नवीन लेखन...

भात पुराण

वरण भाताच्या मुदिवर तुपाची धार, पिळायचं लिंबू मग येते बहार. तोंडी लावायला बटाट्याची गोल कचरी, यापुढे पक्वांनांची काय सांगा मातब्बरी?. दहिबुत्ती म्हणजे सांगतो तोंडाला पाणी, भातावर दही, वर जिऱ्या तुपाची फोडणी. ताकातली मिरची तळून कुस्करायची वर, पोह्याचा पापड असेल तर नुसता कहर. नारळी भाताचा स्वाद, दरवळ संपूर्ण घरात, पावलं वळतात अलवार स्वयंपाकघरात. आंबेमोहोर तांदूळ, त्यात नारळ,गूळ […]

व्याख्या प्रेमाची

प्रेम म्हणजे नसतं , नुसतं उमळून येणं , किंवा नसतं एकमेकात , सतत विरघळून जाणं. प्रेम म्हणजे प्रणयाचा – नसतो फक्त आवेग , प्रेमात नसते कुठेही – आखायची भोज्जाची रेघ. प्रेम म्हणजे असतं , समजून घेणं दुसऱ्याला , तोंड मिटून शिकायचं , मनापासून ऐकायला. प्रेमाला पुरतो दोघांचा , फक्त निर्मळ सहवास , ‘ मी आहे ‘ […]

इतिहास आणि आजचे जीवन

खरंच काही न करता आयतं काही मिळालं नां की त्याची किंमत रहात नाही माणसाला. स्वातंत्र्याचंही तसंच झालंय. आम्ही इतिहासात डोकावून पाहायला तयार नाही आणि त्यातून शिकायला तर नाहीच नाही. कारण आजच्या राज्यकर्त्याजवळ या जिवंत इतिहासाकडे निस्वार्थ भावनेने पाहायला वेळ नाही. मग आपल्या इतिहासाची नाळ आजच्या जीवनाशी जुळायची कशी? एव्हढाच प्रश्न आहे. […]

नागेश मोरवेकर – एक प्रतिभावान लोककलाकार

डोळे मिटून भूतकाळाच्या विश्वात शिरलं , की अनेक गोष्टी, आठवणी, व्यक्ती, प्रसंग डोळ्यांसमोर लख्ख उभे रहातात. त्यासोबत जोडलेल्या अनेक गोष्टी फेर धरून नाचू लागतात. आनंद, दुःख, समाधान, अशा संमिश्र भावभावनांना स्पर्श करत एक छानसा फेरा पूर्ण होतो आणि पुन्हा एकदा मी वर्तमानकाळात अवतरतो. […]

बाजार

उभी कोपऱ्यात शहराच्या, ती वस्ती लाल दिव्याची. अभिशाप भोगत असते, रात्रीच्या अभिसाराची. सकाळ होई दुसऱ्या प्रहरा, शीण कायेचा तो सारा. अंमल वारुणीचा असे अजूनही, वस्त्रांचे भान ते नसे जराही. झटकुनी दुखऱ्या देहाला कोनी, कवळिती तयांना छातीशी धरूनी. बिलगती कुस मिळे मायेची, कसर रात्रभराच्या विरहाची. स्नान करूनी हात जोडुनी, देवाला सजविती फुलांनी. करेल काय?निराकार तो ही, चुरगळा […]

जीवनाच्या वाटेवरचे

डीके आजोबा ही वल्ली आमच्या आयुष्यात तशी अचानकच आली. डीके हे त्यांचं आडनाव. त्याचं झालं असं, सूर नवा ध्यास नवा हा बालगायकांचा रिऍलिटी शॊ सुरु होता त्याचं चित्रीकरण मीरा रोड इथल्या स्टुडिओत सुरु होतं. एकदा माझ्या एका परिचितांचा फोन आला की तुम्हाला चित्रीकरण पाहायला जायचं असल्यास डीके आजोबा घेऊन जातील. […]

प्रवास शब्दकळेचा

शब्दकळेच्या प्रवासाला निघायचं ठरतं. दिवस ठरलेला असतो. हळूहळु सगळे जमायला लागतात. तहानलाडू भूकलाडू सोबत घेऊन लहानांपासून थोरांपर्यंत अगदी सगळ्या वयोगटातील शब्दकळेच्या प्रवासाला निघालेले प्रवासी एकत्रित होतात. आज एका नव्या प्रवासाला जायचं असतं. आजचं रमणीय विषयस्थान कोणतं असणार याची कुजबुज सुरु असते, किंवा ज्ञात असेल तर उत्सुकता असते. आणि या प्रवासाची वाहक, चालक, वाटाड्या, मार्गदर्शक जी all […]

यश – पचवायचं? की त्यात हरवायचं?

यशस्वी होणं , कीर्तीच्या शिखरांवर जाणं, लक्ष्मी -सरस्वती घरात पाणी भारतात हे सत्यसृष्टीत येणं हे जगरहाटीनुसार काही यशाचे मापदंड आहेत. अगदी सगळे यालाच यशस्वी होणं म्हणतात असं नाही. प्रत्येकाच्या यशस्वी होण्याच्या व्याख्या आणि लक्ष्य वेगळी असतात. बाबा आमटेंच्या मनातलं आनंदवन अपार कष्टानंतर जेव्हा प्रत्यक्षात आलं असेल त्यावेळी त्यांच्या मनात आपल्या ध्येयामध्ये आपण यशस्वी झालो हीच भावना […]

आयुष्याचा गुंता आणि गुंतणं

आपल्याला ना सगळंच हवं असतं. काही ना काही सांगायचं असतं, समोरच्याने ते ऐकायला हवं असतं, नाही ऐकलं तर आपल्याला ते फार लागतं, मग आपल्याला समजून घेत नाहीत म्हणून आपण गळा काढतो. एकूण काय तर सगळ्या दोऱ्या आपल्या हातात हव्या असतात. […]

मिमिक्री

र्वी वाद्यवृंदाच्या कार्यक्रमामध्ये मुख्य गायक वादकांना अल्प विश्रांती मिळावी आणि कार्यक्रम सुरू रहावा या हेतूने Mimicry कलाकार आपली कला सादर करत असत. पुढे स्वतंत्र Mimicry शोज होऊ लागले. हळुहळु या कलेला स्थिरपणा आला आणि दूरदर्शनच्या विविध वाहिन्या नकला , Mimicry यांचे पूर्ण कार्यक्रम सादर करू लागल्या. […]

1 6 7 8 9 10 11
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..