नवीन लेखन...
संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

डॉ. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा

कवी, नाटककार, कादंबरीकार, समीक्षक, विचारक, प्राध्यापक,म्हैसूर विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. कुप्पलि वेंकटप्पा पुटप्पा यांचा जन्म २९ डिसेंबर १९०४ रोजी झाला. महाकवी, राष्ट्रकवी, कथाकार, कादंबरीकार, नाटककार, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, तत्त्वचिंतक, समीक्षक, विज्ञाननिष्ठ अशा अनेक अंगांनी कुवेंपु यांचा कन्नड साहित्य आणि कर्नाटकावर प्रभाव पडलेला दिसून येतो. कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्य़ातील तीर्थहळ्ळी तालुक्यातील माळेनाड क्षेत्रातील कुप्पळ्ळा गावी एका प्रतिष्ठित, सुसंस्कृत कन्नड भाषिक घरात त्यांचा […]

सागर आर्टस चे सर्वेसर्वा व संस्थापक डॉ. रामानंद सागर

सागर आर्टस चे सर्वेसर्वा व संस्थापक डॉ. रामानंद सागर यांचा जन्म २९ डिसेंबर १९१७ रोजी झाला. रामानंद रसागर यांचा जन्म लाहोर जिल्ह्य़ातील असलगुरूके या गावी झाला. त्यांचा मूळ परिवार पेशावर येथील. पेशावर सोडून ते काश्मीर येथे स्थायिक झाले. त्यांचे पणजोबा लाला शंकरदास चोप्रा, मूळचे श्रीमंत- आजोबा लाला गंगाराम यांनी आयात निर्यात व्यवसायांत अथक परिश्रम घेऊन एवढे उच्चस्थान प्राप्त केले की, […]

मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर

मराठी भाषेतील नामवंत गझलकार शायर व कवी भाऊसाहेब पाटणकर यांचा जन्म २९ डिसेंबर १९०८ रोजी अमरावती जिल्यातील अचलपूर येथे झाला. भाऊसाहेब पाटणकर अर्थात वासुदेव वामन पाटणकर यांना त्यांचे परिचित “जिंदादिल” भाऊसाहेब पाटणकर असेच म्हणायचे. त्यांचे वडील वेदपंडित, तो वारसा भाऊसाहेबांनी कायम ठेऊन, संस्कृत, मराठी, उर्दू, इंग्रजी, भाषेवर प्रभुत्व मिळवले. नागपुरातून विधी शाखेची पदवी प्राप्त करून, १९३५ साली भाऊसाहेबांनी यवतमाळ […]

भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा वाढदिवस

या भारतामधल्या सर्वात जुन्या पक्षाने आपल्या १३३ व्या वर्षात पदार्पण केलंय. २८ डिसेंबर १८८५ या दिवशी मुंबईतील तेजपाल सभागृहात कॉंग्रेस पक्षाची स्थापना झाली होती. गेल्या १३३ वर्षात या पक्षाने देशाच्या इतिहासात एक न पुसता येणारे स्थान निर्माण केले आहे. संजीव वेलणकर पुणे. ९४२२३०१७३३ संदर्भ. इंटरनेट

कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर

कादंबरीकार, समीक्षक, वृत्तसंपादक गजानन त्र्यंबक माडखोलकर यांचा जन्म २८ डिसेंबर १८९९ रोजी झाला. माडखोलकर यांचे वडील त्र्यंबकराव मुंबईत भिक्षुकी करीत. त्यांच्या आई पार्वतीबाई या त्याकाळी शिक्षित असलेल्या स्त्रियांपैकी एक होत्या. आईने केलेल्या संस्कारामुळे लहानपणीच माडखोलकरांनी मराठी आणि संस्कृत भाषेवर प्रभुत्व मिळवले होते. मुंबईच्या आर्यन एज्युकेशन सोसायटीच्या शाळेत त्यांचे सर्व शिक्षण झाले होते. राष्ट्रसभेच्या अधिवेशना- पासून स्फूर्ती घेऊन […]

धीरूभाई हिराचंद अंबानी

धीरूभाई हिराचंद अंबानींचा जन्म २८ डिसेंबर १९३३ रोजी झाला. धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी धीरुभाई हे गुजराती, भारतीय उद्योजक होते. धीरुभाई यांचे वडील हिराचंद हे एका प्राथमिक शाळेत शिक्षक होते. शिक्षण अर्धात सोडल्यानंतर धीरुभाई मुंबईत आले. उदरनिर्वाह भागवण्यासाठी त्यांनी रस्त्यावर फळे विकण्याचे काम केले. दुकानांमध्ये काम केले. त्यानंतर ते यमन येथे गेले. तिथे त्यांना एका […]

उद्योग जगातला संत रतन टाटा

उद्योग जगातला संत रतन टाटा यांचा जन्म २८ डिसेंबर १९३७ रोजी झाला. टाटा.. भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटी आणि विश्वासाच्या भक्कम पायावर उभी, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढय़ांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटा संस्कृती! टाटांनी केलेली संपत्ती निर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत, तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत, तशीच […]

व्यासंगी समीक्षक रामचंद्र शंकर वाळिंबे

डॉ. रामचंद्र शंकर उर्फ रा. शं. वाळिंबे हे थोर समीक्षक म्हणून ओळखले जातात. ते व्यासंगी विद्वान आणि आपल्या ओघवत्या वाणीने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणारे ख्यातनाम वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. […]

हुस्नलाल-भगतराम पैकी हुस्नलाल

हिंदी सिनेमांतील पहिली संगीतकार जोडी म्हणून ओळख असलेले हुस्नलाल-भगतराम पैकी हुस्नलाल यांचा जन्म १९१६ मध्ये जालंधर येथे झाला. हुस्नलाल व भगतराम हे दोघेही लाहोरच्या सुप्रसिद्ध संगीतकार पंडित अमरनाथ शर्मा यांचे धाकटे बंधू. हुस्नलाल उत्कृष्ट व्हायोलिन वादक होते. वयाच्या १७-१८ व्या वर्षीपासून त्यांनी लाहोर, अमृतसर, दिल्ली येथील बर्यानचशा मैफिली व्हायोलिनवर शास्त्रीय संगीत वाजवत गाजवल्या होत्या. त्या व्यतिरिक्त ते उत्तम […]

भारताचे अर्थमंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते अरुण जेटली

भारताचे अर्थमंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी नवी दिल्ली येथे झाला. अरुण जेटली हे भारतीय जनता पक्षाचा एक महत्त्वाचा नेता म्हणून ओळखले जातात. आधी पेशाने वकील, पण त्यानंतर पूर्ण वेळ राजकारणात उरतले. अरुण जेटली यांचे वडिल महाराज किशन जेटली हे प्रख्यात वकील होते. दिल्लीतील सेंट झेव्हियर्स शाळेतून त्यांनी […]

1 236 237 238 239 240 424
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..