकेत अलीकडे प्रसिद्ध झालं आहे. पनामा शहरातल्या (मध्य अमेरिका) स्मिथ्सोनिअन ट्रॉपिकल रिसर्च इंस्टिट्यूट या संस्थेतील पुराजीवशास्त्रज्ञ मोनिका कार्‌व्हॅलो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या या संशोधनाचे निष्कर्ष लक्षवेधी आहेत. […]

हिलिअमची गळती

पृथ्वी जेव्हा जन्माला येत होती तेव्हा पृथ्वीभोवती असणाऱ्या हायड्रोजन आणि हिलिअमयुक्त वातावरणाचा दाब हा, पृथ्वीच्या वातावरणाच्या आजच्या दाबाच्या तुलनेत दोनशे ते तीनशे पट इतका प्रचंड होता! या प्रचंड दाबामुळे याच वातावरणातला हिलिअम वायू हा द्रवरूपातल्या तप्त शिलारसात मोठ्या प्रमाणात विरघळला. त्यानंतर या शिलारसाच्या अभिसरणाद्वारे या हिलिअमचा काही भाग शिलारसाखालील गाभ्यात मिसळला. […]

जवळचं कृष्णविवर…

ताऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या गाभ्यातली ऊर्जानिर्मिती थांबते व ताऱ्याचा गाभा कोणत्याही अडथळ्याविना, स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणामुळे आकुंचन पावू लागतो. अतिवजनदार ताऱ्याच्या बाबतीत तर तो इतका आकुंचन पावतो की, त्याची घनता अनंत होते. या अनंत घनतेमुळे या वस्तूचं गुरुत्वाकर्षण इतकं प्रचंड असतं की, अशा वस्तूकडून प्रकाशही बाहेर पडू शकत नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचं तर, ताऱ्याच्या गाभ्याचं रूपांतर कृष्णविवरात होतं. […]

थडग्यातले गंध

वासांशी संबंधित नव्या संशोधनात इजिप्तमधील उत्खननाचा मोठा वाटा आहे. इजिप्तमधील उत्खननात प्राचीन काळातली अनेक थडगी सापडली आहेत. या थडग्यांत त्या काळच्या प्रथेनुसार अनेक पदार्थ ठेवलेले असतात. यांत विविध सुगंधी द्रव्यांपासून ते खाद्यान्नापर्यंतच्या पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ ठेवलेली काही भांडी उघडी असतात, तर काही भांडी बंद केलेली असतात. बंद भांड्यांतील पदार्थांचा शोध घेताना, या इतिहासकालीन भांड्यांची मोडतोड होऊ द्यायची नसते. त्यामुळे भांड्यात कोणते पदार्थ ठेवले आहेत, ते शोधणं आव्हानात्मक असतं. अशा बंद भांड्यांतील पदार्थ ओळखण्याचा एक लक्षवेधी प्रयत्न, इटलीतील पिसा विद्यापीठातल्या इलारिआ देगानो आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी अलीकडेच केला आहे. इलारिआ देगानो आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं हे संशोधन, इजिप्तमधल्या एका प्राचीन थडग्यात सापडलेल्या वस्तूंवरचं आहे. हे संशोधन म्हणजे याच थडग्यावरच्या, ‘टीटी८’ या नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका मोठ्या संशोधन प्रकल्पाचा भाग आहे. […]

प्राचीन महापर्वत!

पृथ्वीच्या पृष्ठभागात सतत बदल होत असतात. पृष्ठभागाच्या हालचालीमुळे पृथ्वीवर नवे पर्वत निर्माण होत असतात. यातले काही पर्वत छोटे असतात, तर काही पर्वत प्रचंड असतात. ऑस्ट्रेलिआतील रिसर्च स्कूल ऑफ अर्थ सायन्सेस या संस्थेतील झियी झू आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी आपल्या संशोधनाद्वारे, पुरातन काळात निर्माण झालेल्या प्रचंड पर्वतांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला. या मागोव्यातून त्यांना, पुरातन काळात पृथ्वीवर […]

गायत्री मंत्र संपादन (नवीन गायत्री मंत्रांसह)

गायत्री मंत्रांबद्धल अनेक लोकांना कुतूहल असते. पण त्याबद्दलची विशेष माहिती नसते. बहुतेक लोकांना ‘ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं’ ही सविता गायत्री म्हणजे सूर्य गायत्री माहिती असते. मूळ सूर्य गायत्री मंत्राशिवाय पण अशा खूप गायत्र्या आहेत. त्या या लेखात संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे. गायत्र्या वेगवेगळ्या देवतांच्या असतात. सर्व ठिकाणी एकवाक्यता नाही. […]

शिलारसाचा अग्निरोध!

ज्वालामुखीच्या उद्रेकात बाहेर पडणारा शिलारस अत्यंत तप्त असतो. वितळलेल्या खडकांपासून तयार झालेल्या या शिलारसाचं तापमान बाराशे अंश सेल्सिअसच्या आसपास असतं. हा अतितप्त शिलारस जळाऊ पदार्थांना सहजपणे आगी लावू शकतो. पण आश्चर्य म्हणजे, आता याच शिलारसाचा अग्निरोधक लेप म्हणून उपयोग करता येणं शक्य असल्याचं दिसून आलं आहे. कारण इतर पदार्थांना आगी लावणारा शिलारस स्वतः मात्र जळत नाही. ऑस्ट्रेलिआतील ‘सेंटर फॉर फ्युचर मटेरिअल्स’ या संस्थेतील पिंगान साँग आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांचं, या अभिनव अग्निरोधकावरचं हे संशोधन ‘मॅटर’ या शोधपत्रिकेत अलीकडेच प्रसिद्ध झालं आहे.  […]

नोबेल पुरस्काराइतकाच श्रेष्ठ भारतीय साहित्यातील ज्ञानपीठ पुरस्कार

ज्ञानपीठ पुरस्कार सुरू करण्यामागे रमा जैन यांची प्रेरणा होती. रमा जैन आणि त्यांचे पती साहू शांतिप्रसाद जैन यांनी भारतीय साहित्यिकांच्या गौरवार्थ हा पुरस्कार देण्याचे ठरवले. २२ मे १९६१ या दिवशी साहू जैन यांच्या एक्कावन्नाव्या वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी स्वतःच्या कौटुंबिक ट्रस्टमधून ज्ञानपीठ पुरस्कार देण्याची घोषणा केली. त्यानुसार भारतीय ज्ञानपीठाच्या संस्थापक अध्यक्षा रमा जैन यांनी १६ सप्टेंबर […]

1 66 67 68 69 70 155
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..