नवीन लेखन...

ते त्रिकोणी कुटुंब (एक सत्यकथा)

नियती मात्र या कुटुंबावर पहिला आघात करण्याला सिद्ध झाली होती. २००६ साली ट्रेनमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटात चंदू आजोबा आश्चर्यकारकपणे वाचले. अगदी नेमकं सांगायचं तर त्या पहिल्या वर्गाच्या डब्यात ते एकटेच वाचले होते. स्फोटामुळे कानाना प्रचंड दडे बसले होते , रक्त येत होतं , आजूबाजूची अंगावर शहारे आणणारी परिस्थिती पाहून मनावर प्रचंड आघात झाला होता. […]

गणपती बाप्पा मोरया

दीड दिवस , पाच दिवस, कुणाकडे रहातोस अकरा दिवस. सारे आळवणी करतात तुझी, कुणी करतात तुला नवस. काय सांगावा रुबाब तुझा, पेढे मोदक नुसती मज्जा. ऐषआराम सुखात ठेवतात तुला, आरत्या भजनांचा एकच कल्ला. घरही सारे न्हाऊन निघते, तुझ्या असण्याने भारून जाते. सुखकर्ता दुःखहर्ता म्हणतात तुला, अष्टसात्विक भाव जागवतात मनाला. सगळं छान शुभ प्रसन्न असतं, अशुभाला इथे […]

मी N.C.C. मध्ये जातो

मी नवव्या इयत्तेत गेलो. या वर्षी आम्हाला NCC कॅम्पला जावं लागणार होतं. बरं कॅम्प ठरला तो ही दिवाळीच्या आधी देवळाली नाशिकला. NCC कॅम्प म्हणजे काय असतं काहीच कल्पना नव्हती. […]

एकच पर्याय

कपाटात कितीही साड्या (कित्येक न वापरलेल्या )असल्या तरी, “आजच्या फंक्शनसाठी माझ्याकडे एकही साडी नाहीय.” हे प्रत्येक बायको अगदी दुःखाने म्हणत असते. आता त्यावर वेड्यासारखं, “या काय इतक्या तर आहेत ” असं अजिबात म्हणायचं नसतं. तर आपणही तिच्या दुःखात सामील आहोत एवढेच चेहऱ्यावर भाव आणायचे असतात. […]

षष्ठ्याब्दीपूर्ती

काल रात्री स्वप्नात, एन्ट्री घेतली बाप्पाने. ठोके दिले बाराचे, त्याचक्षणी घड्याळाने. सोंड हलवत, मस्त झुलत – माझ्याजवळ आला, काय पहातोय मी? विश्वासच बसेना झाला. एकसष्ट मोदकांचं तबक – होतं हाती त्याच्या, बाप्पाच्या हातचे मोदक – वाट्याला येणार कुणाच्या? झटक्यात संपूर्ण ताटच त्याने – माझ्यासमोर धरलं, हातात घेऊन हात मला – जिवेत शरदः शतम् म्हटलं. खडबडून झालो […]

सुर्यास्त (एक मैत्रचित्र)

आपल्या आयुष्यात मैत्र जीवाचे मिळणं हा खरोखरच नशिबाचा भाग असतो. मी मात्र त्या बाबतीत भाग्यवान आहे. मला माझ्या पौगंडावस्थेत, उमेदीच्या वयात फार चांगले मैतर मिळाले. माझ्या आयुष्याचा एक कोपरा या मित्रांनी व्यापलेला आहे. पण या सगळ्यांमध्ये माझ्या जवळ आलेला माझा एक जिवलग होता रवींद्र एकनाथ गोसावी. तसं पाहिलं तर तो काही माझा लंगोटीयार नव्हता किंवा शाळा कॉलेजमधला […]

कावळा

तो असतो बसलेला नेहमी कुणाच्या- ग्रिलच्या दांडीवर कर्कश्श ओरडत, एखाद्या भिकाऱ्यासारखा पोटाला मागत. पितृपक्ष वजा केला तर – त्याला फक्त झिडकारणीच मिळते. गरिबाला कुठे असते आवड निवड ? त्याच्या नशिबी नेहमीच हड हड. तसं बिचाऱ्याला काहीही चालते , पाव ,गाठ्या,शेवापासून उकिरड्यापर्यंत- नकारघंटा अगदी कशालाच नसते. नाक मुरडणं, तोंड फिरवणं काही नाही, कौतुकाने त्याला काहीच ठेवत नाही […]

स्पृहा – एक व्यासंगी सेलिब्रिटी

एक तरल सिने-टेलिव्हिजन-नाट्य अभिनेत्री, सुहास्य सूत्रसंचालिका, एक चांगली मुलाखतकार, वेगळा विचार करणारी संवेदनशील कवयत्री, एक सजग व्यक्ती, एक सेलिब्रिटी तरीही आपल्यातली वाटणारी तारका आणि माझ्या मोजक्या आवडत्या कलाकार व्यक्तिमत्वातील एक व्यक्तिमत्व. […]

माझ्या मनातले बाबासाहेब पुरंदरे

बाबासाहेबाना बोलताना फक्त ऐकणं यापेक्षा पाहाणं अधिक आनंदाचं असायचं. त्यांचं संपूर्ण शरीर श्रोत्यांशी संवाद साधत असायचं. शब्दकळेला एक सुंदर लय असायची. प्रत्यक्ष इतिहासात रमणारी ही थोर व्यक्ती स्वतःला इतिहास संशोधक न म्हणता शिवशाहीर म्हणवून घेण्यात धन्यता मानणारी होती…… होती म्हणजे भूतकाळ. […]

जन पळभर म्हणतील

प्रत्येकजण नजर आणि मान उंच करून गेलेल्या व्यक्तीच्या घरातलं कुणी दिसलं की शक्य तेव्हढं चेहऱ्यावर दुःख आणून मोबाईल लपवत अपेक्षेने त्यांच्याकडे पहात असतो. अनेकदा बिल्डिंगमधले कुणी सहृदयी खुर्च्यांची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करतात. […]

1 7 8 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..