नवीन लेखन...
Avatar
About संगीत WhatsApp ग्रुप
श्री. संजीव वेलणकर यांनी सुरु केलेल्या “संगीत संगीत आणि फक्त संगीत” या Whatsapp समूहावरील पोस्ट आणि लेख....

आयुष्यात हास्याचे मळे फुलविणारा ‘मुक्री’

आयुष्यात हास्याचे मळे फुलविणारा मुक्री तथा मोहम्मद उमर अली मुक्री याचे आज पुण्यस्मरण त्यानिमित्त समीर परांजपे यांचे ब्लॉग मधून… हिंदीतील अनेक आघाडीच्या नायकांचा विनोदी मित्र, सहचर अशा भूमिकांमध्ये मुक्री फिट बसला. त्याच्या भूमिकांना चरित्र भूमिका म्हणायचे की विनोदी भूमिका असा प्रश्न काही वेळेस निर्माण होतो. पण त्याने जे जे काम हाती घेतले त्याचे पडद्यावर सोने केले. […]

आजचा तानसेन, फरिश्ता, शापित गंधर्व….

अमृतसरच्या एका गावातून रोज एक फकीर गाणी म्हणत जायचा आणि त्याच्या मागे मागे एक चिमुरडा फकीरच्या पाठोपाठ तीच गाणी म्हणत त्याचा पाठलाग करायचा. फकीर कुठे आराम करण्यासाठी थांबला तर त्या वेळात त्या गाण्यांचा सराव हा चिमुरडा करायचा, हे अगदी रोज घडायचं. एक दिवस या छोट्या मुलाला ती गाणी म्हणताना त्या फकिराने ऐकलं, त्याला कडेवर उचलून घेत […]

काव्य जन्माची कथा – मधु मागसी माझ्या सख्या, परि

कविवर्य भा.रा.तांबे अंथरुणास खिळले होते तेंव्हाची काव्य जन्माची एक कथा आहे… आपण आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात आलो असल्याचे त्याना जाणवत होते त्यावेळी त्यांचे एक स्नेही जवळ येऊन त्यांच्यापाशी कविता लिहिण्याचे आर्जव करू लागले. तांबेंनी आयुष्याच्या अंतिम वाटेवर काही तरी बोलावे किंवा लिहावे अशी विनवणीही त्यांनी जाता जाता केली…. काही दिवसांनी त्या संपादक महोदयांचे कविता पाठविण्यासाठीचे आठवण वजा […]

सूर तेच छेडिता

भारतीय संगीतातील सात सूर कोणाकडुन, कसे आले ह्याबाबत एका संस्कृत श्रुती साहित्यात उल्लेख आहे असं ‘केसराचा पाऊस’ ह्या मारुति चितमपल्लींच्या पुस्तकात वाचलं […]

संगीतोपचार एक स्वास्थ्यवर्धक उपाय !

आजकालच्या धकाधकीच्या जीवनात आभासी ध्येयांच्या मागे उर फुटेपर्यंत धावताना नको नको ते आजार, व्याधी शरीराला विळखा घालत आहेत, त्यावर बर्याचदा औषधांच्या मात्राही काम करीत नाहीत. संगीतात असणार्या अनोख्या संमोहन शक्तीमुळे सध्या रोगांवर पूरक उपचार म्हणून संगीतोपचार लोकप्रिय होत आहे. संगीतं श्रवणामृतं ! संगीत हे नेहमीच आनंद देणारं, मनःशांती मिळवून देणारं असत. कोणतही काम करीत असताना एकीकडे […]

प्रेम म्हणजे…..

प्रेम म्हणजे चांगूलपणा कळणं असतं प्रेम म्हणजे सुखी स्व—जिवाला उगीचंच छळणं असतं ! प्रेम म्हणजे तिने हाय म्हणताच कळवळणं असतं प्रेम म्हणजे तिने बाय म्हणताच तळमळणं असतं ! प्रेम म्हणजे उगीचंच तिच्यामागे पळणं असतं प्रेम म्हणजे बोलायच्या वेळीच बोबडी वळणं असतं ! प्रेम म्हणजे खिसा रिकामा होईस्तोवर पिळणं असतं प्रेम म्हणजे अापण मित्रंच अाहोत हा मूग […]

स्वरभास्कर भीमसेन जोशी आणि मी

पांढरा शुभ्र सदरा ..लेंगा ..खांद्यावर शाल असा साधासा पोशाख असलेले भीमसेन जोशी सवाईच्या मंडपात जेव्हा सगळीकडे नजर ठेवून असत तेव्हा दरारा वाटे. […]

सवाई “साईटस्-साऊंडस्”

सवाई हा फक्त एक उत्सवच नाही तर महोत्सव आहे .. गेली ६० वर्षे दर वर्षी नित्य नियमाने सवाई च्या सर्व मैफिली जागवणारे अस्सल रसिक हे ह्या उत्सवाचे वैशिष्ठ्य .. खाणे आणि गाणे ह्या दोन महत्वाच्या गरजा इथे उत्तम रीतीने पुरविल्या जातात … पुरण पुळ्या , उकडीचे मोदक , उपवासाचे पदार्थ , साबुदाणे वडे , बटाटे वडे […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..