नवीन लेखन...
Avatar
About संगीत WhatsApp ग्रुप
श्री. संजीव वेलणकर यांनी सुरु केलेल्या “संगीत संगीत आणि फक्त संगीत” या Whatsapp समूहावरील पोस्ट आणि लेख....

बा.सी. मर्ढेकर यांची एक कविता

दवांत आलीस भल्या पहाटी शुक्राच्या तोऱ्यात एकदा, जवळुनि गेलिस पेरित अपुल्या तरल पावलांमधली शोभा अडलिस आणिक पुढे जराशी पुढे जराशी हसलिस; – मागे वळुनि पाहणे विसरलीस का? विसरलीस का हिरवे धागे? लक्ष्य कुठे अन कुठे पिपासा, सुंदरतेचा कसा इशारा; डोळ्यांमधल्या डाळिंबांचा सांग धरावा कैसा पारा! अनोळख्याने ओळख कैशी गतजन्मीची द्यावी सांग; कोमल ओल्या आठवणींची एथल्याच जर […]

कृतज्ञता

मी आज तुम्हांला चित्रपटातील हिरो व जगावर अधिराज्य करणारा सुपरस्टार, खर्‍या जीवनातही कसा सुपरहिरो आहे ते सांगणार आहे . . . अंदाजे जानेवारी-फेब्रुवारी 1984 सालची ही गोष्ट . . . त्या काळातील नावाजलेले सुपरहिट डायरेक्टर-प्रोड्युसर प्रकाश मेहरा हे सन 1982 ते 1984 च्या दरम्यान प्रचंड आर्थिक नुकसानीत होते . . . गाडी, बंगला व इतर संपत्ती […]

भीमसेन जोशींबद्दलचा एक ह्रुद्य किस्सा जरूर वाचा

सच्च्या स्वरांचे, पक्क्या शब्दाचे! मी त्या वेळी वाडिया ब्रदर्स, मुंबई या चित्रपट संस्थेसाठी ‘स्वयंवर झाले सीतेचे’ हे चित्र दिग्दर्शीत करीत होतो. या चित्राचे लेखक गीतकार ग. दि. माडगूळकर होते आणि संगीत वसंत देसाई यांचे. या चित्रपटात रावणाची भूमिका महत्त्वपूर्ण होती. रावण हा ऋषीकुमार सर्व विद्येत पारंगत होता. शस्त्रास्त्र शास्त्रात तो निपुण होता. गायनाचा त्याला शौक होता. […]

स्वरभास्कराचे अपरिचित जीवन

जगाच्या कानाकोपऱ्यात ज्या भारतीय कलावंतांना ओळखले जाते, जगभरातील रसिकांवर ज्यांच्या कलाविष्काराची मोहिनी आहे त्यामध्ये स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. मात्र, थोर कलावंत हाही अखेरीस माणूसच असतो, त्याच्या हातूनही अक्षम्य प्रमाद घडू शकतात, याची प्रचिती या पुस्तकातून येते. पंडितजींचे थोरले पुत्र राघवेंद्र यांच्या मराठी पुस्तकाचा हा नेटका अनुवाद आहे. पंडितजींनी केलेल्या दुसऱ्या लग्नामुळे […]

“सांज ये गोकुळी”

…. यमूनेशी कलून बसलेल्या यशोदेची अस्वस्थता काठाच्या पाण्याबरोबर लपलप करत होती. तिचं  पाण्यातलं प्रतिबिंब विरळ होत चाललं… यमूना सावळी दिसू लागली, तशी आपल्या मागे चोरपावलांनी खट्याळ कान्हाच येऊन उभा की काय वाटून गर्रकन फिरून यशोमती उभी झाली. पण तिची काजळभरली नजर लांब जाऊन रिकामीच परत आली.. दूरपर्यंत फक्त हळूवार पावलांनी उतरत जाणारी सांज तेव्हढी दिसली. क्षितीजावर […]

गाजलेल्या मराठी गझला

तरुण आहे रात्र अजुनी राजसा निजलास का रे ? एवढ्यातच त्या कुशीवर तू असा वळलास का रे ? अजुनही विझल्या न गगनी , तारकांच्या दीपमाला अजुन मी विझले कुठे रे ? हाय ! तू विझलास का रे ? सांग, ह्या कोजागरीच्या , चांदण्याला काय सांगू ? उमलते अंगांग माझे.. आणि तू मिटलास का रे ? बघ […]

“मी कुणाला कळलो नाही”

“मी कुणाला कळलो नाही” मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही.. नाही भेटला कोण असा ज्याने मला छळले नाही… सुगंध सारा वाटीत गेलो मी कधीच दरवळलो नाही.. ऋतू नाही असा कोणता ज्यात मी होरपळलो नाही.. केला सामना वादळाशी त्याच्या पासून पळालो नाही.. सामोरा गेलो संकटाना त्यांना पाहून वळलो नाही.. पचऊन टाकले दु:ख सारे कधीच […]

आई म्हणायची ‘श्री’ लिहावे

आई म्हणायची ‘श्री’ लिहावे नव्या पानावरती, वापरावी नवी वस्तू, कुंकू लावल्या वरती. आई म्हणायची संध्याकाळची, झोपी जातात झाडे, अजून फुलं तोडायला हात होत नाहीत पुढे. आई म्हणायची मिळतेच यश, तुम्ही करत रहा काम, भीती वाटली कि फक्त म्हणावे, राम,राम,राम. आई म्हणायची काहीही असो, होतो सत्याचाच जय, अजूनही खरं बोलायला वाटत नाही भय. आई म्हणायची ठेवा श्रद्धा […]

काहीतरी शिकण्यासारखे…

अभिनेता दिलीप कुमार म्हणतात “जेव्हा माझं करिअर उंची वर होत… प्रसिध्दी पदरी होती माझ्या… सगळीकडे मान, सन्मान मिळायचा.. त्या वेळचा हा जीवनप्रसंग….. एकदा मी विमानाने प्रवास करत होतो… माझ्या बाजुला एक साधा, वयाने माझ्यापेक्षा मोठा असलेला प्रवासी बसलेला होता… माणूस खुपच Simple…कपडे त्यांनी साधे च लावलेले… Middle class वाटत होता… पण तो प्रवासी सुशिक्षित वाटत होता.. […]

तू गुंतला असा की

तू गुंतला असा की जगण्यास वेळ नाही अन् सांगतो जगाला मरण्यास वेळ नाही गाणार गीत केव्हा तू सांग जीवनाचे जेव्हा तुलाच वेडया हसण्यास वेळ नाही आयुष्य तू तुझे तर जगतो खुशाल आहे आता जगाकडे ही बघण्यास वेळ नाही मिटणार ना कधी जे ते नाव दे यशाला म्हण एकदा तरी की हरण्यास वेळ नाही आयुष्य युद्ध आहे […]

1 2 3
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..