नवीन लेखन...

भारताचे अर्थमंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते अरुण जेटली

भारताचे अर्थमंत्री व भारतीय जनता पार्टीचे प्रमुख नेते अरुण जेटली यांचा जन्म २८ डिसेंबर १९५२ रोजी नवी दिल्ली येथे झाला. अरुण जेटली हे भारतीय जनता पक्षाचा एक महत्त्वाचा नेता म्हणून ओळखले जातात. आधी पेशाने वकील, पण त्यानंतर पूर्ण वेळ राजकारणात उरतले. अरुण जेटली यांचे वडिल महाराज किशन जेटली हे प्रख्यात वकील होते. दिल्लीतील सेंट झेव्हियर्स शाळेतून त्यांनी आपले शालेय शिक्षण घेतले आणि पदवीचे शिक्षण त्यांनी श्री राम कॉलेज ऑफ कॉमर्समधून घेतले. त्यानंतर १९७७ ला त्यांनी विधीची पदवी घेतली. आपल्या महाविद्यालयीन जीवनात अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते.

१९७४ मध्ये ते दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे अध्यक्ष बनले. अरुण जेटली यांच्या राजकीय कारकीर्दीला महाविद्यालयापासूनच सुरुवात झाली. अरुण जेटली हे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सक्रिय कार्यकर्ते होते. सुरुवातीच्या काळापासूनच वक्तृत्व आणि वादविवादावर त्यांचे प्रभुत्व होते. दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाचे ते अध्यक्ष बनले आणि त्यांचा राजकारणाचा प्रवास खऱ्या अर्थाने सुरू झाला.आणीबाणीच्या काळात अरुण जेटली यांना अटक करण्यात आली होती. जेटली यांना अंबाला येथील तुरुंगात ठेवण्यात आले होते. त्यानंतर तेथून हलवून तिहारच्या तुरुंगात ठेवण्यात आले होते. आणीबाणीनंतर ते पुन्हा राजकारणात जोमाने काम करू लागले. त्यांची १९७७ मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. त्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

१९७७ ला कायद्याची पदवी घेतल्यापासून अरुण जेटली हे एक यशस्वी वकील म्हणून ओळखले जातात. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात ते काम पाहतात. १९९० मध्ये ते दिल्ली उच्च न्यायालयाचे वरिष्ठ विधीज्ञ म्हणून निवडले गेले होते. कायद्याच्या क्षेत्रातील त्यांचे ज्ञान आणि अनुभव पाहून १९९८ ला त्यांची निवड संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेला जाणाऱ्या शिष्टमंडळात झाली होती.

१३ ऑक्टोबर १९९९ रोजी त्यांची नियुक्ती अटल बिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात करण्यात आली. त्यांच्याकडे तंत्रज्ञान आणि प्रसारण या मंत्रालयाचा पदभार सोपवण्यात आले. २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. मे २०१४ पासून ते नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात आहे. देशात आर्थिक सुधारणा होणे हे महत्त्वाचे आहे अशी भूमिका ते मांडतात. अल्पकाळासाठी त्यांच्याकडे संरक्षण मंत्रालयाची देखील जबाबदारी होती. सध्या ते भारताचे अर्थमंत्री म्हणून कार्यरत आहेत. आजवर अरुण जेटली यांनी आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, त्यानंतर राज्यसभेवर खासदार, तिथं भूषविलं विरोधी पक्षनेतेपदही… पण लोकसभेची निवडणूक मात्र पहिल्यांदाच लढवली; त्यात त्यांना अपयश आलं. ग्लॅमर आणि ड्रेस सेन्सच्या बाबतीत अरुण जेटली सर्वापेक्षा वेगळे दिसतात. चष्म्याच्या फ्रेमपासून चप्पल, बुटापर्यंत सर्वामधून उमदेपणा झळकतो. त्यांच्या वार्डरोबमध्ये जगभरातील ब्रँडचे कपडे उपलब्ध असतात.

२४ मे १९८२ रोजी त्यांचा विवाह संगीता डोग्रा यांच्याशी झाला. संगीता डोग्रा जम्मू-काश्मी रचे कॉंग्रेसी नेता व उपमुख्यमंत्री राहिलेल्या गिरीधारीलाल डोग्रा यांच्या कन्या. त्यांचा जन्म मात्र अमृतसरचा. जम्मू विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम.ए केलं आणि त्यानंतर १९८२ मध्ये जेटलींकडून लग्नाची मागणी आली. त्या वेळी अरुण जेटली नामवंत वकील होण्याबरोबरच भाजपमध्येही स्थिरावले होते. त्यांच्या लग्नाला अर्थातच दोन्ही पक्षांचे नामवंत होते… त्यात पंतप्रधान इंदिरा गांधी, अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवानी ही बडी मंडळी होती. लग्नानंतर संगीता यांचं नाव बदललं गेलं, त्या झाल्या डॉली. आणि अर्थातच हळूहळू त्या भाजपच्या कार्यकर्त्याही बनल्या. घरातून बालपणापासूनच राजकारणाचं बाळकडू मिळालेल्या संगीता उर्फ “डॉली‘ या अरुण जेटली यांच्या निवडणुकीचे सारं व्यवस्थापन स्वत: पाहतात. त्यांना रोहन आणि सोनाली अशी दोन मुले आहेत.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4222 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..